सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

गणित सराव

 

* एका त्रिकोणाच्या बाजू 13 सेंटीमीटर 14 सेंटीमीटर व 15 सेंटीमीटर आहेत तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळ काढा ?

* एका लीप वर्षाची सुरुवात रविवारने झाली असल्यास 15 मे पासून 18 दिवस सुट्टीवर असणारा संतोष कोणत्या वारी कामावर हजर होईल ?

* 36 च्या पुढोल 15व्या विषम संख्येचा घन किती ?

* 513,1134,1215 या संख्यांचा मसावि किती ?

* एक विमान x हे अंतर 240 किमी प्रतितास इतक्या वेगाने 5 तासात पूर्ण करते तेच अंतर दीड तासात पूर्ण करण्यासाठी ते विमान ताशी किती किमी वेगाने चालवावे लागेल ?

* 50 x 30 मी . आकाराच्या आयताकृती बागेस भोवती कडेने 2.5 मी रुंदीचा रस्ता आहे तर रस्ता सोडून बागेचे क्षेत्रफळ किती ?

( 1125 )

* जर एखादया चौकोनाच्या समोरा समोरील बाजू समान व त्याचे कर्ण समान असतील तर त्या चौकोनाचा प्रत्येक कोन किती अंशाचा असतो ?

* एका परीक्षेत बरोबर उतराला 4 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जातात . अजयने 80 प्रश्न सोडवले व त्याला 140 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडवले ?

( 50)

* 45 लोकांच्या एका बैठकीत 40 लोक एकमेकांना ओळखतात आणि उर्वरित कोणालाही ओळखत नाहीत . एकमेकांना ओळखणारे लोक फक्त मिठी मारतात . तर जे एकमेकांना ओळखत नाहीत ते फक्त हात मिळवतात या बैठकीत किती हातमिळवण्या होतील ?

(210)

* 3 तास 10 मिनीटांच्या कालावधीत एका बरोबर घड्याळाच्या मिनीट काट्याने कापलेले कोनीय अंतर किती असेल ?

( 1140)

*P या नळाने एक टाकी भरण्यास 10 तास लागतात तसेच Q या नळाने टाकी रिकामी होण्यास 14 तास लागतात . दोन्ही नळ एकाच वेळी सुरु केले परंतु 7 तासानंतर Q नळ बंद केला तर संपूर्ण टाकी भरण्यास किती वेळ लागेल ?

( 15 तास )

* काही माणसे एक काम 60 दिवसात करतात मात्र 5 मजूर कमी केल्यावर ते काम संपण्यासाठी 10 दिवस जास्त लागतात तर सुरुवातीला किती मजूर होते ?

( 35 मजूर )

* प्रेमने 60 किमी / तास वेगाने जाणाऱ्या कारने 240 किमी अंतर , नंतर 100 किमी / वास जाणाऱ्या रेल्वेने 400 किमी अंतर व उर्वरित 200 किमी अंतर 50 किमी / तास जाणाऱ्या बसने पार केले तर संपूर्ण प्रवासात त्याचा सरासरी वेग किती ?

* जर P आणि Q ची सरासरी 20 आहे Q आणि Y ची सरासरी 25 आहे , P Q Y ची सरासरी 23 आहे तर P आणि Y ची सरासरी किती असेल ?

* एका भांड्यात 112 लीटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हणजे दूध आणि पाणी यांचे परस्पर प्रमाण 13: 3 होईल ?

( 21 )

 

*217/339,221/335,222/339,214/335 या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

* एका बॅगेत एकूण 75 रुपये किंमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची नाणी समान आहेत तर 25 पैशांची नाणी किती ?

* 180 रु किलो दराने विकावयाची सुपारी व 195 रु किलो दराने विकावयाची सुपारी 3: 2 या प्रमाणात एकत्र मिसळल्यास ती काय दराने विकावी म्हणजे अपेक्षित रक्कम वसूल होईल ?

( 186 रु )

* स्वाती दीप्ती आणि प्रीतीकडे  मिळून 190 रुपये आहेत. प्रीती जवळ दीप्ती पेक्षा 3 रु कमी आहेत स्वाती जवळ दीप्ती जवळ असलेल्या रकमेच्या दुपटीपेक्षा 5 रु जास्त आहेत तर दीप्ती जवळ किती रुपये आहेत ?

* 15 मजूर 15 तासात 20 x 30 आकाराची भिंत रंगवतात तर 10 मजूर किती तासात 26 x 40 आकाराची भिंत रंगवतील  ?

