सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

लिंग विचार -४

lलिंग विचार-४

खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय शोधा.
  1. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय शोधा.

  2. वाघ
    हत्ती
    हरीण
    गाय

  3. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय शोधा.

  4. मूल
    चूल
    फूल
    पूल

  5. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय शोधा.

  6. नगर
    गाव
    दिशा
    राज्य

  7. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय शोधा.

  8. भिंत
    छत
    दरवाजा
    अंगण

  9. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय शोधा.

  10. ओढा
    प्रवाह
    नदी
    समुद्र

  11. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय शोधा.

  12. बिगारी
    बिजागरी
    ठेकेदार
    टीळा

  13. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय शोधा.

  14. सत्रे
    यंत्रे
    पत्रे
    रात्र

  15. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय शोधा.

  16. नजरा
    चौथरा
    गजरे
    सोयरे

  17. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय शोधा.

  18. घरटी
    चापटी
    चिमटे
    शेपटी

  19. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय शोधा.

  20. चपला
    गराडे
    गाजरे
    गाठोडी

ARTICLES

What is an article?
--------------------------------------------------------------------------------
The words 'a' , 'an' and ' the ' are usually called as articles.

There are two types of articles.

a) Definite article  ( the )

b) Indefinite article ( a, an )
--------------------------------------------------------------------------------
* ' a ' आणि an ही  उपपदे वापरण्याविषयी नियम-
---------------------------------------------------------------------------------
1. फक्त एकवचनी सामान्य नामापूर्वीच ' a ' आणि 'an' ही उपपदे वापरतात. अनेकवचनी सामान्यनामापूर्वी ही उपपदे वापरत नाहीत.
उदा.a book , a cat, an ant, an elephant, an ox,  etc.

2.ज्या एकवचनी सामान्यनामाच्या उच्चाराची सुरुवात व्यंजनाने होते  त्या सामान्य नामच्या पूर्वी 'a ' हे उपपद वापरतात.

a boy , a cat , a dog , a fan, a girl etc.

3. ज्या एकवचनी सामान्यनामाच्या उच्चाराची सुरुवात स्वराने  होते  त्या सामान्य नामच्या पूर्वी 'an ' हे उपपद वापरतात.
 an animal, an eye, an umbrella, an orange.etc.

4. काही सामान्य नामांच्या स्पेलिंगची सुरुवात  स्वराने होते , परंतु  त्यांच्या उच्चारात सुरुवातीला स्वर नसल्यामुळे an ऐवजी a हे उपपद वापरतात.
a unity,  a university, a union, a European etc.

5.ज्या सामान्य नामाची सुरुवात  'h ' अक्षराने होते  परंतु त्याचा उच्चार ह ऐवजी अ , ए,  असा स्वरोचार होतो अशा नामाच्या पूर्वी ' an ' हे उपपद वापरतात.
an hour, an honour etc.

6. एकवचनी सामान्य नामापुर्वी  विशेषण आल्यास त्या विशेषणापूर्वी उपपद लावावे लागते आणि ते उपपद विशेषणाच्या उच्चारानुसार a किंवा an  वापरावे,

 a  man                        an  old man
an egg                         a white egg
an ant                          a  black ant
a girl                           an honoest girl
an  apple                      a ripe apple
-------------------------------------------------------------------------
'The'  हे उपपद  वापरण्याविषयी नियम-
----------------------------------------------------------------------------
1. एकदा उल्लेख केलेल्या नामाचा जेव्हा त्यानंतर पुन्हा पुन्हा उल्लेख केला जातो तेव्हा त्या नामापुर्वी the हे उपपद वापरतात.
I saw a girl. The girl was crying.
I have a dog. The dog is obedient.

2. चिरंतन  किंवा जगात ' एकच एक ' असलेल्या किंवा मानलेल्या वस्तूंच्या नामापूर्वी the हे उपपद वापरतात.
The Sky . the sun ,  the eatrh, the Tajmahal. etc.

3. एकवचनी नामाने जेव्हा प्राणी किंवा वस्तू यांच्या संपूर्ण  जातीचा बोध होतो तेव्हा  the हे उपपद वापरतात.
The  dog is a faithful animal.
The rose is a beautiful flower.

4. मोठ्या नद्या, समुद्र, महासागर, खंड, दऱ्या , वाळवंटे , पर्वत  इ. च्या नावापूर्वी the हे उपपद वापरतात.
The Ganga , The Yamuna , The Arabian Sea, The Himalayas etc.

