विषय- भूगोल
इयत्ता- सातवी घटक-सूर्य,चंद्र
व पृथ्वी ( प्रश्न पेढी )
------------------------------------------------------------------------------------------------
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
1) चंद्र अंशतः झाकला जातो , त्या स्थितीला ........................चंद्रग्रहण
म्हणतात.
2) सूर्यग्रहण ............................तिथीला होते.
3) चंद्रग्रहण..............................तिथीला होते.
4)चंद्राची परिभ्रमण कक्षा ..........................आहे.
5) चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस ...............म्हणतात.
6) चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो त्या स्थितीस ...............म्हणतात.
7) चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे...........
0 कोन करते.
8) पिधान हे ...........................मुळे घडते.
9) अधिक्रमण हे ...................मुळे घडते.
10) सूर्य ,चंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत
आल्यावरच
...................ग्रहण होते.
11) खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी ..................सेकंद
असतो.
12) सूर्य ,पृथ्वी व चंद्र हे
अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत आल्यावरच
...................ग्रहण होते.
13) खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी ..................मिनिटे
असतो.
14) अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरा दिवसांच्या चंद्राचा प्रकाशित
भाग वाढत
जाण्याच्या काळास ....................पक्ष
म्हणतात.
15) पौर्णिमेपासून आमावास्येपर्यंतच्या पंधरा दिवसांच्या चंद्राचा प्रकाशित
भाग कमी होत जाण्याच्या काळास ....................पक्ष
म्हणतात.
------------------------------------------------------------------------------------------------
एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) सूर्यग्रहणाचे प्रकार लिहा.
2) चंद्रग्रहणाचे प्रकार लिहा.
3) चंद्राची अक्षीय गती म्हणजे काय ?
4) चंद्राची कक्षीय गती म्हणजे काय ?
5) अमावास्येला सूर्य पृथ्वी व चंद्र यांची स्थिती कशी असते ?
6) पौर्णिमेला सूर्य पृथ्वी व चंद्र यांची स्थिती कशी असते ?
7) उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सुर्यग्रहणे होतील.
8) चंद्रावरून कोणकोणती ग्रहणे दिसू शकतील?
9) कंकणाकृती आणि खग्रास असे
सूर्यग्रहण एकाच वेळी दिसू शकेल काय ?
10) सूर्यग्रहणाच्या दिवशी
पृथ्वीवरील कोणत्या भागातून ग्रहण दिसणार नाही?
-----------------------------------------------------------------------------------------------
भौगोलिक कारणे लिहा.
1) चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरून कधीही दिसत नाही.
2) दर अमावास्येस सूर्यग्रहण होत नाही .
3) दर पौर्णिमेस चंद्रग्रहण होत नाही.
4) चंद्रग्रहण कंकणाकृती का दिसत नाही ?
5) इतर ग्रहांमुळे होणारी सुर्यग्रहणे आपण पाहू शकत नाही.
--------------------------------------------------------------------------------------------
आकृत्या काढा व नावे लिहा.
1) खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण
2) कंकणाकृती व खंडग्रास सूर्यग्रहण
3) खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण
4 ) चंद्राची उपभू व अपभू स्थिती .
5) चंद्रकला – कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष.
------------------------------------------------------------------------------------------------