सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

भोंडल्याची गाणी -2

 एक लिंबं झेलू बाई दोन लिंबं झेलू

दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू

तीन लिंबं झेलु बाई चार लिंबं झेलू

चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू

पाचा लिंबांचा पानोटा माळ घाली हनुमंता

हनुमंताची नीळी घोडी येताजाता कमळं तेडी

कमळाच्या पाठीमागे बसली राणी

अगं अगं राणी इथे कुठे पाणी पाणी नव्हे यमुना जमुना

यमुना जमुनाची बारीक वाळू तेथे खेळे चिल्लारी बाळू

चिल्लारी बाळाला भूक लागली सोन्याच्या शिंप्याने दूध पाजले

नीज रे नीज रे चिल्लारी बाळा मी तर जातो सोनारदादा

सोनारदादा सोनारदादा गौरीच्या मुगूटी झाल्या की नाही

गौरीच्या घरी तांब्याच्या चुली आमच्या घरी मातीच्या चुली