5. Superlative ( तम भावदर्शक विशेषणे ) पूर्वी  the हे उपपद वापरतात.
 the best book, the tallest boy, the most beautiful woman.

6.काही विशिष्ट महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या नावापूर्वी the हे उपपद वापरतात.

the Ramayana, the Vedas, the bible etc.

7.  विशेषनापूर्वी the वापरले आणि त्या विशेषणानंतर नाम आलेले नसेल तर त्याचा अर्थ 'त्या लोकांचा वर्ग ' असा होतो.
We should help the poor.
the rich.
the weak

the  हे उपपद एकवचनी व अनेकवचनी अशा दोन्ही प्रकारच्या सामान्य नामापुर्वी वापरता येते.
  The table ,   The tables
-------------------------------------------------------------------------------
उपपदे कधी वापरली जात नाहीत---
-------------------------------------------------------------------------------
* विशेषनामे, पदार्थ वाचक नामे  आणि  भाववाचक नामे  या शब्दांच्या पूर्वी उपपद वापरले जात नाही.

* School, College, Church, Court, Market , Hospital ही नामे जेव्हा त्यांच्या मूळ उद्देशासाठी किंवा कामासाठी वापरली जातात  तेव्हा त्यांच्यापूर्वी कोणतेही उपपद वापरले जात नाही.
परंतु  मूळ उद्देशाव्यतिरिक्त कारणासाठी वरील नामे वापरली तर त्याच्या पूर्वी the हे उपपद वापरतात.

I went to the hospital to see my friend.

I went to  the school to meet the principal.

* Home या नामापूर्वी उपपद वापरले जात नाही.
We went home. He left home.

परंतु  home  या नामापूर्वी किंवा नंतर home चे वर्णन करणारा शब्द किंवा शब्दसमूह,असेल तर home पूर्वी  the उपपद वापरले जाते.

This is the home of my dear friend.

We shall find the home of that stranger.

* भाषेच्या नामापूर्वी उपपद वापरत नाहीत.
He was studying English.

*Father . Mother, Sister या सारख्या नातलगांच्या  नावापूर्वी उपपद वापरत नाहीत.

Mother will be late to day.
Father come home.

* काही  विशिष्ट शब्द समुहात शब्दयोगी अवयवानंतर त्याचे कर्म म्हणून येणाऱ्या नामापूर्वी उपपद वापरत नाहीत.
at noon , on earth, by train, by bus,  on foot.
----------------------------------------------------------------------


लिंग विचार-३

लिंग विचार -३

  1. पुल्लिंगी शब्दाचा पर्याय लिहा

  2. पाठवणी
    पाठलाग
    पाठशाळा
    पाठांतर

  3. पुल्लिंगी शब्दाचा पर्याय लिहा

  4. पंत
    पत
    खंत
    गत

  5. पुल्लिंगी शब्दाचा पर्याय लिहा

  6. पत्रके
    पातक
    पडदे
    मैदान

  7. पुल्लिंगी शब्दाचा पर्याय लिहा

  8. माल
    पाल
    चाल
    हाल

  9. पुल्लिंगी शब्दाचा पर्याय लिहा

  10. भात
    नात
    मात
    जात

  11. पुल्लिंगी शब्दाचा पर्याय लिहा

  12. शिंगरू
    पाडस
    छावा
    कोकरू

  13. पुल्लिंगी शब्दाचा पर्याय लिहा .

  14. पात्र
    पुत्र
    पत्र
    पत्री

  15. पुल्लिंगी शब्दाचा पर्याय लिहा

  16. वाट
    खाट
    ताट
    पाट

  17. पुल्लिंगी शब्दाचा पर्याय लिहा

  18. झोपडी
    घर
    वाडा
    दार

  19. पुल्लिंगी शब्दाचा पर्याय लिहा .

  20. वृक्ष
    झाड
    वेल
    पान

शब्द संपत्ती



डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🙏महामानवास मानवंदना..!!

