कुटप्रश्न –
एका व्यापाऱ्याकडे 81
सुवर्णमुद्रा आहेत. त्यापैकी एक मुद्रा खोटी आहे. त्या खोट्या सुवर्णमुद्रेचे वजन
कमी आहे.जास्तीत जास्त चार वेळा तराजूचा वापर करून त्यातील खोटी सुवर्णमुद्रा कशी
शोधता येईल ?
उत्तर-
1) प्रथमतः 81 सुवर्णमुद्राचे
3 भागात समान विभागणी करून वजन करा .
27 27
27 याप्रमाणे गट होतील . त्याचे वजन केल्यास कमी वजनाच्या गटात सुवर्णमुद्रा
आहे हे शोधता येईल .
2) कमी वजनाच्या 27 सुवर्णमुद्रांचे
पुन्हा 3 भागात समान विभागणी करून वजन करा
9 9 9 याप्रमाणे गट होतील . त्याचे वजन केल्यास कमी
वजनाच्या गटात सुवर्ण मुद्रा आहे हे शोधता येईल.
3) कमी वजनाच्या 9 सुवर्णमुद्रांचे
पुन्हा 3 भागात समान विभागणी करून वजन करा
3 3 3 याप्रमाणे गट होतील . त्याचे वजन केल्यास कमी
वजनाच्या गटात सुवर्ण मुद्रा आहे हे शोधता येईल.
4) कमी वजनाच्या 3 सुवर्णमुद्रांचे
पुन्हा 3 भागात समान विभागणी करून वजन करा
1 1 1 याप्रमाणे गट होतील . त्याचे वजन केल्यास कमी वजनाची
सुवर्णमुद्रा शोधता येईल .ती सुवर्णमुद्रा खोटी असेल .