संविधान दिन -प्रश्नमंजुषा
1) संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
2) भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते ?
3) संविधान सभेची अखेरची बैठक कधी झाली ?
4) भारतीय जनतेने मसुदा समितीला किती सूचना सादर केल्या ?
5) संविधान सभेची स्थापना कधी करण्यात आली ?
6) संविधान समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली ?
7) संविधान समितीच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती
केली ?
8) मसुदा समितीच्या एकूण किती सभा झाल्या ?
9) संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला होता ?
१०) भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणास म्हटले जाते ?
११) घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले ?
१२) भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करण्याचा अधिकार
कोणाला देण्यात आला आहे ?
13) भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी किती खर्च आला ?
14)भारतीय संविधान कधी अंमलात आले ?
15) कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो ?
१६) भारताच्या संविधानाने कोणत्या शासन पद्धतीविषयी तरतूद केली आहे ?
१७)भारताच्या संविधान निर्मितीला कधी सुरुवात झाली ?
१८)संविधान तयार करण्यासाठी संविधान
सभेने किती समित्या तयार केल्या होत्या ?
१९) कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानासाठी वयाची अट 21 वरून 18 केली ?
२०)भारताची मूळ घटना कोणी हस्तलिखित केली ?
21)मूळ भारतीय राज्यघटनेत किती भाग, कलम. आणि अनुसूची होत्या ?
२२)सध्या भारतीय राज्यघटनेत किती भाग, कलम. आणि अनुसूची आहेत ?
23)भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती
अधिवेशने झाली ?
२४) भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती कोणत्या भाषेत लिहिल्या आहेत ?
२५)भारताचे संविधान कोणत्या तारखेला स्वीकारले गेले ?
२६) मुलभूत अधिकाराचे रक्षक कोणाला म्हटले जाते ?
27)संविधानात मुलभूत कर्तव्ये किती आहेत ?
28) केंद्र सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून कोणत्या वर्षी
घोषित केला?
29) भारतीय संविधान स्वीकारणाऱ्या संविधान सभेत किती निवडून आलेले सदस्य होते?
30) राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार 14 वर्षाखालील मुलांना बालकामगार म्हणून कामावर ठेवता येणार नाही?
३१) राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय कायद्यासमोर समान आहेत?
३२) मूलभूत हक्काची संकल्पना राज्यघटना तयार करताना कोणत्या देशाकडून
स्वीकारली आहे?
33) कितव्या घटनादुरुस्तीने 2002 नुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा आता मूलभूत हक्क मानला गेला आहे?
३४) देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले मुलभूत कायदे ज्या
ग्रंथात एकत्रित आहे त्यास काय म्हणतात?
३५) भारताच्या केंद्रीय कायदे मंडळाला काय म्हणतात?
३६) घटनेच्या कोणत्या कलमानुसार जातिभेद व अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे?
३७) राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिला आहे?
38 ) जम्मू-काश्मीर बाबत खास तरतूद असणारे कोणते कलम रद्द केले आहे?
39) राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार शिक्षण संस्थेतून धार्मिक शिक्षण देण्यास
बंदी घातली आहे?
40) शिक्षण हा विषय घटनेच्या कोणत्या सूची मध्ये येतो?
उत्तरे
1)
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर २) डॉ. राजेंद्र प्रसाद 3) 24
जानेवारी 1950 ४) 7555
5) 12 डिसेंबर ६) डॉ. राजेंद्रप्रसाद 7) हरेंद्रकुमार मुखर्जी 8) 44 ९) 2 वर्षे 11 महिने 18 दिवस १०) डॉ.बाबासाहेब आंबेडकर ११) दिल्ली 12)
पंतप्रधान 13) 65 लाख रुपये
14) 26 जानेवारी 1950 15) 26
नोव्हेंबर १६) संसदीय १७) 6 डिसेंबर 1946
18) 22 १९) 61 वी घटना
दुरुस्ती 20 ) प्रेम बिहारी नारायण रायझादा
21) 22 भाग -395 कलमे -8 अनुसूची 22) 25
भाग -408 कलमे -12 अनुसूची 23)11 (अकरा )
24) हिंदी व इंग्रजी 25)26 नोव्हेंबर 1949 26) सर्वोच्च न्यायालय 27) ११
कर्तव्ये
28) 2015 29) 299 30) कलम
24 ३१) कलम 14 32 ) अमेरिका 33) 86 वी
घटना दुरुस्ती ३४) संविधान 35 ) संसद 36) कलम
17 37) पं. जवाहरलाल नेहरू 38) कलम 370 39)
कलम 28 40) समवर्ती सूची .
