कोडी
कोडी
पातळ पदार्थ कितीही
टाका त्याच्या पोटात
पोट काही भरेना
पोटात
काही उरेना.
-----------------------------------------------------------------------------------
कुणाला जवळचे
कुणाला लांबचे
डोळे असुनी दिसेना
मदत
करतो मी त्यांना
---------------------------------------------------------------------------------
सुखात दुःखात
सहज येतात
कोमट खारट
ते
असतात
-------------------------------------------------------------------------------
पाण्यात राहतो
जमिनीवर राहतो
पावसाळ्यात फक्त
बड्बडगीत
गातो.
-------------------------------------------------------------------------------
समोरासमोर तोंडे त्यांची
दुसऱ्यापेक्षा पहिला दुप्पट
ओळखा पाहू ? कोडे सोपे
डोकं
चालवा फटफट
-------------------------------------------------------------------------------
रिमझिम पाऊस पडला छान
पडले पिवळे लख्ख उन
सप्तरंगी सुंदर ड्रेस घालून
सांगा
बरे आले कोण ?
---------------------------------------------------------------------------------
मातीत राहतो , मातीच खातो
उलट-सुलट चालू शकतो
शेतकऱ्याचा मित्र
सांगा
बरे तो कोण ?
------------------------------------------------------------------------------
नभ नगरीची सोनेरी परी
नाचते
फार छान अंधारी
-------------------------------------------------------------------------------
असुनी पक्षी तो
अश्वाहूनही वेगे धावे
धावताना वर्तुळाची
छान नक्षी
काढे
---------------------------------------------------------------------------------
एका शिंगाचा एकमेव प्राणी
कातडी कणखर
चिलखतावाणी
-----------------------------------------------------------------------------------
गंमत गाणी गोड गोष्टी
ज्ञान आंनद देतो सदा
आहे तुमचा तो मित्र
रागवेना कधीच तो
उत्तरे-नरसाळे,चष्मा, अश्रू, बेडूक , ६३, इंद्रधनुष्य,
गांडूळ, वीज,शहामृग,गेंडा, पुस्तक.
s चे उच्चारण
S चे
उच्चारण
शब्दाच्या शेवटी be,g,gg,ge,ie,ee,y आले तर s चा उच्चार ज होतो.
Tribes
bags
eggs
toys
natives
memories
stories
rays
rupees
hangs
शब्दाच्या शेवटी f,p,pe,te आले तर s चा उच्चार स होतो.
lips
jokes
hopes
chips
roofs
kites
ships
शब्दामध्ये s किंवा ss नंतर ia,
ion, असेल तर s चा उच्चार श होतो.
Mission
Permission
Pension
Russia
Issue
विभक्ती
विभक्ती |
उदाहरण
|
कारकार्थ |
प्रथमा
|
देव
सर्वत्र आहे. |
कर्ता |
द्वितीया
|
आम्ही
देवास भजतो |
कर्म |
तृतीया
|
देवाने
जग निर्माण केले |
करण |
चतुर्थी
|
आम्ही
देवाला नैवेद्य दाखवला. |
संप्रदान |
पंचमी
|
देवाहून
कोणी श्रेष्ठ नाही |
अपादान
|
षष्टी |
देवाचे
सर्वत्र गुणगान गाईले जातात |
संबंध
|
सप्तमी
|
देवात
अनेक सद्गुण आहेत . |
अधिकरण
|
संबोधन
|
देवा,तुझा
अंखड आशीर्वाद आम्हावर राहू दे . |
हाक
मारणे |
म्हणी
म्हणी
...............................................................................
* दिवसभर घरी, दिवा लावून दळण करी.
* दिवस असा तसा , दिव्याच्या
उजेडात तांदूळ नीसा.
* दिवस गेला गोठी माठी, अन
चांदण्यात कापूस वटी.
* चोराला चावला विंचू, चोर करीना हुं
की चू.
* रोज घालतोय शिव्या, आणि एकादशीला
गातोय ओव्या .
* पाच पन्नास आचारी , वरणात मीठ
भारी.
*राजा उदार झाला, अन भोपळा दान
केला.
* गाढवाला दिला मान त्याने केले
उंच कान .
* अघोरे उपाशी अन जीव टोपल्यापाशी .
*बैलाने रडावे तो गोणीच रडते.
* का ग बाई रोड ( तर म्हणे )
गावाची ओढ.
*घोड्यावर अंबारी आणि हत्तीवर
खोगीर .
* भरल्या गाडीस सूप जड नाही.
* श्री मागून ग येतो.
*जेवढा व्याप तेवढा संताप.
*फासा त्याचा मासा.
आधीच रडे तो घोडे काय चढे ?
ing प्रत्यय
ing
प्रत्यय
*
ask – asking
work – working
play- playing
go-going
do-doing
speak – speaking
...................................................................................
* क्रियापदाचे शेवटचे अक्षर e असेल
व पूर्वीचे अक्षर व्यंजन असेल तर e निघून जातो व क्रियापदाला ing जोडले जाते.
write- writing
give- giving
take- taking
come- coming
change – changing
solve- solving
leave- leaving
make- making
...................................................................................*क्रियापदाच्या
शेवटी ie असेल तर ie निघून जाते.व त्याऐवजी y येऊन ing प्रत्यय लागतो.
lie- lying
die- dying
...................................................................................
