सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

विषय –कला पाठ्यक्रम (इयत्ता- सातवी )

v चित्र शिल्प          चित्र           

घटक     
पाठ्यक्रम

कलेची मूलतत्त्वे
रेषा, आकार, रंग, छायाभेद, पोत

द्विमित चित्र


रेखांकन
रेषा व रेषांचे प्रकार


मानवाकृती , प्राणी, पक्षी, वाहने यांचे रेखांकन


वेगवेगळ्या निसर्गनिर्मित व मानवनिर्मित  वस्तुंचे रेखांकन

स्मरणचित्र
शालेय जीवनाशी संबंधित विषयावर चित्रण


घराशी संबंधित विषय


सामाजिक जीवनाशी संबंधित विषय


परिसराशी संबंधित सोपे विषय


विविध  लोककथावर आधारित चित्र

संकल्पचित्र
संकल्पाची मूलतत्त्वे –पुनरावृत्ती, बदल . उत्सर्जन,प्रमाण, तोल, लय


मूळ आकार व त्यापासून तयार होणाऱ्या इतर आकारांत भौमितिक,नैसर्गिक,अलंकारिक आकारांचा वापर करून संकल्परचना तयार करणे


विशिष्ट वस्तूसाठी संकल्पाची मूलतत्त्वे वापरून संकल्प रचना तयार करून घेणे.


एखादी वस्तू प्रत्यक्ष अलंकृत करणे.

स्थिरचित्र
निसर्गनिर्मित, मानवनिर्मित, तीन ते चार वस्तू समूहांचे चित्रण.

शिल्प (त्रिमित

कागदकाम
कागदाच्या लगद्यापासून बाहुल्या, खेळणी, प्राणी, पक्षी, फळे, इ. तयार करणे.


कागदाच्या तुकड्यापासून भांडी, मुखवटे, इ तयार करणे

मातीकाम
मातीच्या लादीपासून अधिक- उणे पद्धतीचा वापर करून पदक, बिल्ला, नाणे इ.तयार करणे.


मानवाकृती, पक्षी,प्राणी इ. तयार करणे.

कला इतिहास
आपल्या जिल्ह्यातील क्लास्थळे, मंदिरे, लेण्या, किल्ले, वस्तुसंग्रहालये, कलादालने यांची ओळख.(प्रत्यक्ष भेटी, व्याख्याने, फिल्म्स,स्लाईडस, चित्र तक्ते याद्वारे.)


आपल्या जिल्ह्यातील प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार,गायक, वादक, नर्तक,नाट्य कलावंत,लोककलाकार यापैकी एखाद्या कलावंताची मुलाखत.

नृत्य –नाट्य


चित्र-शिल्प ,नृत्य –नाट्य यातील समान संकल्पना
चित्र-शिल्प ,नृत्य –नाट्य यातील समान संकल्पना प्रात्यक्षिकासह समजावून देणे.

मुक्ताविष्कार आणि पारंपारिक नृत्यकलेतील साम्यभेद
मुक्ताविष्कार आणि पारंपारिक नृत्यकलेतील साम्यभेद यांची माहिती देणे.

समूह नृत्य सादरीकरण
समूह नृत्य सादरीकरण करणे.

नृत्याचे बोल व नृत्यरचना  यातील समन्वय
नृत्याचे बोल व नृत्यरचना यांची माहिती देणे,समन्वयाचा परिचय करून देणे.

नृत्यात्मक हालचाली व व्यायाम यांची माहिती.
नृत्यात्मक हालचाली व व्यायाम यांची माहिती देणे.




नाट्य


नाटकाच्या इतिहासाची माहिती
नाटकाच्या इतिहासाची माहिती व्याख्यानातून देणे.

एकपात्री स्वगते, व नाट्यछटा
एकपात्री स्वगते, व नाट्यछटा यातील फरक समजावून सांगणे,त्यासाठी नाट्यगृहात नेणे,व एकपात्री व नाट्यछटेचे निरीक्षण करण्यास सांगणे.जुन्या मराठी नाटकातील स्वगते, नाट्यछटा वाचून दाखवणे.

रंगमंचावरील हालचाली
प्रत्यक्ष रंगमंचावर एखादे नाटक सादर करण्याची संधी देणे.

नाट्यलेखनास प्रवृत्त करणे
सामाजिक जाणिवेवर आधारित नाटक लिहिण्यास
प्रवृत्त करणे.

वेशभूषा व रंगभूषा याबद्दलची माहिती
वेशभूषा व रंगभूषा याबद्दलची माहिती देण्यासाठी व्याख्यान आयोजित करणे, चित्रकलेतील ज्ञानाचा  वेशभूषा व रंगभूषा यासाठी कसा करावा ते सांगणे.

नाटिका / नाट्यप्रवेश लिहिणे.
नाटिका / नाट्यप्रवेश लिहिण्यास प्रवृत्त करणे.

भूमिका सादर करणे
पाठ्यपुस्तकातील योग्य अशा पाठ्यांशावर आधारित भूमिका सादर करण्यास प्रवृत्त करणे.

उत्स्फूर्त अभिनय करणे
आयत्या वेळी विषय देऊन अभिनय करण्यास सांगणे

गायन –वादन

दोन रागांची सरगम  वेगवेगळ्या तालात
भैरव, काफी, केदार या रागांची सरगम शिकवणे,वेगवेगळ्या तालात या रागांच्या बंदिशीचे गायन करण्यास शिकविणे.

विलंबित, मध्य, द्रुत लय
विलंबित, मध्य, द्रुत लय हे प्रकार प्रात्यक्षिकासह स्पष्ट करणे.

पं. वि.ना. भातखंडे
पं. वि.ना. भातखंडे यांचे संक्षिप्त चरित्र व सांगीतिक कार्याची माहिती देणे.

वाद्य परिचय
हार्मोनियम या वादयाची सविस्तर माहिती व उपयोगिता सांगणे.

वैयक्तिक गायन
पाठ्यपुस्तकातील कविता वैयक्तिक गाता येणे.


रागांवर आधारित गीते वैयक्तिक गाता येणे.

सांघिकरीत्या गीत सादर करणे
रेडीओवर लागणाऱ्या चालीत वंदेमातरम् म्हणणे.