    🔹 हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक आणि स्वतंत्र्य भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर

टोपणनाव :~            बाबासाहेब
जन्म :~        १४ एप्रिल १८९१
मृत्यू :~ ६ डिसेंबर १९५६
पुरस्कार :  ~ भारतरत्न (१९९०)

 डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

    🔸देशातील सर्व जाती धर्मातील लोकांच्या उन्नतीसाठी कार्य करणारे, राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

   बाबासाहेबांची वैशिष्टे सांगायची तर बाबासाहेब हे महान संशोधक, विश्वरत्न, विश्वभूषण, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य,
पञकार, समाजशास्ञज्ञ, अर्थशास्ञज्ञ, कायदेतज्ञ, इतिहासकार, संविधानाचे जनक, तत्वज्ञानी, मानववंश शास्ञज्ञ, दलित आणि महिला अधिकाराचे उद्धारक, देशातील पहिले कामगार मंञी, संस्कृत व हिंदी साहित्याचे अम्यासक, विज्ञानवादी, जलतज्ञ, समता, स्वातंञ्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्त्ये, गोरगरीब कामगारांचे उद्धारक होते.

  १४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्व आहे. खेड्यापाड्यापासून ते दिल्लीपर्यंत बाबासाहेबांची जयंती उत्सवात साजरी केली जाते.

    बाबासाहेब जगातील सर्वात बुद्धीमान तसेच उच्चशिक्षित म्हणून ओळखले जातात. बाबासाहेबांच्या वाचनात, चिंतनात व लेखनात प्रचंड ताकद, शक्ती होती. बाबासाहेबांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस जागा केला. त्याला आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून दिली. मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. हक्काने जागण्याचे शिकविले. म्हणूनच
भाग्यविधाता, महाविद्वान अशा अनेक उपाधींनी बाबासाहेबांना भारतीय जनते गौरविले आहे. 

    सर्वप्रथम बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांचे अनुयायी त्यांना बाबासाहेबम्हणत असत, नंतरच्या काळात हेच नाव रूढ झाले आणि त्यांचे विरोधकही त्यांना बाबासाहेब संबोधू लागले. आज संपूर्ण भारत आणि विश्व त्यांना बाबासाहेबसंबोधीत आहे.

    💎 शैक्षणिक विचार
 🔸शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाेतेे की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते.

    स्वातंत्र्य लढा
   🔸डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ जातिव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे, किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. शिक्षण,  अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती,अर्थकारण, राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्यांकडेही त्यांचे अवधान होते. बाबासाहेबांनी भारतातील सर्व समाजांचा आणि सर्वप्रथम देश हिताचाच विचार केलेला आहे. एकीकडे ते जसे १९३० ते ३२ मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांतून अस्पृश्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढतात तसेच दुसरीकडे ते भारतातील सर्व स्त्रीयांच्या उन्नतीसाठी विशेषत हिंदू समाजातील स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा, संपत्तीतील हक्क,घटस्फोट इत्यादीबाबत स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिंदू कोड बील संसदेत मांडतात आणि ते नामंजूर झाले म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही देतात. स्त्रीयांना त्यांचा अधिकार मिळत नाही यामुळे बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा त्याग केला.

   🔸१९३० सालच्या लंडन मधील गोलमेज परिषदेच्या वेळी त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडावा असे ठणकावून सांगितले होते. आपल्या पी.एचडी. च्या प्रबंधातूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विश्र्लेषण केले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ठळक व्यक्तिविशेष –
·         पाण्यासाठी सत्यागृह करणारे जगातील एकमेव स्त्यागृही.
·         जगात सर्वाधिक पुतळे असणारा महामानव.
·         कोलंबिया आणि लंडन विद्यापीठातील सर्वात हुशार विद्यार्थी.
·         पुस्तकांसाठी घर बांधणारा जगातील एकमेव पुस्तकप्रेमी.राजगृह या आपल्या घरात ५०००० हून अधिक ग्रंथ संग्रहीत.
·         जगातल्या 100 विद्वानांच्या अव्वल नंबर महाविद्वान.
·         अर्थशास्त्रामध्ये पीएचडी मिळवणारे तसेच अर्थशास्त्रामध्ये डबल डॉ.मिळवणारे प्रथम दक्षिण आशियायी. अर्थतज्ञ यादीमधील डीएस्सी ही दुर्मिळ व महत्त्वपूर्ण डॉ. पदवी मिळवणारे  पहिले भारतीय.
·         लंडन विद्यापीठामध्ये ८ वर्षे कालावधी लागणारा अभ्यासक्रम केवळ 2 वर्ष 3 महिन्यात यशस्वीपणे पूर्ण करणारा कुशाग्र  बुद्धीचा विद्यार्थी.
·         पाली ,संस्कृत,पर्शियन, मराठी, हिंदी, गुजराथी, जर्मन, फ्रेंच,इंग्रजी इ. भाषेचे ज्ञान डॉ. बाबासाहेबांनी पाली भाषेचे व्याकरण आणि शब्दकोश लिहिले आहेत.
·         सम्राट अशोकानंतर दुसरी शांत आणि अहिंसामय  महान धम्मक्रांती घडवून आणणारा महान बोधिसत्त्व.
·         लंडन म्युझियममध्ये कार्ल मार्क्ससोबत ज्यांची प्रतिमा आहे तो एकमेव भारतीय.
·         लंडनच्या संसदेमध्ये जयंती साजरी केली जाते असा एकमेव भारतीय.

