सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

समूहगीत - सबसे उंची विजयपताका ...........

 

समूहगीत -  सबसे उंची विजयपताका ...........

--------------------------------------------------------------------------------------------

 

  ओहो  हो हो

आहा  आ आहा

सा सा सा  सारेगम  गरेसानी

नि नि नि निसारेग रेसानिध

ध ध ध धनिसारे सानिधप

मपधनिसा मपधनिसा मपधनिसा

सबसे उंची विजयपताका

सबसे उंची विजयपताका लिए हिमालय खडा रहेगा ...2

मानवता का मानबिंदू यह भारत सबसे बडा रहेगा

विंध्या के चट्टानोपर रेवा की यह गती तुफानी

शत शत वर्षो तक गाएगी जीवन की संघर्ष कहानी

इसके चरणो में नत होकर हिंदू महोद्धि पडा रहेगा

 

 

 

जिसकी मिट्टी में पारस है  तक स्वर्ण धुली उस बंग भूमी की

पंचनदो के फव्वारो से सिंची बहारे पुण्य भूमि की

शीर्ष बिन्दू श्रीनगर सिन्धुतक सेतूबंधू भी अडा रहेगा ......

उधळित शतकिरणा.......

 

उधळित शतकिरणा उधळित जनहृदया

नभात आला रे प्रभात रवि उदया

तिमिराची रजनी गेली रे गेली लया

 

थरकती  चंचल जललहरी नटली सजली वसुंधरा

मधुमय मंगल स्वरलहरी चढल्या भिडल्या दिगंतरा

धि धि धि ता धि धि धि ता दुदुंभीच्या नादासंगे

अंबराच्या मंदिरात मंद्र वाजे सनई

जय जय बोला जय जय बोला कोटी कोटी कंठानी

भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी

रे संपली ती शर्वरी

ये हा रवी या अंबरी

 

चल करी वंदन नवयुवका , गगनी विलसे नवा रवि

तुजसी न बंधन कधी पथिका दिसली तुजला दिशा नवी

दिड दिड दारा दिड दिड दारा प्राण आता झंकारती

तारुण्याच्या सामर्थ्याला कारुण्याची साथ दे

या भूमीला आकाशाचे आशीर्वाद लाभावे

पौरुषाला विक्रमाचे वैभवाचे हात दे

ही प्रार्थना ही कामना

ही भावना ही अर्चना

गीत – वसंत बापट

प्रार्थना -सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु

 

          प्रार्थना -सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु

 

           सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु

            करते है हम शुरू आज का काम प्रभु..........2

 

           शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम

           विद्या का वरदान तुम्ही से पाए हम ..........2

           हां विद्या का वरदान तुम्ही से पाए हम

         

           तुम ही से है आगाज तुम्ही से अंजाम प्रभु

           करते है हम शुरू आज का काम प्रभु..........2

 

            सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु

            करते है हम शुरू आज का काम प्रभु..........2

 

         गुरु ओ का सत्कार कभी ना भूले हम

         इतना बने महान गगन को छू ले हम ...........2

         हां इतना बने महान गगन को छू ले हम

          

         तुम्ही से है हर सुबह तुम ही से शाम प्रभु

         करते है हम शुरू आज का काम प्रभु..........2

              सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु

            करते है हम शुरू आज का काम प्रभु..........2

            करते है हम शुरू आज का काम प्रभु..........2

 

 

 

 

 

 

 

रांगेतील स्थान

 1) 57 पटसंख्या असणाऱ्या वर्गातील मुलांच्या हजेरी पत्रकात मध्यभागी येणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल ?


2) एका जिन्याच्या 26 व्या पायरीवर राहुल उभा आहे ती पायरी जिन्याची मधली पायरी असल्यास एकूण पायऱ्या किती?


3) सभा मंडपातील एका रांगेतील निळ्या खुर्चीचा पुढून 32 वा आणि मागून 23 वा क्रमांक असल्यास त्या रांगेतील खुर्च्या किती?


4) 74 मुलांमध्ये अथर्व शेवटून 29 व्या स्थानावर उभा असल्यास तो पुढून कितव्या स्थानी असेल?


 5) वीज भरणा करणाऱ्या च्या रांगेत सविताच्या पुढे 20 आणि मागे पस्तीस व्यक्ती असल्यास त्या रांगेत एकूण व्यक्ती किती ?