* ज्या क्रियापदाच्या शेवटचे अक्षर
एकच व्यंजन व त्याच्या पूर्वी एकच अक्षर
स्वर असेल तर शेवटचे अक्षर दोनदा येते.व ing प्रत्यय लागतो.
run- running
swim- swimming
stop-stopping
dig- digging
cut- cutting
shut –shutting
..................................................................................
speak- speaking या शब्दात e व a असे दोन स्वर आले आहेत.
.............................................................................
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने-
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने-
*अज्ञानाच्या अंधाऱ्या रात्रीना
उजळून टाकण्याचे सामर्थ्य ग्रंथामध्ये असते.ग्रंथाच्या तेजातच क्रांतीची बीजे
असतात.ग्रंथ आम्हाला माणुसकी आणि शांती
शिकवितात. या क्रांतीचे माणुसकीचे , शांतीचे नवेनवे वारसदार निर्माण करण्याचे काम
ग्रंथ करतात.
* पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक
असते.
* पुस्तकांच्या जगात शिरले की
मनावरचे मळभ दूर होते.
* ग्रंथ वाचनाने माणूस मोठा झाला नाही तरी शहाणा जरूर होतो.
आपला वेळ, बुद्धी आणि मन संस्कारित
करण्यासाठी ग्रंथ वाचनावर भर दिलाच पाहिजे,
* वाचनाचा लळा , फुलवी जीवनाचा
मळा.
.
*जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा
वाचनालयात जातील
तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल.
.
* पुस्तकानं माणसाचं मस्तक सशक्त होतं.
सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नसतं
आणि हस्तक न झालेलं मस्तक
कुठेही नतमस्तक होत नसतं.
जोपासला जर वाचन छंद
वाईट विचार होतील बंद
जिथे पुस्तकांचा साठा
तिथे समृद्धीला नाही तोटा
वाचन केल्याने मिळते ज्ञान
दूर पळते आपले अज्ञान
रोज वाचा एक पुस्तक
थंड राहील आपले मस्तक
तू होशील खरा सज्ञान
देशील जर वाचनावर ध्यान
पुस्तकाचे कपाट घरी
सरस्वती तेथे वास करी
वाचन करता मिळते ज्ञान
उंचावते आपले जीवनमान
वाचनाने सुंदर होते मती
मिळते आपल्या विकासाला गती
Y चे उच्चारण
Y चे उच्चारण
Y चा उच्चार = य
शब्दांच्या सुरुवातीस अथवा मध्ये yआल्यास y चा उच्चार य करावा
.
layer
yet
yell
yellow
you
your
beyond
loyal
Y उच्चार = आय
y अक्षर शब्दाच्या शेवटी असेल आणि
y पूर्वी जर एकच आवाज येत असेल तर उच्चार आय करावा.
dry
try
fry
sky
why
shy
my
by
Y उच्चार = ई
y अक्षर शब्दाच्या शेवटी असेल आणि y पूर्वी जर एकापेक्षा जास्त आवाज असतील तर
y चा उच्चार ई करावा .
funny
sunny
many
body
story
rainy
puppy
silly
twenty
thirty
forty
नऊचा भागाकार
नऊचा
भागाकार
213 ÷9 =
भाज्य = 213
भागाकार= 23
एकूण = 236
भागाकर = 23
बाकी =6
230 ÷9 =
भाज्य = 230
भागाकार= 25
एकूण = 255
भागाकर = 25
बाकी =5
999 ÷9 =
भाज्य = 999
भागाकार= 111
एकूण = 1110
भागाकर = 111
बाकी =0
भाज्य आणि भागाकार यांची बेरीज
केली असता मिळणाऱ्या बेरजेतील शेवटचा अंक बाकी असते , व उरलेली संख्या भागाकार
असते.
4387 ÷9
1) प्रथम 4 हा अंक तीन वेळा घेतला.=444
2) 3 हा अंक दोन वेळा घेतला.= 33
3) 8 हा अंक एकदा घेतला .=8
4) वरील सर्व अंकांची बेरीज केली =
485
5) वरील भागाकारातील सर्व अंकांची
बेरीज केली = 4+3+8+7 =22
6) आलेल्या बेरजेला 9 ने भागले =
22÷9 = 2.44
7) 485+2.44 = 487.44 हा भागाकार
मिळेल .
34567 ÷9
1) प्रथम 3 हा अंक चार वेळा घेतला.=3333
2) 4 हा अंक तीन वेळा घेतला.= 444
3) 5 हा अंक दोनदा घेतला .=55
4) 6 हा अंक एकदा घेतला .=6
4) वरील सर्व अंकांची बेरीज केली =
3838
5) वरील भागाकारातील सर्व अंकांची
बेरीज केली = 3+4+5+6+7 =25
6) आलेल्या बेरजेला 9 ने भागले =
25÷9 = 2.77
7) 3838+2.77
= 3840.77 हा भागाकार मिळेल .