सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts

वाक्प्रचार -२

 

* सुन्न होणे - बधिर होणे.

* भास होणे - भ्रम होणे.

* नजर खिळणे -  एका जागेवर लक्ष लागणे.

*नखशिखान्त न्याहाळणे - आपादमस्तक नीट पाहणे.

* भंग करणे - मध्येच खंडित करणे.

* कणव निर्माण होणे - दया येणे.

* हायसे वाटणे- जिवाला शांती मिळणे, बरे वाटणे.

* चेहरा खुलणे - मुखावर आनंद दिसणे.

* चोरट्या नजरेने पाहणे - गुपचूप पाहणे.

* प्रेम वाटणे - आपुलकी निर्माण होणे

* मनात घिरट्या घालणे - (एखादा विचार) मनात फिरत राहणे.

* मुक्या शब्दांचा मार देणे -  न बोलता समज देणे.

* उत्साह द्विगुणित करणे - उत्साह वाढवणे.

* भुरळ घालणे - भूल पडणे, मोह होणे.

* दातखिळी बसणे - घाबरून बोलता न येणे.

* मनात घर करणे-  मनात रुतून बसणे.

* घाबरगुंडी उडणे - घाबरून जाणे.

* काळजात धस्स होणे - घाबरल्यामुळे धक्का बसणे.

* छाप पाडणे ठसा उमटवणे,-  प्रभाव पाडणे.

* शिरकाव करणे - आत घुसणे.

* चाहूल घेणे - अंदाज घेणे.

* बोबडी वळणे - घाबरल्यामुळे शब्द न फुटणे.

* चूर होणे - बारीक कण होऊन विखरणे, फुटून जाणे, हरवून जाणे.

* तत्पर असणे - लगेच तयार असणे.

* स्वागत करणे - सन्मानाने बोलावणे.

* पर्वा न करणे - काळजी न करणे, तमा न बाळगणे.

* प्रदर्शन मांडणे - दाखवणे, जाहीर करणे.

*जीभ चाचरणे - खरे बोलताना अडखळणे.

* वारे वाहू लागणे - (विशेष गोष्टींचे) आगमन होणे.

*डोळे मिचकावणे - खोडसाळपणे नजरेने इशारा करणे.

* उणीव असणे - कमतरता असणे.

*पुरते झपाटणे - च्या प्रभावाखाली येणे.

* सलाम करणे- नमस्कार करणे.

* कमवणे- काम करून पैसे मिळवणे.

* हृदयाला स्पर्श करणे -मनाला आकळणे.

* निरोप ठेवणे – सांगावा देणे.

* धावपळ असणे - घाईगडबड असणे.

* निधी गोळा करणे - रक्कम (पैसे) जमा करणे.

* पदरात पाडून घेणे - स्वतःला मिळेल अशी व्यवस्था

* आयुष्यातून उठणे - मरण पावणे.

*  आग्रह असणे – पाठपुरावा करीत राहणे.

* परवडणे – पैसे खर्च करण्याची क्षमता असणे.

* मन हेलावणे – गलबलून जाणे.

* आश्चर्य वाटणे - नवल वाटणे, चकित होणे.

* मदतीला धावून जाणे - तत्परतेने मदत करणे.

* नशीब खोटे असणे - दैव खराब असणे, नशीब फुटके अ

* नशिबात वाढून ठेवणे- वाट्याला येणे.

* तोंडून शब्द न फुटणे - बोलती बंद होणे, बोलता न येणे

* डोळे पुसणे - रडू आवरणे.

*जीव वाचणे - जीव शाबूत राहणे.

* पाणी गालावरून वाहणे - रडणे.

*थक्क होणे - आश्चर्यचकित होणे.

* झुंज देणे – सामना करणे, टक्कर देणे.

* मेहरबानी असणे - वरदहस्त असणे, आधार असणे.

* शब्द पचनी पडणे - मनापासून समजणे, कळणे.

* नकार देणे,- धुडकावून लावणे.

*मोठ्या आवाजात हसणे.- खो हसणे

*हेका धरणे - हट्ट करणे.

* ठेका घेणे -बाजू घेणे (कंत्राट घेणे)

* सहभागी होणे - सामील होणे.

* बाजी मारणे- जिंकणे.

* ताव मारणे -भरपूर जेवणे.

* गालातल्या गालात हसणे – स्मित हास्य करणे

* वाण नसणे- कमतरता नसणे.

* निरीक्षण करणे - सर्व बाजूंनी नीट पाहणे.

* सुगावा लागणे - शोध लागणे

* कार्यरत असणे - कामामध्ये गुंतणे.