6) कुंड्यांच्या रांगेत हिरव्या कुंडीचा डावीकडून 29 वा आणि उजवीकडून पंधरावा क्रमांक असल्यास मधल्या कुंडीचा क्रमांक कितवा असेल?


7) कवायतीसाठी उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा आठ ने रांगा जास्त आहेत जर एका रांगेत 21 विद्यार्थी असतील तर कवायतीसाठी किती विद्यार्थी उपस्थित होते?


8) एका शिडीच्या वरून अकराव्या पायरीवर उभा असून त्याच्याखाली तिसऱ्या पायरीवर उभा असलेला रोहित मध्यभागी आहे तर वरून पाचव्या आणि खालून आठव्या क्रमांकाच्या पायऱ्या दरम्यान किती पायऱ्या आहेत?


 9) एका रांगेत हर्ष आठव्या स्थानावर उभा असून त्याच्या आधी दुसऱ्या स्थानावर शार्दुल उभा आहे शार्दुल नंतर पाचव्या स्थानी आराध्य उभा असल्यास शार्दुल व आराध्य दरम्यान किती मुले आहेत?


10) 72  चित्रांच्या मालिकेत वाघ, सिंह , कोल्हा,हत्ती व हरीण या पाच प्राण्यांची चित्रे क्रमशः लावल्यास 63 व्या क्रमांकावर कोणत्या प्राण्याचे चित्र येईल?


11) रस्त्याच्या कडेने लावलेल्या लगतच्या तीन विजेच्या खांबातील अंतर 100 मीटर आहे तर त्या रस्त्याच्या कडेने लावलेल्या पाचव्या विजेच्या खांबापासून तिसरा तिसावा विजेता काम किती अंतरावर आहे ?


12) 30 × 15 मीटर आयताकृती मैदानाच्या कडेने 1.5 मीटर अंतरावर एक खांब रोवल्यास त्या संपूर्ण मैदानाभोवती किती खांब ठरवावे लागतील?


13) एका रांगेत ऐश्वर्याच्या मागे सहा मुली सोडून 25 मुली उभे आहेत व पुढे तीन मुले उभे असल्यास ओढून 18 व्या मुलीचा शेवटून कितवा क्रमांक ?


14) एका रांगेत दोन मुलानंतर तीन मुली याप्रमाणे 32 मुले मुली केल्यास मुलींची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अगर कमी आहे ?

तर्क व अनुमान - भाषिक

 1) घड्याळात सहा वाजल्याने सहा टोल वाजण्यासाठी 30 सेकंद लागतात तर दहा वाजता दहा टोल वाजण्यासाठी किती सेकंद लागतील?


2) अ , ब, क  या तिघांच्या वयाची सरासरी आठ वर्षे आहे . अ पेक्षा क सहा वर्षांनी लहान आहे .ब पेक्षा क बारा वर्षांनी लहान असल्यास 'ब ' चे वय किती?


3) घड्याळात 3 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यात किती अंश मापाचा कोन होईल?


4) ताशी 54 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या आगगाडीला 144 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल?


5) आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे .पाच वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 10: 3 होईल तर मुलाचे आजचे वय किती?


6) सकाळी 6  वाजून 40 मिनिटांनी सुरू झाली बस सलग ताशी 45 किलोमीटर वेगाने दुपारी 2 वाजून 10 मिनिटांपर्यंत किती तास प्रवास करते?


7) ताशी 24 किलोमीटर वेगाने धावणारा सायकल स्वार अडीच तासात किती अंतर पार करेल ?


8) सोपानच्या  तीनपट वय जोसेफचे आहे, हमीदच्या दोन छेद पाच पट वय सोपानचे आहे .जर तिघांचे आजचे सरासरी वय 13 असेल तर जोसेफ चे वय किती?


9) एक आगगाडी  ताशी 45 किलोमीटर वेगाने सकाळी 8 वाजता निघाली त्यानंतर 11  वाजता त्याच ठिकाणाहून त्याच मार्गाने ताशी 60 किलोमीटर वेगाने दुसरी गाडी निघाली तर त्या दोन गाड्यांची भेट किती वाजता होईल?

10) नदीचा प्रवाह ताशी 8 किलोमीटर तर नावेचा वेग ताशी 12 किलोमीटर आहे .नावेने जे अंतर प्रवाहाच्या दिशेने दोन तासात पार केले ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागेल?


