सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

अंतर-वेग –वेळ

अंतर-वेग –वेळ

1)300  मीटर लांबीच्या ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?

2) 450 मीटर लांबीच्या ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास  किती वेळ लागेल ?

3) ताशी 63 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 385 मीटर लांबीच्या गाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

4) ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस  400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

5) 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीला 420 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास  किती वेळ लागेल ?

6) ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 540 मीटर लांबीच्या मालगाडीस  460 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास  किती वेळ लागेल ?

7) ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 120 मीटर लांबीच्या गाडीस  1.०80 किलोमीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

8) ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती ?

9) ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी  आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती ?

10) ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 260 मीटर लांबीची एक गाडी एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती ?

11) ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती ?

12) ताशी 48 किलोमीटर वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती ?

13) ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 220 मीटर लांबीची आगगाडी एक फुल 36 सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती?

14) 800 मीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?

15) 600  मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडणाऱ्या  गाडीचा ताशी वेग किती कि.मी.?

16) 1.5 कि.मी. अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती कि.मी.?

17) मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी 60 किलोमीटर वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30  वाजता सुटली त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी  ताशी 75 किलोमीटर वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील ?

18) मुंबईहून एक मोटार मद्रास ला जाण्यास सकाळी 6  वाजता तसेच 40 किलोमीटर वेगाने निघाली त्यानंतर सकाळी ठीक 7-30  वाजता त्याच ठिकाणाहून दुसरी मोटर ताशी 50 कि.मी. वेगाने निघाली तर त्या दोन मोटारींची  भेट किती वाजता होईल ?

19) पुण्याहून एकाच ठिकाणाहून नागपूरला निघालेल्या दोन गाड्या पैकी एक दुपारी 12:45 वाजता ताशी 60 किलोमीटर वेगाने व दुसरी दुपारनंतर 2-15 वाजता ताशी 90 किलोमीटर वेगाने निघाल्यास त्यांची भेट किती वाजता होईल ?

20) नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 54 किलोमीटर वेगाने सकाळी 9 वाजता व दुसरे ताशी  72 किलोमीटर वेगाने सकाळी 10-40वाजता सुटली तर त्या किती वाजता भेटतील ?

21) मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या दोन एसटी गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या पहिली ताशी 68 किलोमीटर वेगाने सायंकाळी 4:50 वाजता सुटली दुसरी ताशी 85 किलोमीटर वेगाने सायंकाळी 6-20 वाजता सुटली तर त्या एकमेकीना  किती वाजता भेटतील ?

22) मुंबई ते गोवा हे 540 किलोमीटर अंतर आहे. मुंबईहून सकाळी 8-30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या गाडीची  त्याच वेळी गोव्याहून  सुटलेल्या ताशी 75 किलोमीटर वेग असलेल्या गाडीशी  किती वाजता भेट होईल ?

२३) मुंबई ते अमरावती हे 750 किलोमीटर अंतर आहे .एकाच वेळी सकाळी 6 वाजता परस्परविरोधी दिशेने निघाल्या .गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 55 किलोमीटर व ताशी 70  किलोमीटर असल्यास दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील ?

24) मुंबई ते बेळगाव हे 590 किलोमीटर अंतर आहे. एकाच वेळी 7 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या एसटी गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 48 किलोमीटर व ताशी 70 किलोमीटर आहे तर त्या दोघींची भेटीच्या वेळी बेळगावहुंन निघालेल्या गाडीने किती अंतर कापले असेल ?

25) मुंबई ते औरंगाबाद हे अंतर 450 किलोमीटर असल्यास एकाच वेळी सुटलेल्या दोन बस गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने अनुक्रमे ताशी 58 किलोमीटरवर 42 किलोमीटर वेगाने निघाल्यास एकमेकींचे भेटीचे वेळी मुंबईहून सुटलेल्या गाडीने किती अंतर कापले असेल ?

