कुटप्रश्न
एकदा रामराव यांनी आपल्या जावयाला जेवणाचे आमंत्रण
देण्यासाठी फोन केला. तेव्हा जावयाने एक अट घातली. ती अशी मी महिन्याच्या 1
तारखेपासून 31 तारखेपर्यंत कोणत्याही दिवशी जेवायला येईन . ज्या दिवशी येईन त्या
दिवशी कोणती तारीख असेल त्या तारखेच्या संख्येच्या वजना इतकी ग्रामची सोन्याची
अंगठी मला द्यायची.ती अंगठी मी येण्यापूर्वी तयार असायला हवी.रामरावानी जावयाची अट
मान्य केली.
रामराव
अंगठी तयार करण्यासाठी सोनाराकडे गेले.त्यानी सर्व हकीकत सोनाराला सांगितली.व त्यानी 1 ते 31 तारखेच्या अंगठ्या तयार करण्यास
सोनाराला सांगितले. सोनार हुशार होता. त्याने फक्त 5 अंगठ्या तयार करून दिल्या व
सांगितले की तुमचा जावई ज्या दिवशी येईल त्या दिवसाची जी तारीख असेल ती अंगठी
तुम्हाला देता येईल . तर सोनाराने किती वजनाच्या अंगठ्या तयार केल्या असतील ?
उत्तर- सोनाराने खालीलप्रमाणे अंगठ्या तयार केल्या.
सदर पाच अंगठ्यांचा वापर करून 1 ते 31 दिवसाच्या कोणत्याही तारखेच्या क्रमांकाइतकी
अंगठी देता येईल .
1ग्राम
|
2 ग्राम |
4 ग्राम |
8 ग्राम |
16
ग्राम |