सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

मराठी भाषा गौरव दिन ---

 

मराठी भाषा गौरव दिन ---

--------------------------------------------------------------------------

वेदशास्त्राचा मतिथार्तु

मऱ्हाटीया जोडे फलीतार्थ

तरी चतुरी परीमार्थ

  का ने द्यावा

--- आद्यकवी मुकुंदराज

 

मराठी असे आमुची मायबोली

जरी भिन्नधर्मानुयायी असू

पुरी बाणली बंधुता अंतरंगी

हिच्या एक ताटात आम्ही बसू

   --- माधव जुलियन

माझ्या मराठी मातीचा

लावा ललाटास टिळा

हिच्या संगाने जागल्या

दऱ्याखोऱ्यातील शिळा

----कुसुमाग्रज

 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ , जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

------सुरेश भट

थोडी शाब्दिक गंमत आहे…

" खळखळून हसा

 

एक वेलांटी सरकली,

पिताकडून पतीकडे आली.

 

एक काना सरकला,

राम ची रमा झाली.

 

दोन काना जोडले,

शरद ची शारदा झाली.

 

एक मात्रा सरकली,

खेर ची खरे झाली.

 

एक अक्षर घटले,

आठवले ची आठले झाली.

 

एक अक्षर बदलले, अन्

मालू ची शालू झाली.

कर्वे ची बर्वे झाली.

अत्रे ची छत्रे झाली.

गानू ची भानू झाली.

कानडे ची रानडे झाली.

 

लग्नानंतर नांवच उलटे केले,

निलिमाची मालिनी झाली.

 

पदोन्नती झाली,

प्रधान ची राजे झाली.

राणे ची रावराणे झाली.

देसाई ची सरदेसाई झाली.

अष्टपुत्रे ची दशपुत्रे झाली.

 

झुरळाला भिणारी ती,

दैवयोगाने वाघमारे झाली.

 

लेकराला कुरवाळीत,

पुढे लेकुरवाळी झाली.

 

एक पिढी सरकली, 

सुनेची सासू  झाली !!

 

*चिमा काय कामाची

* भाऊ तळ्यात उभा

* रामाला भाला मारा.

*काका वाचवा काका

*काका वाहवा काका

*ती होडी जाड होती

*तो कवि डालडा विकतो

*तो कवि सामोसा विकतो.

*टेप आणा आपटे

*शिवाजी लढेल जीवाशी

* सर जाताना प्या ना ताजा रस

*हाच तो चहा

* तो कवि कणिक विकतो