१. पहाटे गजर होतो ,घड्याळ नव्हे,डोक्यावर मुकुट पण राजा नव्हे----
२.पाने आहेत पण झाड नाही,पुष्कळ काही सांगते पण शब्द उमटत नाही--
३. खाते. पिते-जगते, उंच वाढते पण एक शब्द बोलत नाही की पाऊलभर चालत नाही---
४.राजा आहे पण राज्य नाही,वजीर नाही, राणी आहे, गुलाम आहे,पण दासी मात्र एक ही नाही हजर---
५.लाल, पिवळा रंग लाकूड फाटा खाऊन जगतो आणि काय नवल ? पाणी पिताच मरून जातो---
६.नाही उठणे , नाही चालणे,काही खाणे ना पिणे पण एकसारखे बोलणे नाही तर गाणे हेच याचे जिणे---
७.एवढेसे तोंड पण गर्जना कानठीळ्या बसवणारी कोण अशी ही दिसायला साधी , पण सर्वांना भय दाखवणारी ---
८.कोणता पक्षी असा रंग सुंदर गहिरा की? ज्याच्या शेपटावर चमकतात रुपये मोहोरा?
९.दुधाचा सारा एकच वाटोळा प्याला ! पण मेजवानी मात्र लग्नाच्या वऱ्हाडाला---
१०. हात नाही पाय नाही , डोके नाही , धडही नाही , तरीही साऱ्या माणसांना विसावा देई.असे कोण सई----
११.तळहाताएवढे शेत -शेतात तळे-तळ्यात वेलीचे मूळ पण वेलीला मात्र लागले पिवळेधमक आगीचे फूल---
१२. रात्री थोडा पाऊस पडे रानी, जलबिंदू चमकती पानोपानी पण चिमणीचीही तहान भागेना असे कोणते पाऊसपाणी---
१३.नाही थिएटर, नाही तिकीट,नाही स्टेज नाही पडदा दावी घरबसल्या सर्वांना चित्रपट कोण जादुगार एवढा ?
उत्तरे-(कोंबडा, पुस्तक, झाड, पत्ते, विस्तव, रेडीओ, तोफ, मोर,चंद्र आणि चांदणे, घर, दिवा, दवबिंदू, दूरदर्शन )