कुटप्रश्न
एक भाऊ आपल्या तीन बहिणींना भेटायला निघाला .त्याच्याकडे
एका थैलीत काही रक्कम होती. तो पहिल्या बहिणीकडे गेला बहिणीने त्याचे स्वागत केले .
त्याच्या थैलीत जितकी रक्कम होती तितकीच रक्कम तिने त्या थैलीमध्ये ठेवली. जाताना
त्यातील 2000 रुपये त्याने पहिल्या बहिणीला दिले.
दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या बहिणीकडे गेला. बहिणीने
त्याचे स्वागत केले . त्याच्या थैलीत जितकी रक्कम होती तितकीच रक्कम तिने त्या
थैलीमध्ये ठेवली. जाताना त्यातील 2000 रुपये त्याने दुसऱ्या बहिणीलाही दिले.
तिसऱ्या दिवशी तो तिसऱ्या बहिणीकडे गेला . बहिणीने
त्याचे स्वागत केले . त्याच्या थैलीत जितकी रक्कम होती तितकीच रक्कम तिने त्या
थैलीमध्ये ठेवली. जाताना त्यातील 2000 रुपये त्याने तिसऱ्या बहिणीलाही दिले.
तो घरी आला तेव्हा त्याच्याकडे 5000 रुपये थैलीत
होते, तर तो भाऊ सुरुवातीला किती रक्कम घेऊन बहिणीकडे निघाला होता ?
2375 + 2375 =4750 4750-2000 =2750
2750+2750 =5500 5500-2000 =3500
3500+3500 = 7000 7000-2000 =5000
त्याचाकडे सुरुवातीला 2375 रुपये होते.
5000+2000 =7000 7000÷2 =3500
3500+2000 =5500 5500÷2 = 2750
2750+2000 =4750 4750÷2=2375
त्याचाकडे सुरुवातीला 2375 रुपये होते.