26) मुंबई ते जळगाव हे 600 किलोमीटरचे अंतर कापण्यास दोन मोटार गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने निघाल्या मुंबईहून एक तास अगोदर सुटलेल्या गाडीचा ताशी वेग 50 किलोमीटर होता व जळगाव हून सुटलेल्या गाडीचा ताशी वेग 60कि.मी.होता.परस्परांना भेटण्याचे वेळी मुंबईहून सुटल्या गाडीने किती अंतर कापले असेल ?

27) 9 सेकंदात एक गाडी 120 मीटर अंतर जाते तर तिचा ताशी वेग किती ?

28 ) 15 सेकंदात एक गाडी 300  मीटर अंतर जाते तर तिचा ताशी वेग किती ?

29) 12 सेकंदात एक गाडी 150 मीटर जाते तर तिचा ताशी वेग किती ?

30) ताशी 60 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 75 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामारवर 48 मिनिटे लवकर पोचली तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला ?

31) ताशी 45 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी  सरासरी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 1.5 तास लवकर पोहोचते तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला ?

32) ताशी 42 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 36 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 20 मिनिटे उशिरा पोहोचते तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला ?

33) जर एक व्यक्ती 4.5 मिनिटात 600 मीटर अंतर चालते तर त्याचा चालण्याचा ताशी वेग किती ?

34) एक मोटार निर्धारित अंतर 10 तासात कापते जर ते अर्धे अंतर तसेच 40 किलोमीटर वेगाने व उरलेले अंतर 60 किलोमीटर वेगाने कापते तर त्या मोटरने एकूण किती किलोमीटर प्रवास केला ?

35) एक आगगाडी A स्थानकावरून B  स्थानकाला जाताना ताशी 45 किलोमीटर वेगाने जाते परंतु येताना ती ताशी वेग वाढवते जर तिच्या येण्या जाण्याचा सरासरी ताशी वेग 52 किलोमीटर असल्यास तिचा B  स्थानकावरून येताना A स्थानकाकडे  येण्याचा ताशी सरासरी वेग किती ?

36) अंतर 380 किलोमीटर असून A ठिकाणाहून एक आगगाडी ४० किलोमीटर प्रतितास वेगाने सकाळी आठ वाजता B च्या दिशेने व दुसरी गाडी B या ठिकाणाहून A च्या  दिशेने सकाळी दहा वाजता 60 किलोमीटर तास वेगाने निघाली तर त्या दोन्ही गाड्या किती वाजता एकमेकींना भेटतील ?

37) दोन गाड्या दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून एकमेकीकडे अनुक्रमे 42 किलोमीटर ताशी व 48 किलोमीटर ताशी या वेगाने निघाल्या या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटल्या तेव्हा एक गाडी 49 किलोमीटर आंतर दुसरी पेक्षा जास्त चालून आली होती तर त्या निघाल्याच्या ठिकाणातील अंतर किती ?

38) Aव B या दोन ठिकाणातील अंतर 330 किलोमीटर असून Aया ठिकाणाहून एक गाडी 60 किलोमीटर प्रतितास व B ठिकाणाहून एक गाडी 50 किलोमीटर प्रतितास या वेगाने एकमेकीच्या दिशेने निघाल्या तर किती वेळाने त्या एकमेकांना भेटतील ?

39) 40 किलोमीटर प्रतितास वेगाने सकाळी 6 वाजता एक बस निघाली त्याच ठिकाणाहून दुसरी बस 50 किलोमीटर प्रतितास वेगाने 7-30 वाजता निघाली तर दोन्ही बस किती वाजता भेटतील ?

40) एका ठिकाणाहून एक रेल्वे सकाळी 7 वाजता 60 किलोमीटर प्रतितास वेगाने व दुसरी रेल्वे त्याच मार्गाने सकाळी 8 वाजता 75 किलोमीटर प्रतितास  वेगाने निघाली तर दोन्ही रेल्वे किती वाजता भेटतील ?