१.स्थायू, द्रव , वायू रूपे त्याची तीन , संस्कृतमध्ये त्याला म्हणतात जीवन---
२. सावली देते झाड नाही, पाणी देते आड नाही---
३. लुकलुक डोळे रात्रभर जागतात , सकाळी पाहिले तर छुमंतर होतात---
४. येता वसंतऋतू गाणी गोड गाते,कावळ्याच्या घरट्यात अंडी कोण घालते---
५. रूप दाखवतो पण आरसा नाही,हातात धरुनी पाहता येत नाही---
६. गुण गुण गाणे गुणगुणतो , फुकट सर्वांना इंजेक्शन देतो---
७. रिकामी दिसे परि रिकामी नसे , बाटलीत सांगा त्या काय बरे असे---
८.वाजते खूप पण ऐकू येत नाही,बंडीविना मात्र ती सोसत नाही---
९. सशासंगे शर्यत जिंकली काल , पाठीवर मिरवितो बक्षीसाची ढाल---
१०.तयार करता येते पण साठवता येत नाही,ती बहुपयोगी आहे पण कुणा दिसेना---
११. तीन भाऊ तीन तऱ्हेचे एक गरम त्रास देतो फार, दुसरा बरसे अमृतधार , तिसरा कधी करी बेजार , कोण बरे ओळखा---
१२. धातू आहे पण धरता येईना , पडता खाली हाती लागेना ---
१३.सजीव असुनी चालेना , दिवसा प्राणवायू घेईना , दानशूर मित्र मानवाचा माहित आहे का सर्वांना---
१४.पंख आहेत पण पक्षी नाही, अंडी तर तो घालत नाही अंधारातच भक्ष्य शोधतो, उलटे टांगून दिवसा झोपतो---
१५. पंधरा मिनिटांत करतो कमाल, तीन मजल्यावरील शिजवतो माल , आहे तो फार कामाचा नक्कीच तुमच्या ओळखीचा---
उत्तरे-(पाणी, ढग, चांदण्या,कोकिळा, पाणी, डास, हवा , थंडी, कासव, वीज, ऋतू, पारा, झाड, वाटवाघूळ, प्रेशर कुकर )