कुटप्रश्न –
एक शेतकरी होता.त्याला एक बैल खरेदी करायचा होता म्हणून तो बाजारात
गेला . बाजारात त्याला एक बैल पसंत पडला. त्याने एक सोन्याचे नाणे देऊन तो बैल खरेदी केला.तो घरी जायला निघाला तेव्हा
एक दुसरा व्यापारी त्याला भेटला . तो म्हणाला मी बैलासाठी दोन सोन्याची नाणी देतो
तो बैल मला द्या. शेतकऱ्याने
तो बैल 2 सोन्याची नाणी घेऊन विकला. आणि पुन्हा बाजारात गेला .आणखी एक बैल त्याला
पसंत पडला त्याने तो 3 सोन्याची नाणी देऊन खरेदी केला.व पुन्हा एकदा घरची वाट
पकडली .पुन्हा एक दुसरा व्यापारी भेटला त्याने 4 सोन्याची नाणी देऊन तो बैल
शेतकऱ्याकडून खरेदी केला . या व्यवहारात शेतकऱ्याला नफा अगर तोटा किती झाला ?