सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

घातांक

 

*4×4×4......53 वेळा घेऊन गुणाकार केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल ?

 

453   

 53 ÷4 या भागाकारात बाकी 1 येते म्हणून एकक स्थानी 4 हाच अंक येईल.

 

1) घातांकित संख्येला 4 ने भागावे.

2) भागाकाराची बाकी 1 आल्यास  संख्येच्या एकक स्थानचा अंकच एकक स्थानी येतो.

3) भागाकाराची बाकी 2 आल्यास  संख्येच्या एकक स्थानच्या अंकाचा दोन वेळा गुणाकार करून मिळणारा एकक स्थानचा  अंक एकक स्थानी येतो.

4) भागाकाराची बाकी 3 आल्यास  संख्येच्या एकक स्थानच्या अंकाचा तीन  वेळा गुणाकार करून मिळणारा एकक स्थानचा  अंक एकक स्थानी येतो.

5) भागाकाराची बाकी 0 आल्यास  संख्येच्या एकक स्थानच्या अंकाचा चार  वेळा गुणाकार करून मिळणारा एकक स्थानचा  अंक एकक स्थानी येतो.

 

64243

243 ÷4 या भागाकारात बाकी 3 येते म्हणून एककस्थानी  (4×4×4)=64

म्हणजे  4 हाच अंक येईल.

 

23982

982 ÷4 या भागाकारात बाकी 2 येते म्हणून एककस्थानी  (3×3)=9

म्हणजे  9 हाच अंक येईल.