1)A हा नळ एक टाकी 10
मिनिटात भरतो .व B हा नळ तीच टाकी 15
मिनिटात भरतो . जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरु केले तर ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ
लागेल ? ( उत्तर- 6 मिनिटात ).
2) A हा नळ एक टाकी 12
मिनिटात भरतो .व B हा नळ तीच टाकी 15
मिनिटात भरतो . व C हा नळ तीच टाकी 20 मिनिटात भरतो.जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरु केले तर ती टाकी पूर्ण भरण्यास
किती वेळ लागेल ?
( उत्तर- 5 मिनिटात ).
3) A हा नळ एक टाकी 12
मिनिटात भरतो .व B हा नळ तीच टाकी 15
मिनिटात भरतो . व C हा नळ तीच टाकी 20 मिनिटात रिकामी करतो .जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरु केले तर ती रिकामी टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल ?
( उत्तर- 10 मिनिटात ).
4) A हा नळ एक टाकी 8 तासात
भरतो .व B हा नळ तीच टाकी 18 तासात भरतो . सुरुवातीला A हा नळ 2 तास सुरु केला व
बंद केला .तर उर्वरित टाकी B हा नळ किती तासात भरेल ?
( उत्तर- 13.5 तासात ).
5) A हा नळ एक टाकी 12
तासात भरतो .व B हा नळ तीच टाकी 20तासात भरतो . सुरुवातीला A हा नळ 3 तास सुरु केला व
बंद केला .तर टाकी थोडी भरली जाईल.तर थोडी भरलेली टाकी B हा नळ किती तासात रिकामी
करेल ?
( उत्तर- 13.5 तासात ).
6) 3) A हा नळ एक टाकी 12
मिनिटात भरतो .व B हा नळ तीच टाकी 15
मिनिटात भरतो . व C हा नळ तीच टाकी 20 मिनिटात रिकामी करतो .
सुरुवातीला A हा नळ 6मिनिटे सुरु केला व बंद केला .नंतर C
हा नळ 4 मिनिटे सुरु केला व बंद केला.तर उरलेली टाकी B हा नळ किती मिनिटात भरेल ? ( उत्तर -10.5 मिनिटात )
7) समान व्यासाच्या 8 नळाने एक टाकी 9 मिनिटात भरते
. तर त्याच व्यासाच्या 6 नळाने ती टाकी किती मिनिटात भरेल ? (उत्तर- 12 मिनिटात )
8)
एक नळ एक टाकी 18 तासात भरतो . टाकीला छीद्र असल्यामुळे ती टाकी भरायला 6 तासाने
उशीर होतो.तर ते छिद्र संपूर्ण भरलेली
टाकी किती तासात पूर्ण रिकामी करेल ? ( उत्तर- 72 तासात )