शापोआ महत्वाचे..
वार्षिक नियोजन शालेय कामकाज
शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन
आदरणीय मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन
जुन महिना----------------
1) SMC मिटिंग आयोजन 14/6
2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन.
3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन
4) Student pramotion करणे.
5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे.
6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे.
7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे.
8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी.
9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम
10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड
11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी करणे.
12) Staff Attach-deteach करणे.
13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6
14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ
15) Student Request पाठविणे व coinfirm करणे.
16)शा.पो.आ. करारनामा करणे.
17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे.
18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे.
जुलै महिना----------------
1) माता-पालक संघ सभा
2) सरल st. request-coinfirm पाठविणे.
3) मीना राजु मंच सभा
4) SMC मिटिंग
5) कथाकथन स्पर्धा आयोजन
6) शा.पो.आ.सभा
7) दिंडी उपक्रम आयोजन
8) पालक सभा आयोजन
9) आदर्श परिपाठ तयारी
10) गुरुपोर्णिमा उपक्रम
11) शिष्यवृत्ती वर्ग सुरुवात 5 वी/8वी
12) नवोद्य विद्यार्थी निवड व वर्ग सुरुवात 5वी
13)पायाभुत चाचणी 1 आयोजन
आँगस्ट महिना------------------
1) Student माहिती online भरणे.
2) शिक्षक -पालक संघ सभा
3) SMC मिटिंग आयोजन
4) स्वातंत्र दिन पुर्व तयारी
5) सरल school portal भरणे.
6) सरल Staff portal भरणे.
7) गोपाळकाला(दहिहंडी)उपक्रम
8) अकारिक चाचणी १ आयोजन
9) प्रगत/अप्रगत उपक्रम(जादा तास) आयोजन
10) लो.टिळक पुण्यतिथी 1/8
11)रक्षाबंधन उपक्रम आयोजन
12) परिसर सहल आयोजन
सप्टेंबर महिना-----------------
1) माता-पालक संघ सभा
2) संच मान्यता portal भरणे.
3) गणपती उपक्रम
4) SMC मिटिंग
5) शाळेत गणेशोत्सव साजरा करणे.
6) वक्तृत्व स्पर्धा आयोजन.
7) शा.पो.आ.सभा
8) मीना राजु मंच सभा
9) पालक सभा आयोजन
10) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती online भरणे.
11) पायाभुत online marks भरणे.
12) विद्यार्थी प्रगत-अप्रगत ठरविणे.
13) समाजकल्याण शिष्यवृत्ती online भरणे.
14) अध्ययन निष्पत्ती उपक्रम
15) शाळेत शिक्षक दिन साजरा करणे.5/9
आँक्टोंबर व नोव्हेंबर महिना--------------------
1) 15 oct वाचन प्रेरणा दिन साजरा करणे.
2) सत्र 1 परीक्षा घेणे.
3) नवरात्र दिवसात परिसर सहल आयोजन
4) स्वच्छता अभियान राबविणे.
5) SMC मिटिंग
6) दिवाळी अभ्यास नियोजन
7) गांधी जयंती साजरी करणे. 2/10
8) नवरात्र भोंडला आयोजन.
9) चित्रकला उपक्रम आयोजन.
10) नवोदय,शिष्यवृत्ती online form भरणे.
11) शैक्षणिक सहल पुर्वतयारी
12) क्रिडा स्पर्धा पुर्वतयारी.
13) पायाभुत चाचणी 2 आयोजन
14) शिक्षक -पालक संघ सभा
15) पं.नेहरु जयंती 14/11 बाल दिन
16) सरदार वल्लभभाई पटेल जयंती 31/10
डिसेंबर महिना --------------------
1) माता पालक संघ सभा
2) SMC मिटिंग
3) शा.पो.आ.सभा
4) पालक सभा आयोजन
5) कला व क्रिडा स्पर्धा
6) शैक्षणिक सहल आयोजन
7) Udise+ Online भरणे
8) शाळेचा वार्षिक आराखडा भरणे.
9)अध्ययन निष्पत्ती उपक्रम
जानेवारी महिना------------------
1) शिक्षक -पालक संघ सभा
2) प्रजासत्ताक दिन कार्यक्रम
3) सा.फुले जयंती उपक्रम
4) सांस्कृतिक कार्यक्रम
5) बाल आनंद मेळावा
6) स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती.12/1
7)नेताजी जयंती 23/1
8) नवोदय परीक्षा 5 वी
9) शिष्यवृत्ती सराव परीक्षा 5 वी/8 वी सरावप्रश्नपत्रिका नियोजन
फेब्रुवारी महिना --------------------------
1) माता पालक संघ सभा
2) शा.पो.आ.सभा
3) पालक सभा आयोजन
4) शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8 वी परीक्षा
5) आकारिक चाचणी 2 आयोजन
6) वार्षिक तपासणी पूर्वतयारी
7) शिवजयंती कार्यक्रम 19/2
8) Udise + online भरणे.