लिंग विचार-2

lलिंग विचार

प्रश्नात दिलेल्या शब्दाचा विरुद्धलिंगी पर्याय शोधा
  1. दर्शक.

  2. दर्शकी
    दर्शका
    दर्शि
    दर्शिका

  3. मृग

  4. मृगी
    मुर्गी
    मृगा
    मृगाक्षी

  5. नायक

  6. नायकी
    नायिका
    नायकीण
    नायक

  7. गृहस्थ

  8. गृहस्थी
    गृहस्था
    गृहिणी
    गृहस्थ

  9. भगवती

  10. भागवत
    भगवता
    भगवा
    भगवान

  11. नर्तक

  12. नर्तकी
    नृत्य
    नर्तनीका
    नर्तिका

  13. व्याही

  14. विहीण
    सासू
    जाऊ
    व्याहीण

  15. युवक

  16. मुलगी
    तरुणी
    युवती
    नारी

  17. मेंढी

  18. मेंढरू
    मेंढरी
    एडका
    बोकड

  19. बोका

  20. भाटी
    बोकी
    बोके
    बोकीण

लिंग विचार-1

पुस्तके -पाठ्यक्रम

घनमूळ

घनमूळ काढणे-

1³=1                                             2³=8

3³=27                                           4³= 64

5³=125                                         6³=216                                           
7³=343                                          8³=512

9³= 729
------------------------------------------------------------------------------
उदा. 592704

* गट क्र-1- मध्ये एकक, दशक. शतक घ्यावेत.

* गट क्र-2- मध्ये उर्वरित अंक घ्यावेत.

           592          704
       
            8               4

* पहिल्या गटाखाली फक्त एकक स्थानचा अंक लिहावा.

* गट क्र-2 मध्ये  592 पेक्षा लहान घन असणारी संख्या 512 आहे व तिचे घनमूळ 8 आहे  म्हणून गट क्र-2 च्या खाली 8 लिहावे.

दोन्ही गटात मिळून तयार झालेली संख्या 84 मिळाली. म्हणून 592704 चे घनमूळ 84 आहे.
---------------------------------------------------------------------------------
अपवाद- गट क्र-1 मध्ये 0,1,4,5,6,9 हे अंक एकक स्थानी असल्यास तर ते जसेच्या तसे लिहावेत.

एकक स्थानी 2 असतील तर 8 व 8 असतील तर 2 लिहावे.

एकक स्थानी 3 असतील तर 7 व 7 असतील तर 3 लिहावे.

--------------------------------------------------------------------------------
उदा- 658503चे घनमूळ = 87

                       658             503
                 
                        8                   7
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------





कोडे

१. पहाटे गजर होतो ,घड्याळ नव्हे,डोक्यावर मुकुट पण राजा नव्हे----

२.पाने आहेत पण झाड नाही,पुष्कळ काही सांगते पण शब्द उमटत नाही--

३. खाते. पिते-जगते, उंच वाढते पण एक शब्द बोलत नाही की पाऊलभर चालत नाही---

४.राजा आहे पण राज्य नाही,वजीर नाही, राणी आहे, गुलाम आहे,पण दासी मात्र एक ही नाही हजर---

५.लाल, पिवळा रंग लाकूड फाटा खाऊन जगतो आणि काय नवल ? पाणी पिताच मरून जातो---

६.नाही उठणे , नाही चालणे,काही खाणे ना पिणे पण एकसारखे बोलणे नाही तर गाणे हेच याचे जिणे---

७.एवढेसे तोंड पण गर्जना कानठीळ्या बसवणारी कोण अशी ही दिसायला साधी , पण सर्वांना भय दाखवणारी ---

८.कोणता पक्षी असा रंग सुंदर गहिरा की? ज्याच्या शेपटावर चमकतात रुपये मोहोरा?

