वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने-
*अज्ञानाच्या अंधाऱ्या रात्रीना
उजळून टाकण्याचे सामर्थ्य ग्रंथामध्ये असते.ग्रंथाच्या तेजातच क्रांतीची बीजे
असतात.ग्रंथ आम्हाला माणुसकी आणि शांती
शिकवितात. या क्रांतीचे माणुसकीचे , शांतीचे नवेनवे वारसदार निर्माण करण्याचे काम
ग्रंथ करतात.
* पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक
असते.
* पुस्तकांच्या जगात शिरले की
मनावरचे मळभ दूर होते.
* ग्रंथ वाचनाने माणूस मोठा झाला नाही तरी शहाणा जरूर होतो.
आपला वेळ, बुद्धी आणि मन संस्कारित
करण्यासाठी ग्रंथ वाचनावर भर दिलाच पाहिजे,
* वाचनाचा लळा , फुलवी जीवनाचा
मळा.
.
*जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा
वाचनालयात जातील
तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल.
.
* पुस्तकानं माणसाचं मस्तक सशक्त होतं.
सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नसतं
आणि हस्तक न झालेलं मस्तक
कुठेही नतमस्तक होत नसतं.
जोपासला जर वाचन छंद
वाईट विचार होतील बंद
जिथे पुस्तकांचा साठा
तिथे समृद्धीला नाही तोटा
वाचन केल्याने मिळते ज्ञान
दूर पळते आपले अज्ञान
रोज वाचा एक पुस्तक
थंड राहील आपले मस्तक
तू होशील खरा सज्ञान
देशील जर वाचनावर ध्यान
पुस्तकाचे कपाट घरी
सरस्वती तेथे वास करी
वाचन करता मिळते ज्ञान
उंचावते आपले जीवनमान
वाचनाने सुंदर होते मती
मिळते आपल्या विकासाला गती