( 39 तास )

* एका परीक्षेत 25 % विद्यार्थी इंग्रजीत अनुतीर्ण झाले 20 % विद्यार्थी गणितात अनुतीर्ण झाले दोन्ही विषयात 15 % अनुतीर्ण झाले तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?

* 14 सेमी बाजू असणाऱ्या घनाचे पृष्ठफळ व घनफळ यातील फरक किती ?

( 1568 )

* एका घनाची बाजू 4 मीटर आहे तर ती दुप्पट केली तर त्याचे घनफळ किती पटीने वाढेल ?

* माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत उरलेले लोक एक एकटेच आहेत . यापैकी विवाहित लोकाची संख्या 60 % आहे आणि पुरुषांची संख्या 54 % आहे तर या गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती टकके आहे ?

( 16 % )

* जर केळीचा भाव प्रति डझन 1 रुपयाने वाढवला तर 840 रुपयांस पूर्वीपेक्षा दोन डझन केळी कमी मिळतात तर सुरुवातीचा केळीचा प्रति डझन भाव काढा ?

* एका माणसाचा प्रवाहाच्या दिशेने वेग 15 किती / तास आणि प्रवाहाचा वेग 2.5 किती / तास आहे . तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्या माणसाचा वेग किती ?

* एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग 32 किमी/ तास आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 28 किमी / तास आहे तर स्थिर पाण्यात बोटीचा वेग किती ?

* सचिन सेहवाग आणि धोनी यांनी  मिळून 228 धावा केल्या. जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिन पेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या ?

( 78 )

* एका आयताकृती प्लॉटची लांबी ही रुंदी पेक्षा 60% ने जास्त आहे . जर त्या प्लॉटची लांबी आणि रुंदीतील फरक 48 मीटर असल्यास त्या आयताकृती प्लॉटचे क्षेत्रफळ किती असेल ?

(10240 )

* एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न 8000 रु आहे . तो घर खर्चासाठी 40% शिक्षणा साठी 5% औषध पाण्यासाठी 15% किरकोळ खर्चासाठी 1600 रु वापरतो व शिल्लक बँकेत ठेवतो तर तो मासिक उत्पनाच्या किती पट रक्कम बँकेत ठेवतो ?

( 1/ 5 पट )

* एक माकड 45 मी उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते . ते एका मिनीटाला 5 मी चढते व दुसऱ्या मिनीटाला 3 मी खाली घसरते असे करता करता ते माकड किती मिनीटात त्या खांबाचे टोक गाठेल ?

* एका संख्येला 12 ने गुणण्या ऐवजी चुकून 21 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारा पेक्षा 108 ने जास्त आला तर ती संख्या कोणती ?

* एका बागेत काही मुंग्या व कोळी आहेत त्यांच्या एकूण पायांची संख्या 60 तर डोक्यांची संख्या 9 असेल तर त्या ठिकाणी किती कोळी आहेत ?

( 3 कोळी )

*जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहातील मुलाना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद 55 मोसंबी व 80 केळी खरेदी केली प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली तर वसतीगृहात किती मुले होती ?

( 25 )

* एक घडयाळ 25 % नफ्याने विकले जर त्या विक्री किमती पेक्षा 30 रुपये अधिक देवून घडयाळ विकले असते तर शेकडा 40 रु नफा झाला असता .तर घड्याळाची मूळ किंमत किती ?

* वार्षिक 15 % दराने 2 वर्ष 4 महिन्यांसाठी रु 8000 रकमेवर वार्षिक गणना करून येणारे चक्रवाढ व्याज किती आहे ?

* एका टाकीतील पाण्यात मिठाचे प्रमाण प्रति लीटर 25 % आहे . ती टाकी उन्हात ठेवल्या मुळे त्यातील 30 लिटर पाण्याची वाफ झाली त्यामुळे पाण्यातील मिठाचे प्रमाण 40% झाले. तर मूळ पाणी किती लीटर असेल ?

( 80 लीटर )

* एका पाण्याच्या टाकीला असलेल्या छिद्रामुळे ती पूर्ण भरलेली टाकी 8 तासात रिकामी होते एक नळ त्या टाकीत 6 लीटर प्रति मिनीट या दराने पाणी भरतो जेव्हा हा नळ सुरू केला जातो तेव्हा ती पूर्ण भरलेली टाकी 12 तासात रिकामी होते. तर त्या टाकीची धारकता किती ?

( 8640 ली )