९.दुधाचा सारा एकच वाटोळा प्याला ! पण मेजवानी मात्र लग्नाच्या वऱ्हाडाला---

१०. हात नाही पाय नाही , डोके नाही , धडही नाही , तरीही  साऱ्या माणसांना  विसावा देई.असे कोण सई----

११.तळहाताएवढे शेत -शेतात तळे-तळ्यात वेलीचे मूळ पण वेलीला मात्र लागले पिवळेधमक आगीचे फूल---

१२. रात्री थोडा पाऊस पडे रानी, जलबिंदू चमकती पानोपानी पण चिमणीचीही तहान भागेना असे कोणते पाऊसपाणी---

१३.नाही थिएटर, नाही तिकीट,नाही स्टेज नाही पडदा दावी घरबसल्या सर्वांना चित्रपट कोण जादुगार एवढा ?

उत्तरे-(कोंबडा, पुस्तक, झाड, पत्ते, विस्तव, रेडीओ, तोफ, मोर,चंद्र आणि चांदणे, घर, दिवा, दवबिंदू, दूरदर्शन )

वर्ग करण्याच्या काही पध्दती

दोन अंकी संख्यांचा वर्ग -
 उदा- (53)²

* एकक व दशक स्थानाच्या अंकांचे ( दोन्ही अंकाचे) वर्ग लिहिणे.

* दोन्ही अंकांच्या गुणाकाराची दुप्पट लिहिणे.

* बेरीज करणे.

(53)²=2509                               (87)² = 6449
            30 *                                          112*
-----------------                               ----------------------
          2809                                           7569
---------------------------------------------------------------------------------
100 पाया मानून वर्ग करणे.

*(92)²

* 100-92=8
     92-8  =84
          8²  =64
म्हणून (92)²= 8464
---------------------------------------------------------------------------------
*(88)²

* 100-88=12
     88-12 =76
          12²  =144 = 1 हातचा घेऊन 76 मध्ये मिळवणे.
म्हणून (88)²= 7744
---------------------------------------------------------------------------------
4 ने सुरु होणाऱ्या संख्यांचे वर्ग करणे.

*(44)²=

* प्रथम डावीकडे ही संख्या 25 पेक्षा कितीने जास्त आहे ते लिहा.
44-25= 19 ने जास्त
* एकमं स्थानाची संख्या 10 तून वजा करून येणाऱ्या संख्येचा वर्ग पुढे लिहा.
(10-4) = 6
(6)²=36
म्हणून (44)²=1936
 
            (49)²=2401

             (41)²=1681
--------------------------------------------------------------------------------
5 ने सुरु होणाऱ्या संख्यांचे वर्ग-

*(53)²=

* एकक स्थान (3) हे 25 मध्ये मिळवा व बेरीज लिहा.

* एकक स्थानाच्या अंकाचा वर्ग लिहा= (03)²=09

*(53)²=2809

    (57)²=3249

   (55)²=3025
--------------------------------------------------------------------------------
9 ने सुरु होणाऱ्या संख्यांचे वर्ग-

* (98)² =

* 9 चा वर्ग करा  त्यात एकक स्थानाची संख्या व त्यापेक्षा 1 ने  लहान असलेली संख्या मिळवा.
81+8+7=96

* 10 तून एकक स्थानचा अंक वजा करून येणाऱ्या संख्येचा वर्ग उजवीकडे लिहा. ( 04)
 
  (98)² = 9604.

 (95)² = 9025
------------------------------------------------------------------------------
कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग करण्याची एक पध्दत-


 (46)² =

* संख्या घ्या व तिचे एकक स्थान त्या संख्येत मिळवा. (46+6)=52

*दशक स्थानाने गुणा- (52 × 4 )=208

* त्या संख्येस 10 ने गुणा = 208 ×10 =2080

*त्यात एकक स्थानचा वर्ग मिळवा.2080+ 36

 म्हणून (46)² =2116
----------------------------------------------------------------------------------


जुळी म्हण ओळखा

ENGLISH CONSONANT AND THEIR PRONUNCIATION

C  चे उच्चारण दोन प्रकारे होते. 1)  स   2) क

* C च्या नंतर i, y, e आले तर 'c' चा उच्चार ' स ' असा होतो.
उदा. city , cycle, rice...

*C च्या  नंतर a, o, u, k, t  यापैकी वर्ण आला तर उचार 'क' होतो.
उदा. cat, cot, cut, back...

* C च्या नंतर  ia अथवा  ea असेल  तर उचार ' श' होतो.
उदा. Social, Ocean...

--------------------------------------------------------------------------------
G चे उच्चारण दोन प्रकारे होते. 1)  ज   2) ग

*शब्दाच्या शेवटी ge असेल तर उचार 'ज' होतो.
उदा.Age, Page, Germ, Gem, Gist...

