म्हणी
...............................................................................
* दिवसभर घरी, दिवा लावून दळण करी.
* दिवस असा तसा , दिव्याच्या
उजेडात तांदूळ नीसा.
* दिवस गेला गोठी माठी, अन
चांदण्यात कापूस वटी.
* चोराला चावला विंचू, चोर करीना हुं
की चू.
* रोज घालतोय शिव्या, आणि एकादशीला
गातोय ओव्या .
* पाच पन्नास आचारी , वरणात मीठ
भारी.
*राजा उदार झाला, अन भोपळा दान
केला.
* गाढवाला दिला मान त्याने केले
उंच कान .
* अघोरे उपाशी अन जीव टोपल्यापाशी .
*बैलाने रडावे तो गोणीच रडते.
* का ग बाई रोड ( तर म्हणे )
गावाची ओढ.
*घोड्यावर अंबारी आणि हत्तीवर
खोगीर .
* भरल्या गाडीस सूप जड नाही.
* श्री मागून ग येतो.
*जेवढा व्याप तेवढा संताप.
*फासा त्याचा मासा.
आधीच रडे तो घोडे काय चढे ?