सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

सरावासाठी उदाहरणे

 * एका वर्गातील 46 विद्यार्थ्यांमध्ये अरुणा गुणानु क्रमाने 12 वी आली तर शेवटून तिचा की क्रमांक कितवा आहे ?

* एका संख्येचा 25% जर 20 असेल तर त्याच संख्येचा 40% किती ?

* घड्याळाचा मिनिट काटा 12 ओलांडतो तेव्हा दोन वेळा टोल पडतो व मिनिट काटा 3,6, 9 ओलांडतो तेव्हा एकदा तोल पडतो तर त्याच दिवशी सकाळी 10:35 ते ते 3: 50 च्या दरम्यान किती टोले होतील ?

*A ने एक मोबाईल B ला 20% नफ्याने विकला तोच मोबाईल B ने 25% नफ्याने C ला विकला जर तो मोबाईल C ला 15000 रुपयात मिळाला तर त्या मोबाईलची मूळ किंमत किती?

* एक छत्री 15% तोटा सहन करून 170 रुपयात विकली ही छत्री 10%नफ्याने विकली असती तर किती किंमत मिळाली असती ?

*78 नंतर येणारी सातवी त्रिकोणी संख्या कोणती ?

* एका संख्येला 16 ने गुणण्या ऐवजी चुकून 24 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकाराहून 64 ने अधिक येतो तर ती संख्या कोणती ?

* जर खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर 4: 5 आहे तर शेकडा नफा किती?

* एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे तर शेकडा तोटा किती होईल ?

* पश्चिम आणि ईशान्य या दिशांमधील कोनाचे माप किती ?

* विना ताशी 40 किलोमीटर वेगाने जाते . मीनल ताशी 42 किलोमीटर वेगाने स्कूटर चालवते . नितीन अडीच तासात 120 km जातो . अनंत 5 मिनिटात 3 किलोमीटर जातो तर सर्वाधिक वेग कोणा

* एक व्यापारी प्रत्येकी 2000 रुपये दराने दोन घड्याळाची विक्री करतो .जर एका घड्याळ्यात त्याला 25 टक्के  नफा मिळत असेल. तर दुसऱ्या घड्याळात त्याला 20% तोटा होत असेल. तर या व्यवहारात नफा अगर तोटा किती होईल ?

*: जर एका फळ विक्रेत्याला 100 केळी विकून 20 केळ्यांची विक्री किंमत एवढा नफा मिळत असेल तर त्याचा नफा किती ?

* पाच सदस्यांच्या कुटुंबाचे सरासरी वय 18 वर्षे आहे . आजोबांची वय मिळवले असता सरासरी वय 12 वर्षांनी वाढते .तर आजोबांचे वय किती असेल ?

* एका निवडणुकीत दोन उमेदवार आहेत .एका उमेदवाराला 71 टक्के मते मिळाली आणि तो 756 बताने निवडून आला . तर एकूण मतांची संख्या किती ?

* 11 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल ?

* जेव्हा 4 विणकर 4चटया 4 दिवसात विणतात. याच वेगाने 8 विणकर 8 दिवसात किती चटया विणतील ?

* दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे .तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती ?

* ती सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे . जिला 12, 15 आणि 25 ने पूर्णपणे भाग जातो ?

* एखाद्या संख्येला 4 ने भाग दिल्यावर भागाकार आणि बाकी यांची बेरीज 8 आहे . आणि त्यांच्या वर्गांची बेरीज 34 आहे तर ती संख्या शोधा ?

* एका परीक्षेत 900 मुली आणि 1100 मुले बसली त्यांच्यापैकी 40% मुली आणि 50 टक्के मुले पास झाली . एकूण किती टक्के विद्यार्थी  नापास  झाले ?

* एका आयताच्या लांबीत 20 टक्के वाढ .आणि रुंदीत 20 टक्के घट केल्यावर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ किंवा घट होईल ?

*  जर एखाद्या वस्तूला 5 टक्के तोट्याऐवजी 10% नफ्यावर विकले असते. तर विक्रेत्याला 75 रुपये जास्ती मिळाले असते तर वस्तूची विक्री किंमत काय ?

* गव्हाच्या किमतीत 20 टक्के घट झाल्याने एक व्यक्ती 600 रुपयात दहा किलो गहू जास्त विकत घेऊ शकतो . भावात घट झाल्यानंतर गव्हाचा भाव काय आहे ?