11) ससे व मोर मिळून 18 आहेत त्यांच्या पायांची संख्या 52 आहे तर मोर सशापेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहेत?


12) अचूक उत्तरासाठी त3 गुण मिळतात .तर चुकीच्या उत्तरासाठी मिळालेल्या गुणातून 1 गुण कमी होतो .जर तुषारला 50 प्रश्नांच्या पेपर मध्ये 78 गुण मिळाले तर त्याची किती उत्तरे अचूक आली?


13) 72 सेंटीमीटर लांब दोरीचे समान आठ भाग केल्यामुळे प्रत्येक तुकडा किती सेंटीमीटर लांबीचा होईल?

.

 14) आई मुलगी यांच्या वयाची बेरीज 30  वर्षे आहे .तर आई मुलीपेक्षा 22 वर्षांनी मोठी असल्यास मुलीच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती होते?


15) राम .,श्याम व जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्षे आहे . राम व शाम यांच्या वयाची सरासरी 14 वर्षे आहे . तर जॉनचे वय किती वर्ष आहे ? 


16) आई-वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5:1 आहे .जर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर आजचे वडिलांचे वय किती?


17) सकाळी 10-30  वाजता सुरू झालेल्या क्रिकेटचा सामना दुपारी 2-15 वाजता संपला . तर सामना किती वेळ सुरू होता?


18) सकाळी 10  वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो?


19) वसंत व शरद यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे .त्यांच्या 8  वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 6:5 होत असेल तर दोघांच्या वयातील फरक किती?


20) घड्याळात 8 वाजून 20 मिनिटे झाले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंश मापाचा कोण होतो?


21) सकाळी 10  वाजून 30 मिनिटांनी निघालेला तसेच ताशी 24 किलोमीटर वेगाने धावणारा सायकल स्वार प्रत्येक तासाला 10  मिनिटे विश्रांती घेतो . तर 120 किलोमीटर आंतरतील गावी तर किती वाजता पोहोचेल?


22) राधा मीना व लैला यांच्या वयात आजच्या वयाचे गुणोत्तर 5:4:3 आहे .आठ वर्षानंतर राधा लैला पेक्षा आठ वर्षांनी मोठी असेल तर चार वर्षानंतर तिघींच्या वयाची सरासरी किती?


23) सकाळी 8  वाजता एक गाडी ताशी 40 किलोमीटर वेगाने ज्या गावी निघाली त्याच ठिकाणाहून त्याच मार्गाने दुसरी गाडी सकाळी 10-30 वा  ताशी 60  किलोमीटर वेगाने निघाली तर त्या दोन्ही गाड्या किती वाजता एकमेकांना भेटतील?


24) घड्याळात दुपारी 3-30 वाजल्यापासून रात्री 9-30 पर्यंत किती वेळा मिनिट काटा तास काट्याला ओलांडतो?

गणिती तार्किकता -

 

गणिती तार्किकता -

 

1)-आतापासून आठ वर्षांनी मोनिकाचे वय ती सहा वर्षाचे असतानाच्या दुप्पट होईल तर तिचे आत्ताचे वय काय ?

 

2)- आठ माणसांचे सरासरी वय दोन वर्षांनी वाढले त्यांच्यातील दोघे जेव्हा 20 आणि 24 वर्षांचे होते तेव्हा जागी दोन स्त्रिया आल्या तर त्या दोघींचे सरासरी वय काय?

 

3)- रमेश चे 1/3 गणितातील गुण हे त्याच्या इंग्रज येथील गुणांबरोबर आहेत त्याला दोन विषयात एकूण 150 गुण मिळाले आहेत तर त्याला इंग्रजीत किती गुण मिळाले ?

4)-एका सर्वेक्षणात सर्वेक्षण केलेल्या पैकी 60 टक्के लोकांकडे मोटार गाडी आणि 80 टक्के लोकांकडे टीव्ही असल्याचे दिसून आले त्यातील 55% लोकांकडे दोन्हीही होते तर केवळ मोटार गाडी आणि केवळ टीव्ही असलेल्यांची टक्केवारी किती?

 

5)-राम हरी आणि गोविंदा यांचा एकूण पगार 1440 रुपये आहे ते अनुक्रमे त्यांच्या पगाराच्या 80 टक्के 85 टक्के व 75 टक्के खर्च करतात जर त्यांच्या बाबतीत चे प्रमाण 8:9:20असेल तर त्यांचा अनुक्रमे पगार किती?

