सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

वर्णमाला स्वर

  1.आपल्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना ........ म्हणतात .

 2.मराठी वर्णमालेत किती स्वर आहेत ?

3.मराठी वर्णमालेत ऱ्हस्व स्वर किती ?

4.मराठी वर्णमालेत दीर्घ स्वर किती ?

 5.मराठी वर्णमालेत संयुक्त स्वर किती आहेत ?

 6. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना .... म्हणतात .

 7. मराठी वर्णमालेत स्वरादी किती आहेत ?

 8. मराठी भाषेतील ऱ्हस्व स्वर कोणते ?

9.मराठी भाषेतील दीर्घ स्वर कोणते  

 10 . अं आणि अः यांना काय म्हणतात ?

 11. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात ?

12. भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात ?

13 . संयुक्त स्वर कोणते आहेत ?

14. ए - हा संयुक्त स्वर कोणते दोन विजातीय स्वर मिळून तयार होतो ?

 15. ऐ - हा संयुक्त स्वर कोणते दोन विजातीय स्वर मिळून तयार होतो ?

 16. ओ - हा संयुक्त स्वर कोणते दोन विजातीय स्वर मिळून तयार होतो ?

17. औ - हा संयुक्त स्वर कोणते दोन विजातीय स्वर मिळून तयार होतो ?

 18. सजातीय स्वरांच्या जोड्या लिहा .

 19 .  :  या चिन्हाला काय म्हणतात ?

 20. मराठी भाषेची लिपी कोणती आहे ?