*अन्य ठिकाणी G चा उच्चार "ग' होतो.
उदा. Big, Give, Finger...

* शब्दाच्या शेवटी be, g, gg, ge, je, ee, y असेल तर त्याच्या नंतर आलेल्या S चा उचार ' ज' होतो.
उदा. Tribes, Boys, Bags, Ways, Eggs, Rupees...

* शब्दाच्या शेवटी f, p, pe, te असेल तर त्याच्या नंतर आलेल्या S चे उच्चारण 'स' असे होते.
उदा. Lips, roofs, chips, kites, hopes...

*शब्दात S अथवा SS च्या नंतर ia , ion असेल तर S चा उच्चार 'श' असा होतो.
उदा. Asia, Session, Penson, Russia...
-------------------------------------------------------------------------------
T चे उच्चारण श, च, थ, द असा होतो.
* शब्दाच्या नंतर T आणि त्याच्या नंतर ia, ie, io असेल तर उच्चारण 'श ' होतो.
उदा. Initial, Patient, Portion, Ratio, Promotion...

* जर शब्दात S नंतर tion अथवा ure येत असेल तर 'T' चा उच्चार 'च' होतो.
उदा. Question, Nature, Picture, Capture...

* शब्दात T नंतर H आल्यास कधी 'थ' तर कधी 'ध' होतो.
उदा. Thick, thin, three, this, then, there...
         Thames, thoms... मराठीच्या थ सारखे उच्चारण होते.
-------------------------------------------------------------------------------
*  'फ' साठी  F व ph वापरतात.

* 'क' साठी  k,q,ck, ch वापरतात.
उदा. Kite, Kind, Queen, chemist, character, stock, check.

* शब्दाच्या  शेवटी 'e' या अक्षराचा उच्चार होत नाही.
उदा. game, kite, name, wife...

* 'L' च्या पुढे d, k, m असल्यास 'L' चा उच्चार होत नाही.
उदा. could, walk, calm, palm. talk...

* B अक्षराच्या पूर्वी 'M' आल्यास B चा उच्चार होत नाही.
उदा. thumb, comb...

* 'Q" अक्षराच्या पुढे बऱ्याचदा  'U' हे अक्षर येते.
उदा. Queue, Queen, Quit, Question....
------------------------------------------------------------------------------

*

भाषिक खेळ

* खाली दिलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द लिहायचा आहे.
 (कुठलाही काना , मात्रा , वेलांटी, उकार, जोडाक्षर वा अनुस्वार नसलेले उत्तर असावे.)
१. हत्ती---
२. पंकज---
३.तोंड---
४.पाणी---
५. नमस्कार---
६. बाप---
७. बाण---
८. बाग---
९. समस्या---
१०. घास---
११. धाक---
१२. भांडण---
१३.नवरा---
१४.पर्वत---
१५.कठीण---
१६.पुरुष---
१७.द्रव्य---
१८.आवश्यकता---
१९. उलगडा---
२०.दूध---
२१. रुची---
२२. गंध---
२३.गृह---
२४.घोडा---
२५. पाऊल---
२६. डोळा---
२७. तृण---
२८.रस्ता---
२९.हात---
३०. वारा---
३१. सुवर्ण---
३२.अंबर---
३३. खून---
३४.रास---
३५.कप्पा---
३६.पक्षी---
३७.किल्ला---
३८. अवचित---
३९. मृत्यू---
४०.अग्नी---
४१.काळ---
४२.जंगल---
४३.अविरत---
४४. आश्चर्य---
४५. अभिनेता---
४६.ढग---
४७. पोट---
४८. अंधार---
४९. ध्वनी---
५०. ओझे---

विज्ञान कोडे

१.स्थायू, द्रव , वायू रूपे त्याची तीन , संस्कृतमध्ये त्याला म्हणतात जीवन---

२. सावली देते झाड नाही, पाणी देते आड नाही---

३. लुकलुक डोळे रात्रभर जागतात , सकाळी पाहिले तर छुमंतर होतात---

४. येता वसंतऋतू  गाणी गोड गाते,कावळ्याच्या  घरट्यात अंडी कोण घालते---

५. रूप दाखवतो पण आरसा नाही,हातात धरुनी पाहता येत नाही---

६. गुण गुण गाणे गुणगुणतो , फुकट सर्वांना इंजेक्शन देतो---

७. रिकामी दिसे परि रिकामी नसे , बाटलीत सांगा त्या काय बरे असे---

८.वाजते खूप  पण  ऐकू येत नाही,बंडीविना मात्र ती सोसत नाही---

९. सशासंगे शर्यत जिंकली काल , पाठीवर मिरवितो बक्षीसाची ढाल---

१०.तयार करता येते पण साठवता येत नाही,ती बहुपयोगी आहे पण कुणा दिसेना---

११. तीन भाऊ तीन तऱ्हेचे एक गरम त्रास देतो फार, दुसरा बरसे अमृतधार , तिसरा कधी करी बेजार , कोण बरे ओळखा---

