सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

एका जंगलात तीन मंदिरे आहेत. त्या मंदिराजवळ एक फुलांची बाग आहे.त्या बागेजवळ एक जादूचा तलाव आहे. एक पुजारी एक दिवस त्या मंदिराकडे गेला . त्याने काही फुले तोडली व त्या तलावात बुडविली तेव्हा त्याच्याजवळची फुले दुप्पट झाली.त्यातील काही फुले त्याने पहिल्या मंदिरात वाहिली. पुन्हा शिल्लक फुले त्याने तलावात बुडविली तेव्हा पुन्हा फुले दुप्पट झाली. त्यातील पहिल्या मंदिरात जितकी फुले वाहिली होती तितकीच फुले त्याने दुसऱ्या मंदिरात वाहिली.पुन्हा शिल्लक फुले तलावात बुडविली तेव्हा पुन्हा फुले दुप्पट झाली.व दोन मंदिरात प्रत्येकी जितकी फुले वाहिली होती तितकीच फुले तिसऱ्या मंदिरात वाहिली तेव्हा पुजाऱ्याकडे एकही फूल शिल्लक नव्हते.

तर त्याने सुरुवातीला किती फुले तोडली होती. व प्रत्येक मंदिरात त्याने किती फुले वाहिली.

 

उत्तर-

त्याने 7 फुले तोडली होती . व 8 फुले प्रत्येक मंदिरात वाहिली.

7 ×2 = 14   14-8 =6

6 ×2 = 12   12-8 =4

4 ×2 = 08   8-8 =0