अभिनयाचे चार प्रकार :
(१) आंगिक अभिनय
चेहऱ्यावरून व्यक्त
होणाऱ्या भावना, तसेच हात, पाय, धड इत्यादी शरीराच्या अवयवांच्या विशिष्ट स्थितीतून व्यक्त
होणाच्या भावना, अशा अभिनयाला आंगिक अभिनय म्हटले आहे. याचे वर्णन करण्यासाठी
शरीराचे ढोबळ विभाग सांगितले आहेत. प्रमुख अंग - हात, पाय, डोके, छाती, बाजू (काखेपासून
कमरेपर्यंत) व कमर.
उपांग
हाताचे पंजे, पावले, बोटे, मान, पोट, पाठ, मांड्या, मनगटे इत्यादी.
प्रत्यंगे
चेहऱ्यावरील छोटे अवयव डोळे, भिवया, पापण्या, ओठ, गाल व हनुवटी.
या अवयवांच्या हालचालींतून
किंवा विशिष्ट ठेवणीतून एखादा भाव व्यक्त होत असतो. उदा., हाताची घडी घालून ताठ उभे
राहणे, खांदे
ताठ, हनुवटी
किंचित उचललेली दृष्टी स्थिर-सम, हसरा चेहरा यांतून एक आत्मविश्वासपूर्ण आकृती दिसते. याउलट
पडलेले खांदे, झुकलेले डोके, पाठीत बाक, दुसऱ्याच्या चेहऱ्याकडे न पाहता तिसरीकडेच पाहून बोलणे, अस्पष्ट, अडखळणे या लकबीत
आत्मविश्वासाचा अभाव दिसतो. डोळे मोठे करून गरागरा फिरवत येरझाऱ्या घालणारी
व्यक्ती चिडलेली दिसते. या प्रकारे शारीरिक हालचालींतून भाव व्यक्त होतात.
(२)
वाचिक अभिनय
आपण व्यवहारात बोलताना कधीच
एका पट्टीत एका सुरात बोलत नाही. चढ -उतार असतात. महत्त्वाचा शब्द
उच्चारण्यापूर्वी क्षणभर थांबणे, विशिष्ट शब्दांवर जोर
देणे, कधी
सावकाश तर कधी जलद शब्द उच्चारणे अशा विविधतेतून आपल्या म्हणण्याचा अर्थ
समोरच्याला समजतो. अभिनय करताना संवाद आणण्याचे खास तंत्र असते. त्याचा अभ्यास
करून संवाद म्हटल्यास नाटक प्रभावी होते. यालाच वाचिक अभिनय म्हणतात.
(३) आहार्य अभिनय
व्यक्तिरेखेनुसार वेशभूषा व
रंगमंचावर योग्य प्रसंगानुरूप वस्तू अथवा चित्रांची मांडणी करणे म्हणजेच आहार्य
अभिनय, उदा., एखादया ऐतिहासिक
व्यक्तिरेखेची वेशभूषा, वृद्ध-तरुण इत्यादी वयानुरूप केलेली रंगभूषा यांतून नाट्य अधिक
खुलते.
(४) सात्त्विक अभिनय
काही वेळा एखादी भावना
अतिशय तीव्र होऊन आपल्या मनाचा इतका ताबा घेते, की नकळत त्याचे परिणाम शरीरावर दिसतात. त्याला
सात्त्विक अभिनय असे म्हणतात. उदा., तीव्रतेने भीती वाटल्याने कांती पांढरी पडणे, मानसिक धक्का बसून बेशुद्ध
पडणे, अतिशय
सुंदर दृश्य पाहून अंगावर रोगांच येणे, खूप वाईट वाटून डोळ्यांतून अश्रू वाहणे इत्यादी. अशा
प्रकारचा अभिनय ठरवून करता येत नाही. त्यासाठी नटाला फार तन्मय व्हावे लागते.