१२. धातू आहे पण धरता येईना , पडता खाली हाती लागेना ---

१३.सजीव असुनी चालेना , दिवसा प्राणवायू घेईना , दानशूर मित्र मानवाचा माहित आहे का सर्वांना---

१४.पंख आहेत पण पक्षी नाही, अंडी तर तो घालत नाही अंधारातच भक्ष्य शोधतो, उलटे टांगून दिवसा झोपतो---

१५. पंधरा मिनिटांत करतो कमाल, तीन मजल्यावरील शिजवतो माल , आहे तो  फार कामाचा नक्कीच तुमच्या ओळखीचा---

उत्तरे-(पाणी, ढग, चांदण्या,कोकिळा, पाणी, डास, हवा , थंडी, कासव, वीज, ऋतू, पारा, झाड, वाटवाघूळ, प्रेशर कुकर )

विभाज्यतेच्या नाविन्यपूर्ण कसोट्या

7 ची कसोटी - संख्येतील एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट तो अंक वगळून उरलेल्या अंकातून वजा करावी. येणाऱ्या वजाबाकीसाठी हीच क्रिया करावी याच प्रमाणे येणारी शेवटची वजाबाकी 0 किंवा 7 च्या पटीत आल्यास त्या संख्येला 7 ने भाग जातो.
उदा. 5544 मध्ये शेवटचा अंक 4
 त्याची दुप्पट =8 तो अंक वगळून बनलेली संख्या =554
                         554-8=546
                         54-12=42
                             4-4=0
यावरून  5544 ला 7 ने नि:शेष भाग जातो.
---------------------------------------------------------------------------------
13 ची कसोटी - ज्या संख्येतील एकक स्थानाच्या अंकांची 9 पट एकक स्थानाच्या अंकाच्या डावीकडील अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून वजा केल्यास वजाबाकी 0 येत असेल किंवा येणाऱ्या वजाबाकीला 13 ने नि:शेष भाग जात असेल तर त्या संख्येला 13 ने नि:शेष भाग जातो.
( ही क्रिया दोन अंकी संख्या येईपर्यंत पडताळता येते )
उदा.364
36-(4 x 9 )
=36-36
=0
म्हणून 364 ला 13 ने नि:शेष भाग जातो.
वरील सूत्र तीन अंकी संख्येपर्यंत वापरावे )
--------------------------------------------------------------------------------
13 ची कसोटी- दिलेल्या संख्येतील उजवीकडून डावीकडे प्रथम तीन अंकांचा गट करावा त्यापुढील अंकांचा दुसरा गट करावा. या दोन्ही गटातील फरकाला  13 ने नि:शेष भाग जात असेल तर त्या संख्येला 13 ने नि:शेष भाग जातो.
उदा. 12389
  12 : 389
 =389-12
= 377/13
= 29
म्हणून 12389 ला 13 ने नि:शेष भाग जातो.
---------------------------------------------------------------------------------
19 ची कसोटी - ( यासाठी 2 हा कोड ( संकेतांक ) घ्यावा)
दिलेल्या संख्येतील एकक स्थानाच्या अंकास दोनने गुणावे  आलेला गुणाकार व उर्वरित संख्या याची बेरीज करावी. ही बेरीज 19 च्या पाढ्यातील असल्यास त्या पूर्ण संख्येस 19 ने नि:शेष भाग जातो.
उदा.9918
= 991 + (8 x 2)
= 991+16
= 1007
= 100+ (7 x 2)
= 114
=11+(4 x 2)
=19
=19/19
=1 म्हणून 9918 ला 19 ने नि:शेष भाग जातो.
---------------------------------------------------------------------------------
23 ची कसोटी ( यासाठी 7 हा कोड ( संकेतांक ) घ्यावा)
दिलेल्या संख्येतील एकक स्थानाच्या अंकास सातने गुणावे  आलेला गुणाकार व उर्वरित संख्या याची बेरीज करावी. ही बेरीज 23 च्या पाढ्यातील असल्यास त्या पूर्ण संख्येस 23 ने नि:शेष भाग जातो.
उदा.10488
=1048+(8 x 7)
=1104
=110 +(4 x 7)
=138
=13+(8 x 7)
=69
=69/23
=3 म्हणून 10488 या संख्येला 23 ने नि:शेष भाग जातो.
---------------------------------------------------------------------------------
29 ची कसोटी -( यासाठी 3 हा कोड ( संकेतांक ) घ्यावा)
दिलेल्या संख्येतील एकक स्थानाच्या अंकास तीनने गुणावे  आलेला गुणाकार व उर्वरित संख्या याची बेरीज करावी. ही बेरीज 29 च्या पाढ्यातील असल्यास त्या पूर्ण संख्येस 29 ने नि:शेष भाग जातो.
उदा-4205
=420+(5 x 3)
=435
=43+(5 x 3)
=58
=58/29
=2
म्हणून 4205 या संख्येला 29 ने नि:शेष भाग जातो.
---------------------------------------------------------------------------------