मार्च महिना -------------------------
1) शिक्षक -पालक संघ सभा
2)SMC मिटिंग
3) वार्षिक तपासणी
4) इयत्ता 7 वी/8 वी/5 वी/4 थी निरोप समारंभ
5) शाळेची वार्षिक तपासणी
6) समग्र शिक्षा अभियान खर्च वार्षिक विनियोग
7) SSA online link भरणे.
8) जागतिक महिला दिन 8/3
9) यशवंतराव चव्हाण जन्मदिन 12/3
10) जागतिक अपंग दिन 17/3
11) संत गाडगेबाबा जयंती 4/3
12) वर्गनिहाय सत्र 2 पर्यतचा वार्षिक नियोजन प्रमाणेअभ्यासक्रम पुर्ण करणे.
एप्रिल महिना -----------------
1) माता-पालक संघ सभा
2)शा.पो.आ. सभा
3) द्वितीय सत्र परीक्षा
4) पायाभुत चाचणी 3
5) माँडरेशन तयारी
6) महात्मा फुले जयंती 11/4
7) पेपर तपासणे.निकाल तयार करणे.
8) शा.पो.आ.वार्षिक एकुणात करणे.
9) आंबेडकर जयंती 14/4
10) RTE केंद्र बोर्ड परीक्षा 5 वी व 8 वी
मे महिना ----------------------
1)निकाल जाहीर करणे
2) 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करणे.
3) पुढील वर्ष वर्गवाटप,
4) शिक्षक कामकाज वाटप -लाँगबुक भरणे.
5) 33 कोटी वृक्षलागवड माहीती online.
6) प्रशिक्षण तयारी-अभ्यासक्रम बदल
7) पुढील शैक्षणिक वर्ष नियोजन.
त्रिकोणी संख्या
* 12 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ? (78 )
* 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ? (120 )
* 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती ? (10 )
* 105 या त्रिकोणी संख्येचा पाया किती ? (14)
* एका मंदिरास 11 पायऱ्या आहेत . प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाइतकी फुले ठेवल्यास एकूण किती फुले लागतील ? (66 )
* एका मंदिरास 15 पायऱ्या आहेत . प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाइतकी फुले ठेवल्यास एकूण किती फुले लागतील ? (120 * क्रिकेटच्या संघातील 11 खेळाडूंनी एकमेकाशी फक्त एकदाच हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलन होतील ? (55)
* कबड्डीच्या संघातील 7 खेळाडूंनी एकमेकाशी फक्त एकदाच हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलन होतील ? (21)
* एका संघात काही खेळाडू होते . त्या खेळाडूंनी प्रत्येकाशी एकदाच प्रत्येकाशी हस्तांदोलन केले तेव्हा हसतांदोलनाची संख्या 36 झाली . तर त्या संघात किती खेळाडू होते ? (9)
* एका वर्तुळावर समान अंतरावर 6 बिंदू घेतले . ते सर्व बिंदू एकमेकांना जोडून किती रेषाखंड काढता येतील ? (15)
* 8 एकरेषीय बिंदू पासून किती रेषाखंड मिळतील ? ( 28 )
* 5 नैकरेबीय बिंदूना एकमेकांना जोडल्यास किती रेषाखंड काढता येतील ? (10 )
* राघव कडे एकूण 91 फुले आहेत . त्याने एका मंदिराच्या पायरीच्या क्रमांकाइतकी फुले प्रत्येक पायरीवर ठेवली . शेवटी त्याच्याकडे एकही फूल शिल्लक राहिले नाही . तर त्या मंदिरास किती पायऱ्या होत्या ? (13)
सम विषम संख्या
* 8 च्या पुढील 125 वी सम संख्या कोणती ? (258)
* 8 च्या पुढील 125 वी विषम संख्या कोणती ? (257)
* 11 च्या पुढील 125 वी सम संख्या कोणती ? (260)
* 11 च्या पुढील 125 वी विष म संख्या कोणती ? (261)
* x ही एक सम संख्या आहे . x च्या पुढील 15 वी सम संख्या कोणती ? (x + 30 )
* x ही एक विषम संख्या आहे . x च्या पुढील 15 वी विषम संख्या कोणती ? (x + 30 )
* x ही एक सम संख्या आहे . x च्या पुढील 15 वी विषम संख्या कोणती ? (x + 29 )
* x ही एक विषम संख्या आहे . x च्या पुढील 15 वी सम संख्या कोणती ? (x + 29 )
* (x +5 ) ही एक सम संख्या आहे त्यापुढील 8 वी सम संख्या कोणती ? (x +21 )
* (x +5 ) ही एक सम संख्या आहे त्यापुढील 8 वी विषम संख्या कोणती ? (x +20 )
* (x +5 ) ही एक विषम संख्या आहे त्यापुढील 8 वी विषम संख्या कोणती ? (x +21 )
* (x +5 ) ही एक विषम संख्या आहे त्यापुढील 8 वी सम संख्या कोणती ? (x +20 )
* x ही एक सम संख्या आहे . x च्या मागील 10 वी सम संख्या कोणती ? (x - 20 )
* x ही एक विषम संख्या आहे . x च्या मागील 10 वी विषम संख्या कोणती ? (x - 20 )
* x ही एक सम संख्या आहे . x च्या मागील 10 वी विषम संख्या कोणती ? (x - 19 )
वर्णमाला –
वर्णमाला –
1) अं
आणि अः यांना काय म्हणतात ?
