सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

कुटप्रश्न --

 

   कुटप्रश्न --

एका खोलीत उंदराची चार बिळे होती. एक मांजर उंदीर खाण्यासाठी बसले आहे.

* मांजर प्रत्येक वेळी समान उंदीर खातो.तो क्रमाने बीळ क्र. 1 ते 4 कडे जातो.पहिल्या  बिळाजवळ जेवढे उंदीर खातो त्यावेळी शिल्लक उंदीर दुसऱ्या बिळाकडे जातात तेव्हा त्यांची संख्या दुप्पट होते.पुन्हा पहिल्या बिळाजवळ जेवढे उंदीर खातो तेवढेच उंदीर तो दुसऱ्या बिळाजवळ खातो.व उर्वरित उंदीर तिसऱ्या बिळाकडे जातात तेव्हा त्यांची संख्या तिप्पट होते.पुन्हा ते मांजर पहिल्या बिळाजवळ जेवढे उंदीर खातो तेवढेच उंदीर तो तिसऱ्या  बिळाजवळ खातो. उर्वरित उंदीर चौथ्या बिळाकडे जातात तेव्हा त्यांची संख्या चौपट होते. पहिल्या बिळाजवळ जेवढे उंदीर खातो तेवढेच उंदीर तो चौथ्या  बिळाजवळ खातो. त्यावेळी एकही उंदीर शिल्लक राहत नाही . तर पहिल्या बिळाजवळ सुरुवातीला किती उंदीर होते.व मांजराने किती उंदीर प्रत्येकवेळी खाल्ले.

 

उत्तर-

1) 41-24 =17

2) 34-24=10      ( 17 ×2  )

3) 30-24 =6       ( 10 ×3 )

4) 24-24 =0       ( 6 × 4 )