सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

प्रश्नमंजुषा

1. 12 मजूर रोज 9 तास काम करून 42 खेळणी बनवतात,तर 9 मजूर रोज 4 तास काम करून किती खेळणी बनवतील ?

2) एका दुकानदाराने दोन खुर्च्या प्रत्येकी 720 र.ला विकल्या .त्याला एकात खरेदीच्या 20 % नफा व दुसऱ्यात खरेदीच्या 20 % तोटा झाला; तर या व्यवहारात त्याला   शेकडा नफा अगर तोटा किती झाला?


3) A गावावरून B गावाकडे जाताना एक बस ताशी 30 कि.मी वेगाने जाते. व परत येताना 70 कि.मी. वेगाने येते. तर बसचा सरासरी वेग किती?

4) खालील महिन्यांच्या समोर दिलेल्या संख्यांचा संबंध लक्षात घेऊन पुढील दिलेल्या महिन्यासाठी कोणती संख्या येईल ?

JANUARY     71313
FEBRUARY   82382
MARCH        53113
APRIL           54203
MAY             35113
JUNE             46203
JULY              47113
AUGUST       68313
SEPTEMBER   ?

5) एक मजेदार कोडे-
विषमासूर नावाच्या राक्षसासमोर 1000 माणसे एका रांगेत उभी आहेत.
त्या रांगेमधील विषम क्रमांकावर असलेल्या सर्व लोकांना तो खावून टाकतो.
त्यानंतर उरलेल्या माणसांची रांग शिल्लक राहते. आता त्या रांगेतील विषम क्रमांकाच्या माणसांना  विषमासूर खावून टाकतो. असे करत करत रांग लहान होत जाते आणि शेवटी एक माणूस शिल्लक राहतो. तर तो शिल्लक राहिलेल्या माणसाचा 1000 लोकांच्या रांगेतील क्रमांक कितवा असेल ?

उत्तरे ( 14 खेळणी, 4 % तोटा ,  42 KM/H  , 99303, 512 )