सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

जंगलात एका होतं झाड एका तळ्याच्या काठावर

शंभर हात उंच होतं ते तळ्यापासून दोनशे हातावर

झाडावरून निघाली माकडं दोन जायला तळ्याच्या काठी

पण मार्ग त्यानी निवडले वेगळे तिथे जाण्यासाठी

एकाने खाली उतरून घेतली चालत तळ्याची भेट

दुसरा मारून उडी मग गेला तिरकस थेट

दोघे पोहोचले एकाच वेळी कोणी आधी ना नंतर

कारण दोघांनी कापले होते अगदी सारखेच अंतर

सांगा बरं मारली दुसऱ्या माकडाने किती उंच उडी

मन लावून जर शिकला असाल गणित न खाता छडी

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

एक शेतकरी होता.त्याला  एक बैल खरेदी करायचा होता म्हणून तो बाजारात गेला . बाजारात त्याला एक बैल पसंत पडला. त्याने एक सोन्याचे नाणे देऊन  तो बैल खरेदी केला.तो घरी जायला निघाला तेव्हा एक दुसरा व्यापारी त्याला भेटला . तो म्हणाला मी बैलासाठी दोन सोन्याची नाणी देतो तो बैल मला द्या. शेतकऱ्याने तो बैल 2 सोन्याची नाणी घेऊन विकला. आणि पुन्हा बाजारात गेला .आणखी एक बैल त्याला पसंत पडला त्याने तो 3 सोन्याची  नाणी देऊन खरेदी केला.व पुन्हा एकदा घरची वाट पकडली .पुन्हा एक दुसरा व्यापारी भेटला त्याने 4 सोन्याची नाणी देऊन तो बैल शेतकऱ्याकडून खरेदी केला . या व्यवहारात शेतकऱ्याला नफा अगर तोटा किती झाला ?

मराठी भाषा गौरव दिन ---

 

मराठी भाषा गौरव दिन ---

--------------------------------------------------------------------------

वेदशास्त्राचा मतिथार्तु

मऱ्हाटीया जोडे फलीतार्थ

तरी चतुरी परीमार्थ

  का ने द्यावा

--- आद्यकवी मुकुंदराज

 

मराठी असे आमुची मायबोली

जरी भिन्नधर्मानुयायी असू

पुरी बाणली बंधुता अंतरंगी

हिच्या एक ताटात आम्ही बसू

   --- माधव जुलियन

माझ्या मराठी मातीचा

लावा ललाटास टिळा

हिच्या संगाने जागल्या

दऱ्याखोऱ्यातील शिळा

----कुसुमाग्रज

 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ , जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी

------सुरेश भट

थोडी शाब्दिक गंमत आहे…

" खळखळून हसा

 

एक वेलांटी सरकली,

पिताकडून पतीकडे आली.

 

एक काना सरकला,

राम ची रमा झाली.

 

दोन काना जोडले,

शरद ची शारदा झाली.

 

एक मात्रा सरकली,

खेर ची खरे झाली.

 

एक अक्षर घटले,

आठवले ची आठले झाली.

 

एक अक्षर बदलले, अन्

मालू ची शालू झाली.

कर्वे ची बर्वे झाली.

अत्रे ची छत्रे झाली.

गानू ची भानू झाली.

कानडे ची रानडे झाली.

 

लग्नानंतर नांवच उलटे केले,

निलिमाची मालिनी झाली.

 

पदोन्नती झाली,

प्रधान ची राजे झाली.

राणे ची रावराणे झाली.

देसाई ची सरदेसाई झाली.

अष्टपुत्रे ची दशपुत्रे झाली.

 

झुरळाला भिणारी ती,

दैवयोगाने वाघमारे झाली.

 

लेकराला कुरवाळीत,

पुढे लेकुरवाळी झाली.

 

एक पिढी सरकली, 

सुनेची सासू  झाली !!

 

*चिमा काय कामाची

* भाऊ तळ्यात उभा

* रामाला भाला मारा.

*काका वाचवा काका

*काका वाहवा काका

*ती होडी जाड होती

*तो कवि डालडा विकतो

*तो कवि सामोसा विकतो.

*टेप आणा आपटे

*शिवाजी लढेल जीवाशी

* सर जाताना प्या ना ताजा रस

*हाच तो चहा

* तो कवि कणिक विकतो

 

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

एका  राजवाड्याला 8 दरवाजे आहेत . त्यातील  दरवाजे आपोपाप उघडतात व बंद होतात. प्रत्येक वेळची स्थिती वेगवेगळी असते. उदा .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

पहिल्या स्थितीत सर्व दरवाजे उघडे आहेत.

