सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

गणित सराव

 

* दोन इनलेट पाईप्स अनुक्रमे 40 तास आणि 48 तासात एक रिकामी टाकी भरू शकतात तसेच एक आऊटलेट पाईप प्रति तास 35 गॅलन पाणी बाहेर काढते जर हे तिन्ही पाईप्स एकत्र चालू केले तर ती टाकी 40 तासांत भरते तर त्या टाकीची क्षमता किती आहे .(1680 गॅलन )

* दोन अंकी सम संख्यांची बेरीज किती ? (2430 )

* एका त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप 125 अंश आहे व त्या बाह्यकोनाला संलग्न नसलेल्या एका आंतर कोनाचे माप 70 अंश आहे तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा ? ( समद्विभुज त्रिकोण )

*जेव्हा दोन फासे एकत्र फिरवले जातात तेव्हा दोन्ही फाशांवरील संख्यांची बेरीज नऊ येण्याची किती संभाव्यता  असते ? (1/9 )

* एक वस्तू तिच्या प्रत्यक्ष विक्री किमतीच्या 2/5 दराने विकल्याने मानवाला 24% तोटा होतो जर त्याने ती वस्तू तिच्या प्रत्यक्ष विक्री किमतीच्या 88% ने विकली तर नफ्याचे टक्केवारी किती असेल ? (67.2 )

*अ व ब चे वार्षिक उत्पन्न चारास तीन प्रमाणात असून खर्चाचे प्रमाण 3:2 आहे प्रत्येकाजवळ वर्षा शेवटी सहाशे रुपये शिल्लक राहिले तर अ चे वार्षिक उत्पन्न किती ? (2400 )

* एक सायकल स्वार सकाळी सात वाजता ताशी पाच किलोमीटर या वेगाने प्रवास सुरू करतो प्रत्येक एक तासाच्या प्रवासानंतर दहा मिनिटे विश्रांती घेतो तर तीस किलोमीटर अंतरावर गावी तो किती वाजता पोहोचेल ? ( दुपारी 1 वा 50 मि )

* एक नळ एक टाकी सहा मिनिटात भरतो दुसरा नळ तीच टाकी चार मिनिटात रिकामी करतो जर टाकी आधीच  3/4 भाग भरलेली असेल तर दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात रिकामी होईल ? ( 9 मिनीटे )

* जर  Aआणि B या दोन संख्यांची सरासरी 20 आहे B आणि C यांचे सरासरी 19 आहे C   A ची सरासरी 21 आहे तर A किंमत काय ? (22 )

* मोटार गाडी A 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर मोटार गाडी B 140 किलोमीटर प्रतितास वेगाने धावते दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात मोटार गाडी B ही मोटार गाडी  A च्या 80 किलोमीटर पुढे आहे तर मोटर गाडी A मोटार गाडी B  पर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागेल ? ( 4 तास )

* पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला 12% गुण जास्त आहेत व गीताला 50%गुण कमी आहेत दोघींच्या गुणांमधील फरक 51 असेल तर परीक्षा किती गुणांची होती ? (300 )

* एका शहराची लोकसंख्या पहिल्या वर्षी 30 टक्के वाढली आणि पुढच्या वर्षी 15टक्के कमी झाली जर सध्याचे लोकसंख्या 22 100 असेल तर दोन वर्षांपूर्वी लोकसंख्या किती होती ?

* A एक मोबाईल  B ला 20% नफ्याने विकला तोच मोबाईल B ने 25% नफ्याने  C ला विकला . जर तो मोबाईल C ला 15000 रु ला मिळाला तर मोबाईलची मूळ किंमत किती ? (10000 )

* 4000 रुपये दोन भागात सरळ व्याजावर उसने दिले . जर एका भागावर 8% वार्षिक आहे . आणि दुसऱ्या भागावर ही दर 10% वार्षिक आहे तर एकूण वार्षिक व्याज रु 352 मिळेल तर 8% वार्षिक दरावर किती रक्कम दिली ? (2400 )

 

* एका ठराविक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या 2 वर्षासाठी 6% पुढील 5 वर्षासाठी 9 % व पुढील शिल्लक कालावधीसाठी 13 % आहे . जर 10 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज 7680 रुपये मिळत असेल तर मुद्दलाची रक्कम किती असेल ? (8000 रु )

* एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एका आयताच्या क्षेत्रफळाइतके आहे जर त्या वर्तुळाचा व्यास आणि आयताची लांबी 140 मीटर असल्यास त्या आयताची रुंदी किती असेल ? 110 मी