सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

दिनदर्शिका

 

दिनदर्शिका – सरावासाठी प्रश्नांचे नमुने

1) 1 जानेवारी 2005 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी  2006 ला कोणता वार असेल ?

 

2) 14 ऑक्टोबर 2007 रोजी सोमवार असेल तर 14 ऑक्टोबर 2009 रोजी कोणता वार असेल?

 

3) 8 मार्च 2003 रोजी शुक्रवार असेल तर 8 मार्च 2005 रोजी कोणता वार असेल ?

 

4) 3 जून 2004 रोजी शनिवार असेल तर 3 जून 2005 रोजी कोणता वार असेल ?

 

5) 1 जानेवारी 2008 रोजी बुधवार असेल तर 1 जानेवारी 2009 रोजी कोणता वार असेल ?

 

6) 4 मे 2000 रोजी सोमवार असेल तर 4 मे 2001 रोजी कोणता वर असेल?

 

7) 3 एप्रिल 2002  रोजी बुधवार असेल तर 3 एप्रिल 2007 रोजी कोणता वार असेल ?

 

8) 1 नोव्हेंबर 1982 रोजी सोमवार असेल तर 1 नोव्हेंबर1987 रोजी कोणता वार असेल ?

 

9)जर 2000 साली शिक्षकदिन गुरुवारी असेल तर 2001 साली प्रजासत्ताक दिन रोजी कोणता वार असेल?

 

10)जर 2002 साली गांधी जयंती बुधवारी होती .तर 2003 साली महात्मा गांधी पुण्यतिथी कोणत्या वारी असेल ?

 

11)जर 2006 साली स्वातंत्र्यदिन रविवारी असेल तर 2006 साली शिक्षकदिन कोणत्या वारी असेल ?

 

12)15 जानेवारी 2003 रोजी मंगळवार असेल तर 19 जानेवारी 2009 रोजी कोणता वार असेल ?

 

13) 10 मार्च 2002 ला गुरुवार होता . तर 15 मार्च 2007 ला कोणता वार असेल ?

 

14) 10 मार्च 2001 ला शनिवार असेल तर 15 मे 2001 रोजी कोणता वार असेल ?

 

15) 9 मे 2013 रोजी अशोकचा 4 था वाढदिवस असून त्या दिवशी गुरुवार आहे.तर अशोकचा जन्म कोणत्या दिवशी झाला ?

 

16) काल शुक्रवार होता , उद्या 12 तारीख आहे .तर पुढच्या रविवारी कोणती तारीख असेल ?

 

17 )परवा शनिवार होता . तर उद्या कोणता वार येईल ?

 

18) आजचा वार मंगळवार आहे. तर 25 व्या दिवसानंतर कोणता वार असेल?

 

19) अमोल त्याच्या बहिणीपेक्षा 623 दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म  सोमवारी झाला तर त्याच्या बहिणीचा जन्मवार कोणता ?

 

20) रमेश महेशपेक्षा 4 दिवसांनी मोठा आहे . अंकुश महेश पेक्षा 9दिवसांनी लहान आहे.प्रजासत्ताक दिनी अंकुशचा वाढदिवस आहे . तर रमेशचा जन्म कोणत्या दिवशी झाला ?

21) 21 व्या शतकाची सुरुवात सोमवार या वाराने होत असल्यास 20 व्या शतकाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल ?

 

22) सीता तिच्या भावापेक्षा 800 दिवसांनी मोठी आहे. भावाचा जन्मवार सोमवार असल्यास सीताचा जन्मवार कोणता ?

23) 2011 चा महाराष्ट्र दिन सोमवारी असल्यास त्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल?

 

24)कालच्या परवाला सोमवार होता.तर उद्याच्या परवाच्या परवा कोणता वार येईल ?

 

25) अभयचे लग्न  10 जानेवारी 2001 रोजी झाले. त्या दिवशी सोमवार होता . तो लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला सिनेमा बघतो. मात्र वाढदिवस गुरुवार किंवा शुक्रवार आल्यास सिनेमा बघत नाही. तर 11 व्या वाढदिवसापर्यंत किती वेळा सिनेमा बघणार नाही ?

 

26) 5 जून चा वार सोमवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील ?

 

27) प्रेरणाला निश्चित आठवते की मागील वर्षी परीक्षा जून पूर्वी झाली पण फेब्रुवारी नंतर झाली.सिमरनला निश्चित आठवते की परीक्षा सप्टेंबर पूर्वी पण एप्रिल नंतर झाली.तर परीक्षा नेमकी कोणत्या महिन्यात झाली ?

 

28) 5 जुलैला सोमवार असेल तर 30 ऑगस्टला कोणता वार असेल ?