दुसऱ्या स्थितीत पहिला एक दरवाजा बंद आहे.

तिसऱ्या स्थितीत दुसरा एक दरवाजा बंद आहे.

अशा प्रकारे  वरील दरवाजाच्या किती स्थिती आपणास मिळतील ?

उत्तर- एकूण 256 स्थिती पाहायला मिळतील .

 

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

एका व्यापाऱ्याकडे 40 घोडे होते . त्यांची निगा एक नोकर ठेवत असे. तबेल्यामध्ये  त्याने खालीलप्रमाणे घोडे बांधले होते .

1

9

1

9

 

9

1

9

1

 

 

 

 

तो व्यापारी ओळी व आडव्या रांगा मोजायचा .त्यांची बेरीज 11 आली. की तो सर्व घोडे आहेत असे समजायचा. नोकराच्या हे लक्षात आले. त्याने त्यातील 8 घोडे बाजूला काढले. व आडव्या व उभ्या रांगेतील बेरीज 11 येईल अशा पद्धतीने घोडे बांधले. व्यापारी दररोज फक्त आडव्या व उभ्या रांगेतील घोडे मोजायचा .पहिली चोरी पचली असे लक्षात आल्यावर  नोकराने  पुन्हा 8 घोडे बाजूला काढले . आडव्या व उभ्या रांगेतील बेरीज 11 येईल अशा पद्धतीने घोडे बांधले.व्यापाऱ्याचे 16 घोडे नोकराने कसे चोरले असतील ?उत्तर -  

          

3

5

3

5

 

5

3

5

3

 

9

1

1

1

 

1

1

1

9

                           

 

 

                                 

 

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

अ व ब दोन मित्र व्यापारासाठी परगावी निघाले होते. जाताना त्यानी सोबत शिदोरी घेतली होती. अ कडे 5 भाकरी होत्या . ब कडे 3 भाकरी होत्या. वाटेत ते जेवणासाठी थांबले त्यावेळी एक व्यक्ती तेथे आली. त्यालाही खूप भूक लागली होती. त्यानी त्यांना जेवणासाठी बोलावले. व तिघांनी मिळून एकत्रित जेवण केले. सर्वानी समान भाकरी खाल्ल्या. शेवटी निघताना तिसऱ्या व्यक्तीने दोघांना मिळून 8 रुपये दिले. व आपसात वाटून घ्या असे सांगितले. त्या दोघांमध्ये भांडण सुरु झाले . अ म्हणाला माझ्या 5 भाकरी होत्या तेव्हा मला 5 रुपये मिळाले पाहिजेत . व तुझ्या 3 भाकरी होत्या तुला 3 रुपये घे. ब म्हणाला आपण दोघे समान रक्कम वाटून घेऊ.भांडण काही मिटेना

 तर त्या 8 रुपयांची वाटणी तुम्ही कशी कराल ?

उत्तर-

प्रत्येक भाकरीचे समान 3 भाग केले

5 ×3 =15

3 ×3 =09

एकूण 24 भाग झाले . प्रत्येकाने समान म्हणजे प्रत्येकी 8 भाग खाल्ले .

अ= 15-8 = 7 रुपये

ब = 9-8 = 1 रुपये.

 

 

 

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

1 रुपयाला 40 केळी मिळतात. 3 रुपयाला 1 आंबा मिळतो. व 5 रुपयाला 1 सफरचंद मिळते. आपणास तीनही प्रकारची फळे खरेदी करायची आहेत.

तुमच्याकडे 100 रुपये आहेत .आणि तुम्हाला वरील प्रकारची 100 फळे खरेदी करायची आहेत . तर कोणती फळे किती घ्यावीत ?

उत्तर -

सफरचंद 

19

95

आंबा  

01

3

केळी

80

2

 

100

100

 

कुटप्रश्न –

 

कुटप्रश्न –

एका भक्ताजवळ काही रक्कम होती .मार्गातून जाताना त्याने चार देवतांना भेटी दिल्या.जेव्हा प्रत्येक देवळात पाउल ठेवले तेव्हा त्याच्याकडची रक्कम दुप्पट होते ,आणि तो प्रत्येक देवळात 100 रुपये देतो.जेव्हा तो चौथ्या देवळातून परतला तेव्हा त्याच्याकडे काही पैसे उरले नाहीत.तर भक्ताजवळ सुरुवातीला असलेली रक्कम कोणती ?

उत्तर – सुरुवातीची रक्कम =93.75

 

93.75.

 

मंदिर 1

187.5 -100

87.5

मंदिर 2

175-100

75

मंदिर 3

150-100

50

मंदिर 4

100-100

0