1) एका वस्तूची किंमत 20 टक्क्यांनी कमी केल्यास त्या वस्तूचा खप 20 टक्क्यांनी वाढला . तर या व्यवहारात नफा अगर तोटा किती ?
2) एका माणसाने दोन घोडे प्रत्येकी 900 रुपयाला विकले . एकावर त्याला 10 टक्के नफा व दुसऱ्यावर त्याला 10 टक्के तोटा झाला. तर त्याचा शेकडा नफा अगर शेकडा तोटा किती ?
3) एका विक्रेत्याने दोन रेडिओ संच प्रत्येकी 495 विकले तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 10% नफा व दुसऱ्यात 10 टक्के तोटा झाला. तर त्या व्यवहारात त्याला एकूण नफा अगर तोटा किती टक्के झाला
4)एका विक्रेत्याने दोन घड्याळे प्रत्येकी 720 रुपयांस विकली. तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 20% नफा व दुसऱ्यात 20% तोटा झाला . तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती झाला?
5) दोन वस्तू प्रत्येकी 500 रुपयांना विकल्याने एकात खरेदीच्या 8 टक्के नफा व दुसरीत 8 टक्के तोटा होतो. तर या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल ?
6) एका विक्रेत्याने दोन घड्याळे प्रत्येकी 375 रुपयांस विकली. तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 25% नफा व दुसऱ्यात 25% तोटा झाला . तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती झाला?
7) एका वस्तूची किंमत 10 टक्क्यांनी कमी केल्यास त्या वस्तूचा खप 10 टक्क्यांनी वाढला . तर या व्यवहारात नफा अगर तोटा किती ?
8) एका वस्तूची किंमत 30 टक्क्यांनी कमी केल्यास त्या वस्तूचा खप 30 टक्क्यांनी वाढला . तर या व्यवहारात नफा अगर तोटा किती ?
9) साखरेचा भाव 15 टक्क्यांनी कमी केल्याने साखरेचा खप 15 टक्क्यांनी वाढला . तर पूर्वीच्या उत्पन्नावर काय फरक पडेल ?
10) एका सिनेमागृहाच्या तिकीटाची 25 टक्क्यांनी कमी केल्याने तिकीटाचा खप 25 टक्क्यांनी वाढला . तर पूर्वीच्या उत्पन्नावर काय फरक पडेल ?
_____________________________________
अशा प्रकारच्या उदाहरणा मध्ये नेहमीच तोटा होतो .
उदा क्र 1)
(20 चा वर्ग )/100
400/100
4 % तोटा होईल या प्रमाणे सोडवा