सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

अ व ब दोन मित्र व्यापारासाठी परगावी निघाले होते. जाताना त्यानी सोबत शिदोरी घेतली होती. अ कडे 5 भाकरी होत्या . ब कडे 3 भाकरी होत्या. वाटेत ते जेवणासाठी थांबले त्यावेळी एक व्यक्ती तेथे आली. त्यालाही खूप भूक लागली होती. त्यानी त्यांना जेवणासाठी बोलावले. व तिघांनी मिळून एकत्रित जेवण केले. सर्वानी समान भाकरी खाल्ल्या. शेवटी निघताना तिसऱ्या व्यक्तीने दोघांना मिळून 8 रुपये दिले. व आपसात वाटून घ्या असे सांगितले. त्या दोघांमध्ये भांडण सुरु झाले . अ म्हणाला माझ्या 5 भाकरी होत्या तेव्हा मला 5 रुपये मिळाले पाहिजेत . व तुझ्या 3 भाकरी होत्या तुला 3 रुपये घे. ब म्हणाला आपण दोघे समान रक्कम वाटून घेऊ.भांडण काही मिटेना

 तर त्या 8 रुपयांची वाटणी तुम्ही कशी कराल ?

उत्तर-

प्रत्येक भाकरीचे समान 3 भाग केले

5 ×3 =15

3 ×3 =09

एकूण 24 भाग झाले . प्रत्येकाने समान म्हणजे प्रत्येकी 8 भाग खाल्ले .

अ= 15-8 = 7 रुपये

ब = 9-8 = 1 रुपये.