1) घड्याळात सहा वाजल्याने सहा टोल वाजण्यासाठी 30 सेकंद लागतात तर दहा वाजता दहा टोल वाजण्यासाठी किती सेकंद लागतील?
2) अ , ब, क या तिघांच्या वयाची सरासरी आठ वर्षे आहे . अ पेक्षा क सहा वर्षांनी लहान आहे .ब पेक्षा क बारा वर्षांनी लहान असल्यास 'ब ' चे वय किती?
3) घड्याळात 3 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यात किती अंश मापाचा कोन होईल?
4) ताशी 54 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या आगगाडीला 144 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल?
5) आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे .पाच वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 10: 3 होईल तर मुलाचे आजचे वय किती?
6) सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी सुरू झाली बस सलग ताशी 45 किलोमीटर वेगाने दुपारी 2 वाजून 10 मिनिटांपर्यंत किती तास प्रवास करते?
7) ताशी 24 किलोमीटर वेगाने धावणारा सायकल स्वार अडीच तासात किती अंतर पार करेल ?
8) सोपानच्या तीनपट वय जोसेफचे आहे, हमीदच्या दोन छेद पाच पट वय सोपानचे आहे .जर तिघांचे आजचे सरासरी वय 13 असेल तर जोसेफ चे वय किती?
9) एक आगगाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने सकाळी 8 वाजता निघाली त्यानंतर 11 वाजता त्याच ठिकाणाहून त्याच मार्गाने ताशी 60 किलोमीटर वेगाने दुसरी गाडी निघाली तर त्या दोन गाड्यांची भेट किती वाजता होईल?
10) नदीचा प्रवाह ताशी 8 किलोमीटर तर नावेचा वेग ताशी 12 किलोमीटर आहे .नावेने जे अंतर प्रवाहाच्या दिशेने दोन तासात पार केले ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागेल?
11) ससे व मोर मिळून 18 आहेत त्यांच्या पायांची संख्या 52 आहे तर मोर सशापेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहेत?
12) अचूक उत्तरासाठी त3 गुण मिळतात .तर चुकीच्या उत्तरासाठी मिळालेल्या गुणातून 1 गुण कमी होतो .जर तुषारला 50 प्रश्नांच्या पेपर मध्ये 78 गुण मिळाले तर त्याची किती उत्तरे अचूक आली?
13) 72 सेंटीमीटर लांब दोरीचे समान आठ भाग केल्यामुळे प्रत्येक तुकडा किती सेंटीमीटर लांबीचा होईल?
.
14) आई मुलगी यांच्या वयाची बेरीज 30 वर्षे आहे .तर आई मुलीपेक्षा 22 वर्षांनी मोठी असल्यास मुलीच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती होते?
15) राम .,श्याम व जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्षे आहे . राम व शाम यांच्या वयाची सरासरी 14 वर्षे आहे . तर जॉनचे वय किती वर्ष आहे ?
16) आई-वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5:1 आहे .जर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर आजचे वडिलांचे वय किती?
17) सकाळी 10-30 वाजता सुरू झालेल्या क्रिकेटचा सामना दुपारी 2-15 वाजता संपला . तर सामना किती वेळ सुरू होता?
18) सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो?
19) वसंत व शरद यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे .त्यांच्या 8 वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 6:5 होत असेल तर दोघांच्या वयातील फरक किती?
20) घड्याळात 8 वाजून 20 मिनिटे झाले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंश मापाचा कोण होतो?
21) सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी निघालेला तसेच ताशी 24 किलोमीटर वेगाने धावणारा सायकल स्वार प्रत्येक तासाला 10 मिनिटे विश्रांती घेतो . तर 120 किलोमीटर आंतरतील गावी तर किती वाजता पोहोचेल?
22) राधा मीना व लैला यांच्या वयात आजच्या वयाचे गुणोत्तर 5:4:3 आहे .आठ वर्षानंतर राधा लैला पेक्षा आठ वर्षांनी मोठी असेल तर चार वर्षानंतर तिघींच्या वयाची सरासरी किती?
23) सकाळी 8 वाजता एक गाडी ताशी 40 किलोमीटर वेगाने ज्या गावी निघाली त्याच ठिकाणाहून त्याच मार्गाने दुसरी गाडी सकाळी 10-30 वा ताशी 60 किलोमीटर वेगाने निघाली तर त्या दोन्ही गाड्या किती वाजता एकमेकांना भेटतील?
24) घड्याळात दुपारी 3-30 वाजल्यापासून रात्री 9-30 पर्यंत किती वेळा मिनिट काटा तास काट्याला ओलांडतो?