सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

वर्गमूळ

 

                                 वर्गमूळ

संख्येच्या एकक स्थानचा अंक

वर्गाच्या एकक स्थानी येणारा अंक

1

1

2

4

3

9

4

6

5

5

6

6

7

9

8

4

9

1

 

5184 या संख्येचे वर्गमूळ किती ?

*वर्ग संख्येच्या एकक स्थानी 4 हा अंक आहे म्हणून वर्गमूळाच्या एकक स्थानी 2 किंवा 8 हा अंक येईल.

* शेवटचे  दोन अंक सोडून तयार होणाऱ्या संख्येच्या जवळची वर्ग संख्या शोधावी.

51 च्या जवळची वर्ग संख्या =49

·       49 चे वर्गमूळ =7

·       मिळणाऱ्या संख्येच्या पुढील अंक घेऊन गुणाकार करावा.

·       7×8 =56 ही संख्या 51 पेक्षा मोठी आहे .म्हणजेच मुळची संख्या लहान आहे म्हणून 72 आणि  78 पैकी लहान संख्या घ्यावी .

·       म्हणजेच 5184 या संख्येचे वर्गमूळ 72 येईल.

7921 या संख्येचे वर्गमूळ किती ?

*वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे म्हणून वर्गमूळाच्या एकक स्थानी 1 किंवा 9 हा अंक येईल.

* शेवटचे  दोन अंक सोडून तयार होणाऱ्या संख्येच्या जवळची वर्ग संख्या शोधावी.

79 च्या जवळची वर्ग संख्या =64

·       64 चे वर्गमूळ =8

·       मिळणाऱ्या संख्येच्या पुढील अंक घेऊन गुणाकार करावा.

·       8×9 =72 ही संख्या 79 पेक्षा लहान  आहे .म्हणजेच मुळची संख्या मोठी  आहे म्हणून 81 व 89 पैकी  मोठी संख्या घ्यावी .

·       म्हणजेच 7921 या संख्येचे वर्गमूळ 89 येईल.

4489 या संख्येचे वर्गमूळ किती ?

*वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे म्हणून वर्गमूळाच्या एकक स्थानी 3 किंवा 7 हा अंक येईल.

* शेवटचे  दोन अंक सोडून तयार होणाऱ्या संख्येच्या जवळची वर्ग संख्या शोधावी.

44 च्या जवळची वर्ग संख्या =36

·       36 चे वर्गमूळ =6

·       मिळणाऱ्या संख्येच्या पुढील अंक घेऊन गुणाकार करावा.

·       6×7 =42 ही संख्या 44 पेक्षा लहान  आहे .म्हणजेच मुळची संख्या मोठी  आहे म्हणून 63 व 67 पैकी  मोठी संख्या घ्यावी .

·       म्हणजेच 4489 या संख्येचे वर्गमूळ 67 येईल.