1) स्वरादी
2) अनुस्वार 3) स्वर 4)
मूलवर्ण
2) खालीलपैकी
अल्पप्राण व्यंजन कोणते ?
1) प 2)ख 3) भ 4)ध
3) सजातीय
स्वरांची जोडी ओळखा .
1) उ ऊ
2) अ इ 3) इ ए 4) अ ई
4) पुढीलपैकी
कोणती दोन व्यंजने जोडाक्षरे आहेत ?
1) ग घ
2) ज झ 3) प फ
4) क्ष ज्ञ
5) घर्षण
व्यंजन ओळखा .
1) प 2) ग 3)स 4) च
6) खालील
अक्षरातील व्यंजन ओळखा .
1) अ 2) आ 3) इ 4) य
7) महाप्राण
व्यंजन ओळखा .
1) ह 2) ळ 3) क्ष 4) ज्ञ
8) पुढीलपैकी कोणते व्यंजन कंठस्थानी आहे ?
1) च 2) छ 3)प 4) क
9) अनुनासिकांना
असेही म्हणतात .
1) मात्रा
2) परसवर्ण 3) सजातीय स्वर 4) विजातीय स्वर
10) प फ
ब भ म या व्यंजन उच्चार प्रकाराला .............. म्हणतात
1) कंठ्य
2) तालव्य 3) ओष्ट्य 4) वरील सर्व चूक
11) ङ ञ
ण न म यांना कोणत्या प्रकारचे वर्ण म्हणतात ?
1) स्वरादी 2) अनुनासिक 3) व्यंजन 4) स्वर
12) मुल
ध्वनीच्या यादीला पुढीलपैकी काय म्हणाल ?
1) वर्ण 2)वर्णमाला 3) लिपी 4)दृश्यचिन्हे
13) अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना
आधीच स्वर यावा लागतो म्हणून त्यांना ............असे म्हणतात .
1) स्वर
2) स्वरादी 3)अनुस्वार 4)
व्यंजन
14) संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविड
भाषेतून मराठीत आलेला मूर्धन्य वर्ण कोणता ?
1) छ 2) ट 3)ढ 4)ळ
15) क्ष
आणि ज्ञ यांना कोणती व्यंजने म्हणून ओळखतात ?
1) संयुक्त
व्यंजने 2) व्यंजने 3) कठोर व्यंजने 4) मृदू व्यंजने
16) ख झ या
वर्णांना काय म्हणतात ?
1) कठोर व्यंजन 2) मृदू व्यंजन 3)महाप्राण 4)स्वतंत्र
17) खालीलपैकी
नाद वर्ण कोणता ?
1) त 2) फ 3) द
4)ख
18) खालीलपैकी
गटात न बसणारे अक्षर ओळखा
1) अ 2)इ
3) ई 4)उ
19) खालीलपैकी
कोणत्या शब्दातील अंत्यस्वर पूर्ण उच्चारला जातो ?
1) वार
2) गृह 3) धन 4)पुस्तक
20) वर्णमालेमध्ये अर्ध स्वरांना काय
म्हणतात ?
1) ऊष्मे
2)महाप्राण 3)अंतस्थ 4)व्यंजने
21) खालीलपैकी
कठोर व्यंजन कोणते ?