* लक्षणे दिसणे - मागमूस लागणे, खुणा सापडणे.

* खूण करणे- इशारा करणे.

* गुंग होणे - मग्न होणे.

* विसर पडणे - भान नसणे, विसरणे.

* भास होणे - भ्रम होणे.

*दबा धरून बसणे - हल्ला करण्यासाठी लपून बसणे.

* झडप घालणे - झेप घेणे.

* पारखे होणे -वंचित राहणे.

* पारध होणे - शिकार होणे.

* गिरकी घेणे - स्वतःभोवती गोल फिरणे.

* उत्कंठा वाढणे - उत्सुकता वाढणे.

* जाण असणे- माहीत असणे.

* अधीर होणे- बेचैन होणे, अस्वस्थ होणे.

* टक लावून पाहणे- एका गोष्टीकडे सतत पाहणे.

* साकार होणे - प्रत्यक्ष दिसणे.

* चुळबूळ करणे-  अस्वस्थपणे हालचाल करणे.

* लक्ष वेधणे - नजर खेचून घेणे.

* मागमूस नसणे - माहीत नसणे, न दिसणे.

* दृष्टिआड होणे - न दिसणे.

* प्रभावित होणे - प्रभाव पडणे, ठसा उमटणे.

* अवलंब करणे - स्वीकारणे.

* त्याग करणे - सोडून देणे.

* जादूची कांडी फिरणे चमत्कार होणे.

* विजेच्या गतीने नाहीसे होणे झटकन दिसेनासे होणे.

* रस नसणे आवड नसणे.

* विल्हेवाट लावणे - नाहीसे करणे.

* पढवणे - शिकवण देणे.

* जमिनीला खिळून राहणे - एका जागी राहणे.

* विळखा घालणे - चोहोबाजूंनी गच्च आवळणे

* भंडावून सोडणे - हैराण करणे.

* रमणे - गुंतणे, गुंग होणे, आनंद वाटणे.

* धास्तावणे - घाबरणे.

* भ्रम असणे -भास होणे.

* आशाळभूत नजरेने पाहणे - केविलवाणे होणे.

* अर्थबोध न होणे - काही न समजणे.

* नजर चुकवणे - पाहायचे टाळणे.

* कुतूहल जागृत होणे - उत्सुकता निर्माण होणे.

* ओढले जाणे - आकर्षित होणे.

* गांगरणे - गोंधळणे, बावरणे.

* तर्क करणे - अंदाज लावणे.

* शहारणे - अंगावर काटा येणे.

* अंमल चढणे - च्या गुंगीत जाणे, अधीन होणे.

*  हृदय धडधडणे - घाबरणे.

*घालमेल होणे - मन अस्वस्थ होणे, हळहळ वाटणे.

* ठाम निश्चय करणे-  पक्का निर्धार करणे.

* आशाळभूत नजरेने पाहणे - केविलवाणे होणे.

* अर्थबोध न होणे - काही न समजणे.

* नजर चुकवणे - पाहायचे टाळणे.

* कुतूहल जागृत होणे - उत्सुकता निर्माण होणे.

* ओढले जाणे - आकर्षित होणे.

* गांगरणे - गोंधळणे, बावरणे.

* तर्क करणे - अंदाज लावणे.

* शहारणे - अंगावर काटा येणे

* हृदय धडधडणे - घाबरणे.

* घालमेल होणे - मन अस्वस्थ होणे, हळहळ वाटणे.

* ठाम निश्चय करणे - पक्का निर्धार करणे

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

 वाक्प्रचार व त्यांचे अर्थ 

* तुच्च्छ लेखणे - एखाद्याला  कमी दर्जाचे समजणे

*सल्ला देणे- योग्य मार्गदर्शन करणे

*अभाव असणे - कमतरता असणे 

*गराडा पडणे- भोवतीने घेराव पडणे 

* फुलवून सांगणे - एखादी गोष्ट रंगवून सांगणे 

* मती कुंठित होणे- बुद्धी न चालणे 

* संभ्रमात पडणे- भ्रम निर्माण होणे 

* तल्लीन होणे- गुंग होणे

* घासाघीस करणे- वस्तूचा दर कमी करण्यासाठी बोलणे.

