* तीन वस्तूंची सरासरी किंमत 15000 रुपये आहे .जर त्यांच्या किमती 3:5:7 या गुणोत्तरात असतील तर सर्वात स्वस्त वस्तू किती किमतीची असेल?
* व्यासपीठावर एकूण बारा पाहुणे होते .त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील ?
* माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत उरलेले लोक एकटे आहेत त्यापैकी विवाहित लोकांची संख्या 60 टक्के आहे आणि पुरुषांची संख्या 54% आहे तर या गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती ?
* एका जंगलात वृक्षांची सध्या संख्या 1,24,416 आहे. वृक्षांची संख्या दरवर्षी 20 टक्क्यांनी वाढली असेल तर पाच वर्षांपूर्वी त्या जंगलात किती वृक्ष होते ?
* X या संख्येतून 75 टक्के काढून त्यामध्ये 75 ही संख्या मिळवली असता x हीच संख्या मिळते तर x बरोबर किती?
* घरगुती गॅसची किंमत 40% वाढवली ती आणखी 30 % वाढविण्याचा प्रस्ताव आहे . प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल ?
* एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 17 % मिळवले असतात 702 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती?
* एक सायकल 1960 रुपयांमध्ये विकत घेऊन 1862 रुपयांमध्ये विक्री केल्यावर किती टक्के नुकसान होईल ?
* एका शहराची लोकसंख्या 50 000 आहे. दरवर्षी त्या शहराचे लोकसंख्या 20 % नी कमी होते . तर दोन वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या काय असेल ?
* 60 मधून एका संख्येची सहा पट वजा केली. तर त्या संख्येचे चारपट उरते तर ती संख्या कोणती ?
* एका किल्ल्यावर 850 सैनिकांना 26 दिवस अन्न पुरते .जर 6 दिवसानंतर 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पुरेल ?
* एका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्याची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गाय व गुराखी किती आहेत ?
* एका पुस्तकाची किंमत 20 % नी कमी केल्यास त्याचा खप 25% ने वाढला .तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडेल ?
* एका पिशवीत काही गोळ्या आहेत ज्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात. व जर त्या गोळ्या 14 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 10 गोळ्या उरतात . तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील ?
* 750 मुलांना 5 दिवसांचा सहलीचा खर्च 8500 येतो. तर 40 मुलांना 17 दिवसांच्या सहलीचा खर्च किती येईल ?
* दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 23 आहे तर मोठी संख्या कोणती ?
* 800 मीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किलोमीटर ?
* 150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11 ने भाग जातो ?
* एक संख्या 45% ने वाढवली तर तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती ?
* पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला 20 टक्के गुण जास्त आहेत व गीताला 10 टक्के गुण कमी आहेत. दोघींच्या गुणां मधील फरक 120 चा असेल तर परीक्षा किती गुणांची होती ?
* एका निवडणुकीत दोन उमेदवार पैकी 35 टक्के मते मिळालेला उमेदवार 6300 मतांनी पराभूत झाला. तर जिंकलेल्या उमेदवारास किती मते पडली ?
* एका घड्याळाची किंमत 500 रुपये आहे .त्यावर दुकानदाराने 20 टक्के सूट दिली .पुन्हा 20 टक्के सूट दिल्यास घड्याळाची विक्री किंमत किती होईल ?
* एका पुस्तकाची छापील किंमत 180 रुपये आहे दुकानदाराने ते अस्मिताला 153 रुपयाला विकले तर तिला शेकडा किती सूट मिळाली ?
* तीन पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे .त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे . तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती रुपये ?
* खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 असून टेबलाची किंमत 441 रुपये आहे तर खुर्ची ची किंमत किती ?