कुटप्रश्न –
12 दगड आहेत .या दगडांना 1
ते 12 असे क्रमांक दिले आहेत .या दगडावर एक चतुर पुढीलप्रमाणे उड्या मारत आहे.दर मिनिटाला
तो ज्या दगडावरून सुरु करतो त्यापासूनच्या पाचव्या दगडावर उडी मारतो.म्हणजे चौथ्या
दगडावरून नवव्या दगडावर.नवव्या दगडावरून दुसऱ्या दगडावर याप्रमाणे उड्या मारत
राहतो.जर त्याने दुसऱ्या दगडावरून उड्या ,मारायला सुरुवात केली तर 36 मिनिटानंतर
तो कोणत्या क्रमांकाच्या दगडावर असेल ?
उत्तर –तो दुसऱ्या दगडापासून
सुरुवात करतो. म्हणजेच 1 मिनिटांनंतर तो 7 व्या दगडावर असेल.त्यानंतर 12 व्या दगडावर
असेल. जर दगडांना 1 ते 12 क्रमांक व पुन्हा सुरुवातेच्या दगडाला 13 वा क्रमांक
दिल्यास याप्रमाणे उड्या मारत राहिल्यास म्हणजेच 36मिनिटात तो 36×5=180 व्या दगडावर
असेल.
180÷ 12 = 15 म्हणजे बाकी 0
उरते. याचा अर्थ तो दुसऱ्या दगडावरच येईल.