 

6)-पंधरा विद्यार्थ्यांपैकी सात लॅटिनचा अभ्यास करतात आठ ग्रिक चा अभ्यास करतात तीन दोन्हींचा अभ्यास करत नाहीत तर किती जण लॅटिन आणि ग्रीक चा अभ्यास करतात?

 

7)-रमेश गिरीश पेक्षा हळू धावतो गिरीश उमेश पेक्षा वेगात दावतो तर उमेश रमेश पेक्षा कसा धावतो

8)लोकसभेत सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष यांचे प्रमाण 7:3 होते. 18 जणांचा विरोधी पक्षाने पराभव केल्यामुळे 3:2 असे घटले तर सभासदांचे एकूण संख्या किती?

 

9)-कविताचे वय योगिताच्या वयाच्या दुप्पट आहे तीन वर्षांपूर्वी तिचे वय योगिताच्या वयाच्या तिप्पट होते तर कविताचे वय काय?

 

10)-दहा विद्यार्थ्यांचे सरासरी वय नऊ वर्षे आहे शिक्षकाचे वय त्यामध्ये मिळवल्यास सरासरी एका वर्षाने वाढते तर शिक्षकाचे वय काय?

 

11)-पाच वर्षांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीच्या तेव्हाच्या वयाची सरासरी 23 वर्षे आहे याच काळात जन्मलेल्या मुलामुळे पती-पत्नी आणि मूल यांच्या वयाची सरासरी वीस वर्षे आहे तर मुलाचे वय काय?

 

12)-आप्पाजींनी आपल्याकडील आंब्यापैकी एक छेद दोन आंबे अधिक एक पहिल्या मुलास दिले उरलेल्या पैकी एक छेद दोन अधिक दोन दुसऱ्याच दिले उरलेल्या पैकी एक छेद दोन आंबे अधिक तीन तिसऱ्याच दिल्या त्यांच्याजवळ आता पंधरा आंबे आहेत तर सुरुवातीला त्यांच्याजवळ किती आंबे होते?

 

13)-156 विद्यार्थ्यांच्या वर्गातील पाच जण विद्यार्थी प्रतिनिधीच्या निवडणुकीस उभे राहिले निवडून येण्यासाठी विजयी उमेदवाराची किमान किती मते इतरांपेक्षा जास्त मिळायलाच हवी?

 

14)-जेवणाच्या टेबलाभोवती बारा लोक बसले होते त्यापैकी एक छेद दोन एकच्या गटातील होते 1/3 ब च्या गटातील होते आणि 1/4 अ आणि ब या दोन्ही गटातील होते तर दोन्ही गटात नसलेले लोक किती होते?

 

15)-कन्नड शाळेतील एक छेद दोन विद्यार्थी मराठी माध्यमातून शिकतात उरलेल्या पैकी 1/3 कन्नड भाषेत शिकतात उरलेले 300 विद्यार्थी कोणत्याही प्रादेशिक भाषेत शिकत नाहीत तर शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत?

 

16)-एक व्यापारी एक घोडा 310 रुपयात व एक गाय 130 रुपये विकतो तेव्हा त्याला घोडा आणि गाय यांच्या मूळ खरेदीच्या किमतीच्या दहा टक्के नफा होतो परंतु जर त्याने घोडा 315 रुपये आणि गायमूळ किमतीस विकली तर दहा टक्के तोटा होतो तर घोड्याची मूळ किंमत किती?

 

17)-पुण्याची लोकसंख्या प्रत्येक वर्षी पाच टक्क्यांनी वाढते जर आजची पुण्याची लोकसंख्या 9261 आहे तर तीन वर्षापूर्वी किती असेल?

 

18)-एक मोटार गाडी पहिले दहा किलोमीटर अंतर ताशी पंधरा किलोमीटर वेगाने जाते दुसरे दहा किलोमीटर वीस किलोमीटर वेगाने आणि तिसरे दहा किलोमीटर 625 किलोमीटर वेगाने जाते तर तिचा सरासरी वेग काय?

 

19)-आतापासून आठ वर्षांनी ज्योतीचे वय तिच्या सहा वर्षांपूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर तिचे आत्ताचे वय काय?

 

20)-एका समारंभात आजी वडील आई पाच मुलगी आणि त्यांच्या पत्नी प्रत्येक मुलाचे दोन मुलगे आणि एक मुलगी या व्यक्ती हजर होत्या तर तेथे एकूण किती स्त्रिया होत्या?