1) ख 2)ज 3)द 4)ब
22) उच्चार
स्थानानुसार तालव्यवर्ण कोणता ?
1) इ 2) ए 3)ऋ 4)आ
23) पंगत या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारासमान
आहे ?
1) वंदन
2) संरक्षण 3)पंख 4)संधान
24) ज्ञानचक्षु
या शब्दात एकूण मूलध्वनी किती आहेत ?
1) 10 2) 11 3) 9 4) 8
25) जीवन चक्र या शब्दातील च या वर्णाचे
उच्चार स्थान कोणते ?
1) दंततालव्य 2) कंठ 3)तालव्य 4)मूर्धन्य
26) कृपा कलृपती ज्ञानेश्वर नैऋत्य
अमृतध्वनी या शब्दांमध्ये एकूण जोडाक्षर किती आहेत ?
1) 6 2)4 3)5 4)7
27) मराठी
भाषेचे लेखन आपण कोणत्या लिपीत करतो ?
1)अर्धमागधी 2)देवनागरी 3)पाली 4)मोडी
28) खालीलपैकी कोणता दीर्घ स्वर हा संयुक्त
स्वर नाही ?
1) ऊ 2)ए 3) ऐ 4)ओ
29) ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन
स्वरांनी बनला आहे ?
1) अ + इ
2)आ+ उ 3)आ + ऊ 4)अ
+ ऊ
30) खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?
1) ए= आ + इ 2) ओ = अ ऊ
3)औ = आ + ऊ 4)ऐ = अ + ई
31) व या वर्णाचे उच्चार स्थान कोणते
1) दंतौष्ट्य 2)कंठौष्ठय 3)ओष्ठय
4)मूर्धन्य
32) खालीलपैकी कोणत्या अनुनासिकाचे उच्चार
स्थान मूर्धन्य आहे ?
1) न 2)ङ 3)ञ 4)ण
33) खालीलपैकी कोणते मृदू व्यंजन दंत्य आहे
?
1) द 2)थ 3)म 4)त
34) चक्र
या शब्दातील स हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?
1) तालव्य 2)मूर्धन्य 3)दंततालव्य 4)कंठतालव्य
35) जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या
प्रकारचा आहे १
1) तालव्य 2)मूर्धन्य 3)दंततालव्य
4)कंठतालव्य
36) खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या
अक्षराचा उच्चार तालव्य आहे ?
1) जमात 2)जल 3)जावई 4)जात
37) खालीलपैकी
कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार दंत तालव्य आहे ?
1) जरा 2)चंद्र 3)छत्री 4)जन्म
38) खालीलपैकी ओष्ठय
असलेले कठोर व्यंजन कोणते
1) य 2)प 3)म 4)भ
39) खालीलपैकी
उच्चारानुसार मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता
1) ढ 2)र
3)ष 4)स
40) ऋ हा
स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा स्वर आहे
१
1) ओष्ठ्य 2) मूर्धन्य 3)तालव्य 4)कंठ्य
41) खाली दिलेल्या स्वरांच्या यादीतून संयुक्त
स्वर ओळखा.
1) अ आ 2) इ उ 3)
ए ऐ 4) ओ औ
1) पर्याय 1व3 2)पर्याय 2व4 3) पर्याय 1 व 4 4)पर्याय 3 व 4
42) मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत ?
1) 12 2) 2 3) 34 4) 14
43) संयुक्त नसणारा स्वर कोणता ?
1) ए
2) औ 3)ई 4)आ
44) मराठी वर्णमालेत किती स्पर्श व्यंजने आहेत ?
1) 12 2) 2 3) 34 4) 14
45) ओष्ट्य उच्चार स्थान असणारे स्वर कोणते ?
1) उ ऊ 2) इ ई 3) ए ऐ 4) अ आ
46) अ आ - या वर्णाचे उच्चारस्थान कोणते ?
1) मूर्धन्य 2) कंठ्य 3) तालव्य 4) दंत्य
47) कर्तव्यदक्ष या शब्दात किती व्यंजने आली आहेत ?
1) आठ 2) सात 3) सहा 4) नऊ
48) ज्ञानामृत या शब्दात किती
व्यंजने आली आहेत ?
1) आठ 2) सात 3) सहा 4) नऊ
49) खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार म या अनुनासिकाप्रमाणे
होतो ?
1) अंतर 2) अंबर 3) अंजन 4) अंगण
50) ज्ञानेंद्रिय - या शब्दात
किती व्यंजने आली आहेत ?
1) आठ 2) सात 3) सहा 4) नऊ