सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

जंगलात एका होतं झाड एका तळ्याच्या काठावर

शंभर हात उंच होतं ते तळ्यापासून दोनशे हातावर

झाडावरून निघाली माकडं दोन जायला तळ्याच्या काठी

पण मार्ग त्यानी निवडले वेगळे तिथे जाण्यासाठी

एकाने खाली उतरून घेतली चालत तळ्याची भेट

दुसरा मारून उडी मग गेला तिरकस थेट

दोघे पोहोचले एकाच वेळी कोणी आधी ना नंतर

कारण दोघांनी कापले होते अगदी सारखेच अंतर

सांगा बरं मारली दुसऱ्या माकडाने किती उंच उडी

मन लावून जर शिकला असाल गणित न खाता छडी