सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

काळ -काम उदाहरणे

1) A हा एक काम 20 दिवसात करतो. व B हा तेच काम 30 दिवसात करतो .तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

( उत्तर- 12 दिवस )

2)  A व B दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. A एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर B एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल ? ( उत्तर – 30 दिवस )

3) A, B व C अनुक्रमे एक काम 12,15,20 दिवसात पूर्ण करतात.तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ? ( उत्तर- 5 दिवसात )

4) A, B व C तिघे मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. B एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो . व C ते काम 30 दिवसात पूर्ण करतो. तर A एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ? (उत्तर- 24 दिवसात

5) A व B एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. B व C  तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. व A आणि C तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात.तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ? (उत्तर- 10 दिवस )

6) A व B एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. B व C  तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. व A आणि C तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात.तर A एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करतील ? (उत्तर- 30 दिवस )

7) A हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो . B हा तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. A ने 8 दिवस काम केले व निघून गेला.तर उरलेले काम B किती दिवसात पूर्ण करेल ? ( उत्तर – 18 दिवस )

8)A हा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. B हा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. सर्वप्रथम B कामावर आला त्याने 2 दिवस काम केले व निघून गेला . A कामावर येऊन 3 दिवस काम करून निघून गेला . तर उरलेले काम B किती दिवसात पूर्ण करेल ? (उत्तर – 12 दिवसात )

9) A हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. B हा तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो.दोघांना मिळून त्या कामाचे 435 रु. मिळतात. तर प्रत्येकाचा वाटा किती ? ( उत्तर- A- 261 रु. व B- 174 रु )

10)A हा B पेक्षा 30% जास्त कार्यक्षम आहे . A एकटा तेच काम 23 दिवसात पूर्ण करतो.तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

( उत्तर- 13 दिवसात )

11)A हा B च्या दुप्पट कार्यक्षम आहे.दोघे मिळून ते काम 18 दिवसात पूर्ण करतात . तर A एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल  व B एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल ? (उत्तर –A-27 दिवस , B-54 दिवस )

12) A हा एक काम 30 दिवसात व B 20 दिवसात एक काम करतो.दोघे एकत्र कामाला सुरुवात करतात. B हा काम संपायच्या 5 दिवस आधी निघून जातो.तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल ?

(उत्तर- 15 दिवस )