 

21)-नेमबाजीच्या स्पर्धेत बरोबर नेम लागल्यास एक रुपया मिळत असे तर नेम चुकल्यास एक रुपया द्यावा लागत असे शंभर वेळा नेमबाजी केल्यानंतर एका व्यक्तीला तीस रुपये मिळाले व त्याचा नेम किती वेळा बरोबर होता?

 

               उत्तरे

1-  20 वर्षे

2-30

3- 60

4- 85%

5- 320-480-680

6- 12

7- जोरात

8)  180

9- 12 वर्षे

10- 20 वर्षे

11-4 वर्ष

12-154

13-72 मते

14-5

15-900

16-355

17-8000

18-19.15

19-26

20-12

21-65

    

अंतर-वेग –वेळ

अंतर-वेग –वेळ

1)300  मीटर लांबीच्या ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?

2) 450 मीटर लांबीच्या ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास  किती वेळ लागेल ?

3) ताशी 63 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 385 मीटर लांबीच्या गाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

4) ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस  400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

5) 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीला 420 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास  किती वेळ लागेल ?

6) ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 540 मीटर लांबीच्या मालगाडीस  460 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास  किती वेळ लागेल ?

7) ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 120 मीटर लांबीच्या गाडीस  1.०80 किलोमीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

8) ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती ?

9) ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी  आगगाडी एक विजेचा खांब 12 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती ?

10) ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 260 मीटर लांबीची एक गाडी एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती ?

11) ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती ?

12) ताशी 48 किलोमीटर वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती ?

13) ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 220 मीटर लांबीची आगगाडी एक फुल 36 सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती?

14) 800 मीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?

15) 600  मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडणाऱ्या  गाडीचा ताशी वेग किती कि.मी.?

16) 1.5 कि.मी. अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती कि.मी.?

17) मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी 60 किलोमीटर वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30  वाजता सुटली त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी  ताशी 75 किलोमीटर वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील ?

18) मुंबईहून एक मोटार मद्रास ला जाण्यास सकाळी 6  वाजता तसेच 40 किलोमीटर वेगाने निघाली त्यानंतर सकाळी ठीक 7-30  वाजता त्याच ठिकाणाहून दुसरी मोटर ताशी 50 कि.मी. वेगाने निघाली तर त्या दोन मोटारींची  भेट किती वाजता होईल ?

19) पुण्याहून एकाच ठिकाणाहून नागपूरला निघालेल्या दोन गाड्या पैकी एक दुपारी 12:45 वाजता ताशी 60 किलोमीटर वेगाने व दुसरी दुपारनंतर 2-15 वाजता ताशी 90 किलोमीटर वेगाने निघाल्यास त्यांची भेट किती वाजता होईल ?

20) नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 54 किलोमीटर वेगाने सकाळी 9 वाजता व दुसरे ताशी  72 किलोमीटर वेगाने सकाळी 10-40वाजता सुटली तर त्या किती वाजता भेटतील ?

21) मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या दोन एसटी गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या पहिली ताशी 68 किलोमीटर वेगाने सायंकाळी 4:50 वाजता सुटली दुसरी ताशी 85 किलोमीटर वेगाने सायंकाळी 6-20 वाजता सुटली तर त्या एकमेकीना  किती वाजता भेटतील ?

22) मुंबई ते गोवा हे 540 किलोमीटर अंतर आहे. मुंबईहून सकाळी 8-30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या गाडीची  त्याच वेळी गोव्याहून  सुटलेल्या ताशी 75 किलोमीटर वेग असलेल्या गाडीशी  किती वाजता भेट होईल ?

२३) मुंबई ते अमरावती हे 750 किलोमीटर अंतर आहे .एकाच वेळी सकाळी 6 वाजता परस्परविरोधी दिशेने निघाल्या .गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 55 किलोमीटर व ताशी 70  किलोमीटर असल्यास दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील ?

24) मुंबई ते बेळगाव हे 590 किलोमीटर अंतर आहे. एकाच वेळी 7 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या एसटी गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 48 किलोमीटर व ताशी 70 किलोमीटर आहे तर त्या दोघींची भेटीच्या वेळी बेळगावहुंन निघालेल्या गाडीने किती अंतर कापले असेल ?