* तरतरी पेरणे- उत्साह आणणे

*टकामका पाहणे- लक्षपूर्वक एकटक पाहणे

*मनोमन ठरवणे- निश्चय पक्का करणे 

*गहिवरून येणे- भावनेने मनात गलबलून येणे 

*मनात काहूर उठणे -मनात विचारांचे वादळ येणे 

* तांबड फुटणे- पहाट होणे 

*दिवस माथ्यावर येणे - दुपार होणे

* हबकून जाणे - घाबरणे 

*मनात उलघाल होणे- अस्वस्थ होणे 

*वाटेला लागणे- मार्गाने जाणे 

* खुटून बसणे- रुसून बसणे

*नजर खीळणे- नजर एका जागी स्थिर राहणे

*उलगडा न होणे- न समजणे 

* हातभार लावणे - मदत करणे

*गाडी रुळावर येणे - पुन्हा व्यवस्थित होणे

* माघारी फिरणे- परत येणे

*मानेला झटका देणे- नाराजी व्यक्त करणे 

*साद घालणे - हाक मारणे

*साथ देणे - सोबत असणे 

*आबाळ होणे - नीट देखभाल न होणे

*स्तुती करणे- प्रशंसा करणे

*मान फिरवणे - नाराजी व्यक्त करणे

*तोंड उघडणे - बोलायला सुरुवात करणे

*उभारी येणे- उत्साह वाटणे

*आडवे येणे- बंधन घालणे 

* आनंदाला पारावर न राहणे - खूप आनंद होणे

*डोळे पाण्याने भरणे- रडू येणे

* विराजमान होणे - आसनावर ऐटीत बसणे

* मान डोलावणे - होकार देणे

*प्रसार होणे- प्रचार होणे, सर्वाना माहित होणे

*आभार मानणे- धन्यवाद देणे 

वर्णमाला –

 

वर्णमाला –

 

1)  अं आणि अः यांना काय म्हणतात ?

1)  स्वरादी         2) अनुस्वार     3) स्वर         4) मूलवर्ण

2)  खालीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ?

1)                2)ख          3) भ           4)ध

3)  सजातीय स्वरांची जोडी ओळखा .

1)                2)  अ इ      3) इ ए          4) अ ई

4)  पुढीलपैकी कोणती दोन व्यंजने जोडाक्षरे आहेत ?

1)  ग घ             2) ज झ      3)  प फ         4)  क्ष ज्ञ

5)  घर्षण व्यंजन ओळखा .

1)                 2)          3)स             4) च

6)  खालील अक्षरातील व्यंजन ओळखा .

1)                2) आ            3)          4) य

7)  महाप्राण व्यंजन ओळखा .

1)                  2) ळ             3) क्ष         4) ज्ञ

8) पुढीलपैकी कोणते व्यंजन कंठस्थानी आहे ?

1)                 2)              3)प          4) क

9)  अनुनासिकांना असेही म्हणतात .

1)  मात्रा           2) परसवर्ण    3)  सजातीय स्वर    4) विजातीय स्वर

10)  प फ ब भ म या व्यंजन उच्चार प्रकाराला ..............  म्हणतात

1)  कंठ्य         2) तालव्य       3)  ओष्ट्य       4) वरील सर्व चूक

11)  ङ ञ ण न म यांना कोणत्या प्रकारचे वर्ण म्हणतात ?

1)  स्वरादी         2)  अनुनासिक  3) व्यंजन          4) स्वर

12)  मुल ध्वनीच्या यादीला पुढीलपैकी काय म्हणाल ?

1) वर्ण            2)वर्णमाला        3) लिपी          4)दृश्यचिन्हे

13)  अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना आधीच स्वर यावा लागतो म्हणून त्यांना ............असे म्हणतात .

1)  स्वर          2) स्वरादी        3)अनुस्वार         4) व्यंजन

14) संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविड भाषेतून मराठीत आलेला  मूर्धन्य  वर्ण कोणता ?

1)              2) ट            3)ढ                4)ळ

15)  क्ष आणि ज्ञ यांना कोणती व्यंजने म्हणून ओळखतात ?

1)  संयुक्त व्यंजने  2) व्यंजने  3) कठोर व्यंजने   4) मृदू व्यंजने

16) ख झ  या वर्णांना काय म्हणतात ?

1) कठोर व्यंजन    2) मृदू व्यंजन 3)महाप्राण     4)स्वतंत्र

17)  खालीलपैकी नाद वर्ण कोणता ?

1)             2) फ         3) द          4)ख

18)  खालीलपैकी गटात न बसणारे अक्षर ओळखा

1)              2)इ            3) ई         4)उ

19)  खालीलपैकी कोणत्या शब्दातील अंत्यस्वर पूर्ण उच्चारला जातो ?

1)  वार           2) गृह          3) धन       4)पुस्तक

20) वर्णमालेमध्ये अर्ध स्वरांना काय म्हणतात ?