सोडवा

1. एका पाण्याने  भरलेल्या बादलीचे वजन 18 kg आहे. अर्ध्या बादलीचे वजन 10.5 kg आहे, तर रिकाम्या  बादलीचे वजन किती?


2. 5 वा 3æ व  6 वा 2æ मिनिटे कमी , या दोन्ही वेळा समान वेळ दर्शवितात तर प्रत्यक्षात किती वाजले असतील ?


3.दोन समांतर रेषांना दोन समांतर रेषांनी छेदले असता, एकरूप कोनांच्या किती
  जोड्या मिळतील ?


4.ज्यांच्या अंकांची बेरीज 10 आहे,अशा तीन अंकी संख्या किती आहेत?


5. जर एक वस्तू 475 रु.ला विकली तर त्यात 375 रु.ला विकल्यावर होणाऱ्या तोटयापेक्षा 10 रु. जास्त मिळतात; तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?

कूटप्रश्न


 1) सोडवा.
     M N P
+    M N P
+    M N P
---------------
      N N N

2)
          C A P
     +    C A P
     +    C A P
 ------------------             
          7 7 7
3)
           A B C
     +    A B C
     +    A B C
--------------------     
           8 8 8
4)
       S  E  N  D
+     M O R  E
------------------------
    M O N  E Y

5)
     A B C D
X             4
------------------------
     D C B A

प्रश्नमंजुषा

1. 12 मजूर रोज 9 तास काम करून 42 खेळणी बनवतात,तर 9 मजूर रोज 4 तास काम करून किती खेळणी बनवतील ?

2) एका दुकानदाराने दोन खुर्च्या प्रत्येकी 720 र.ला विकल्या .त्याला एकात खरेदीच्या 20 % नफा व दुसऱ्यात खरेदीच्या 20 % तोटा झाला; तर या व्यवहारात त्याला   शेकडा नफा अगर तोटा किती झाला?


3) A गावावरून B गावाकडे जाताना एक बस ताशी 30 कि.मी वेगाने जाते. व परत येताना 70 कि.मी. वेगाने येते. तर बसचा सरासरी वेग किती?

4) खालील महिन्यांच्या समोर दिलेल्या संख्यांचा संबंध लक्षात घेऊन पुढील दिलेल्या महिन्यासाठी कोणती संख्या येईल ?

JANUARY     71313
FEBRUARY   82382
MARCH        53113
APRIL           54203
MAY             35113
JUNE             46203
JULY              47113
AUGUST       68313
SEPTEMBER   ?

5) एक मजेदार कोडे-
विषमासूर नावाच्या राक्षसासमोर 1000 माणसे एका रांगेत उभी आहेत.
त्या रांगेमधील विषम क्रमांकावर असलेल्या सर्व लोकांना तो खावून टाकतो.
त्यानंतर उरलेल्या माणसांची रांग शिल्लक राहते. आता त्या रांगेतील विषम क्रमांकाच्या माणसांना  विषमासूर खावून टाकतो. असे करत करत रांग लहान होत जाते आणि शेवटी एक माणूस शिल्लक राहतो. तर तो शिल्लक राहिलेल्या माणसाचा 1000 लोकांच्या रांगेतील क्रमांक कितवा असेल ?

उत्तरे ( 14 खेळणी, 4 % तोटा ,  42 KM/H  , 99303, 512 )