25) मुंबई ते औरंगाबाद हे अंतर 450 किलोमीटर असल्यास एकाच वेळी सुटलेल्या दोन बस गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने अनुक्रमे ताशी 58 किलोमीटरवर 42 किलोमीटर वेगाने निघाल्यास एकमेकींचे भेटीचे वेळी मुंबईहून सुटलेल्या गाडीने किती अंतर कापले असेल ?

26) मुंबई ते जळगाव हे 600 किलोमीटरचे अंतर कापण्यास दोन मोटार गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने निघाल्या मुंबईहून एक तास अगोदर सुटलेल्या गाडीचा ताशी वेग 50 किलोमीटर होता व जळगाव हून सुटलेल्या गाडीचा ताशी वेग 60कि.मी.होता.परस्परांना भेटण्याचे वेळी मुंबईहून सुटल्या गाडीने किती अंतर कापले असेल ?

27) 9 सेकंदात एक गाडी 120 मीटर अंतर जाते तर तिचा ताशी वेग किती ?

28 ) 15 सेकंदात एक गाडी 300  मीटर अंतर जाते तर तिचा ताशी वेग किती ?

29) 12 सेकंदात एक गाडी 150 मीटर जाते तर तिचा ताशी वेग किती ?

30) ताशी 60 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 75 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामारवर 48 मिनिटे लवकर पोचली तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला ?

31) ताशी 45 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी  सरासरी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 1.5 तास लवकर पोहोचते तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला ?

32) ताशी 42 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 36 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 20 मिनिटे उशिरा पोहोचते तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला ?

33) जर एक व्यक्ती 4.5 मिनिटात 600 मीटर अंतर चालते तर त्याचा चालण्याचा ताशी वेग किती ?

34) एक मोटार निर्धारित अंतर 10 तासात कापते जर ते अर्धे अंतर तसेच 40 किलोमीटर वेगाने व उरलेले अंतर 60 किलोमीटर वेगाने कापते तर त्या मोटरने एकूण किती किलोमीटर प्रवास केला ?

35) एक आगगाडी A स्थानकावरून B  स्थानकाला जाताना ताशी 45 किलोमीटर वेगाने जाते परंतु येताना ती ताशी वेग वाढवते जर तिच्या येण्या जाण्याचा सरासरी ताशी वेग 52 किलोमीटर असल्यास तिचा B  स्थानकावरून येताना A स्थानकाकडे  येण्याचा ताशी सरासरी वेग किती ?

36) अंतर 380 किलोमीटर असून A ठिकाणाहून एक आगगाडी ४० किलोमीटर प्रतितास वेगाने सकाळी आठ वाजता B च्या दिशेने व दुसरी गाडी B या ठिकाणाहून A च्या  दिशेने सकाळी दहा वाजता 60 किलोमीटर तास वेगाने निघाली तर त्या दोन्ही गाड्या किती वाजता एकमेकींना भेटतील ?

37) दोन गाड्या दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून एकमेकीकडे अनुक्रमे 42 किलोमीटर ताशी व 48 किलोमीटर ताशी या वेगाने निघाल्या या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटल्या तेव्हा एक गाडी 49 किलोमीटर आंतर दुसरी पेक्षा जास्त चालून आली होती तर त्या निघाल्याच्या ठिकाणातील अंतर किती ?

38) Aव B या दोन ठिकाणातील अंतर 330 किलोमीटर असून Aया ठिकाणाहून एक गाडी 60 किलोमीटर प्रतितास व B ठिकाणाहून एक गाडी 50 किलोमीटर प्रतितास या वेगाने एकमेकीच्या दिशेने निघाल्या तर किती वेळाने त्या एकमेकांना भेटतील ?

39) 40 किलोमीटर प्रतितास वेगाने सकाळी 6 वाजता एक बस निघाली त्याच ठिकाणाहून दुसरी बस 50 किलोमीटर प्रतितास वेगाने 7-30 वाजता निघाली तर दोन्ही बस किती वाजता भेटतील ?

40) एका ठिकाणाहून एक रेल्वे सकाळी 7 वाजता 60 किलोमीटर प्रतितास वेगाने व दुसरी रेल्वे त्याच मार्गाने सकाळी 8 वाजता 75 किलोमीटर प्रतितास  वेगाने निघाली तर दोन्ही रेल्वे किती वाजता भेटतील ?