1)  ऊष्मे          2)महाप्राण        3)अंतस्थ     4)व्यंजने

21)  खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते ?

1)             2)ज              3)द         4)ब

22)  उच्चार स्थानानुसार तालव्यवर्ण कोणता ?

1)              2) ए             3)ऋ          4)आ

23) पंगत या शब्दातील अनुस्वाराचा  उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारासमान आहे ?

1)  वंदन          2) संरक्षण           3)पंख       4)संधान

24)  ज्ञानचक्षु या शब्दात एकूण मूलध्वनी किती आहेत ?

1) 10           2) 11           3) 9              4) 8

25) जीवन चक्र या शब्दातील च या वर्णाचे उच्चार स्थान कोणते ?

1) दंततालव्य     2) कंठ           3)तालव्य         4)मूर्धन्य

26) कृपा कलृपती ज्ञानेश्वर नैऋत्य अमृतध्वनी या शब्दांमध्ये एकूण जोडाक्षर किती आहेत ?

1) 6           2)4               3)5               4)7

27)  मराठी भाषेचे लेखन आपण कोणत्या लिपीत करतो ?

1)अर्धमागधी  2)देवनागरी         3)पाली           4)मोडी

28) खालीलपैकी कोणता दीर्घ स्वर हा संयुक्त स्वर नाही ?

1)        2)ए                 3) ऐ           4)ओ

29) ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनला आहे  ?

1) अ + इ    2)आ+ उ            3)आ + ऊ      4)अ + ऊ

30) खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?

1) ए= आ + इ  2) ओ = अ ऊ   3)औ = आ + ऊ   4)ऐ = अ + ई

31) व या वर्णाचे उच्चार स्थान कोणते

1) दंतौष्ट्य     2)कंठौष्ठय       3)ओष्ठय          4)मूर्धन्य

32) खालीलपैकी कोणत्या अनुनासिकाचे उच्चार स्थान मूर्धन्य आहे ?

1)          2)ङ            3)ञ             4)ण

33) खालीलपैकी कोणते मृदू व्यंजन दंत्य आहे ?

1)          2)थ            3)म             4)त

34)  चक्र या शब्दातील स हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

1) तालव्य      2)मूर्धन्य      3)दंततालव्य        4)कंठतालव्य

35) जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे १

1) तालव्य       2)मूर्धन्य      3)दंततालव्य       4)कंठतालव्य

36) खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार तालव्य आहे ?

1) जमात        2)जल        3)जावई            4)जात

37)  खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार दंत तालव्य आहे ?

1) जरा         2)चंद्र          3)छत्री             4)जन्म

38) खालीलपैकी  ओष्ठय  असलेले कठोर व्यंजन कोणते

1)             2)प           3)म              4)भ

39)  खालीलपैकी उच्चारानुसार  मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता

1)            2)र            3)ष              4)स

40)  ऋ हा स्वर  खालीलपैकी कोणत्या प्रकारचा स्वर आहे १

1) ओष्ठ्य        2) मूर्धन्य       3)तालव्य         4)कंठ्य

41) खाली दिलेल्या स्वरांच्या यादीतून संयुक्त स्वर ओळखा.

1) अ आ          2) इ उ      3) ए ऐ     4) ओ औ

1) पर्याय 1व3     2)पर्याय 2व4   3) पर्याय 1 व 4      4)पर्याय 3 व 4

42) मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत ?

1)  12          2) 2           3) 34           4) 14

43) संयुक्त नसणारा स्वर कोणता ?

1) ए           2) औ          3)ई             4)आ

44) मराठी वर्णमालेत किती स्पर्श व्यंजने  आहेत ?

1)  12          2) 2           3) 34           4) 14

45) ओष्ट्य उच्चार स्थान असणारे स्वर कोणते ?

1) उ ऊ       2) इ ई           3) ए ऐ           4) अ आ

46) अ आ - या वर्णाचे उच्चारस्थान कोणते ?

1) मूर्धन्य     2) कंठ्य          3) तालव्य          4) दंत्य

47) कर्तव्यदक्ष या शब्दात किती व्यंजने आली आहेत ?

1) आठ         2) सात         3) सहा            4) नऊ

48) ज्ञानामृत  या शब्दात किती व्यंजने आली आहेत ?

1) आठ         2) सात         3) सहा            4) नऊ

49) खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार म या अनुनासिकाप्रमाणे होतो ?

1) अंतर         2) अंबर         3) अंजन         4) अंगण

50) ज्ञानेंद्रिय  - या शब्दात किती व्यंजने आली आहेत ?

1) आठ         2) सात         3) सहा            4) नऊ