सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

भांड्यांच्या दुनियेत ( इयत्ता- सातवी )

कोठी- तळघरातील वस्तू साठवायची खोली
जाते- दळण दळण्याचे साधन. एकावर एक रचलेल्या गोल दगडी चकत्या.
परात- तांबे, पितळ इ. धातूंचे पसरट गोल काठ असलेले मोठे ताट
रांजण- उभट गोल मोठे
बुधला- उभा ,मध्ये फुगीर असलेला गडू
तुंबे- भोपळ्याचा गर काढून बनवलेले पोकळ, पसरट गोल भांडे
आंतरजाल- इंटरनेटला मराठी प्रतिशब्द
काठवड- पीठ मळण्यासाठीची मोठी गोलाकार लाकडी परात
उखळ- धान्य कांडण्याचे पोकळी असलेले लाकडी अथवा दगडी जाड साधन
मुसळ- धान्य कांडण्याचे लाकडी उभे व मजबूत साधन
पाटा-वरवंटा- पसरट पंचकोनी टाकी लावलेला सपाट दगड व त्यावर वाटण वाटण्यासाठीचा दंडाकृती दगड.
मेटेरियल कल्चर- अनेक उपयोगी वस्तूंचा संचय करणारी मानवी परंपरा
सिरमिक्स- चीनी मातीची भांडी
किटली- तोटी असलेले चहा साठवण्याचे भांडे
सुरई- निमुळता उंच गळा असलेले धातूचे वा मातीचे भांडे.
स्टेनलेस स्टील- लोखंडावर प्रक्रिया करून बनवलेला गंज न पकडणारा धातू.
नॉनस्टिक- पदार्थ न चिकटणारी भांडी
कोटेड मेटल- एका धातूचा दुसऱ्या धातूवर लेप लावून तयार केलेली भांडी
फुंकणी- चुलीतल्या लाकडांचा जाळ पेटवण्यासाठी बनवलेली पोकळ लोखंडी लांब नळी
घंगाळ- गोल पसरट मोठ्या तोंडाचे , बाजूला कडी असलेले पाणी तापवण्याचे भांडे
बंब- पाणी तापवण्यासाठी तयार केलेले पूर्वीचे उभट गोलाकार पिंप
पत्रावळ- झाडाची मोठी पाने काडीने एकत्र टोचून तयार केलेलेल गोलाकार ताट
द्रोण- पानांना काडीने जोडून तयार केलेली वाटी
कासंडी (चरवी) कावळा , वाडगा , टोप – दूध व दुधाचे पदार्थ साठवण्याची भांडी
बुडगुली, ओगराळी, पळी, तसराणी, कुंड- लाकडी किंवा धातूंचे वेगवेगळ्या आकारांचे चमचे.
विराजमान होणे- आसनावर ऐटीत बसणे
मान डोलावणे- संमती देणे
प्रसार होणे- सर्वांना माहीत होणे
खिशाला परवडणे- खर्च करण्याची ऐपत असणे
आभार मानणे- धन्यवाद देणे.