विजयादशमी दसरा –
अश्विन शुक्ल दशमीला
विजयादशमी दसरा हा सण येतो. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. कोणतेही नवीन काम
करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो या दिवशी सरस्वती पूजन करून शिक्षणास प्रारंभ
केला जातो.
विजयादशमी दसरा सणाची उपपत्ती काही कथा द्वारे
सांगितले जाते.
पैठण शहरात देवदत्त
नावाच्या एका माणसास कौत्स नावाचा एक मुलगा
होता. तो वरतंतु ऋषीकडे वेदाभ्यास करण्यासाठी गेला .काही दिवसांनी कौत्स हा सर्व शस्त्र विद्येत निपुण झाला. शेवटी गुरुदक्षिणा
काय द्यावी असा प्रश्न कौत्साने वरतंतु ऋषीना
विचारला. वरतंतू ऋषींनी वरदक्षिणा नको असे
सांगितले परंतु कौत्साचे समाधान झाले नाही. तो आग्रह करू लागला कौत्साचा आग्रह
पाहून वरतंतु ऋषींनी प्रत्येक विदयेबद्दल एक कोटी सुवर्ण मुद्रा याप्रमाणे १४ कोटी
मुद्रा एका जवळून आणून द्याव्यात असे सांगितले.
वरतंतु ऋषींनी सांगितलेली वरदक्षिणा आणण्यासाठी
तो रघु राजाकडे गेला .परंतु रघुराजाने विश्वजीत यज्ञ करून सर्व भांडार गरिबांना
वाटून टाकले होते. त्यामुळे १४ कोटी सुवर्ण मुद्रा देण्याची असमर्थता त्यांनी
दाखवली मात्र त्याने कोत्साकडून तीन दिवसांची मुदत मागितली .रघुराजाने १४ कोटी
सुवर्ण मुद्रा मिळवण्यासाठी इंद्रावर स्वारी करण्याचे ठरवले .इंद्राला हे समजले त्याने रात्री गावाबाहेरील आपट्याच्या
व शमीच्या झाडावर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडविला नंतर या मुद्रा
रघुराजाने कौत्सास दिल्या .कौत्स सर्व
सुवर्ण मुद्रा घेऊन वरतंतू ऋषीकडे आला व गुरुदक्षिणा म्हणून या सर्व सुवर्णमुद्रा
ठेवा अशी विनंती करू लागला वरतंतु ऋषींनी त्यातील फक्त १४ कोटी सुवर्णमुद्रात ठेवून
घेतल्या व बाकी उरलेल्या सर्व त्याच परत केल्या. वरतंतू ऋषींनी परत केलेल्या सर्व सुवर्ण मुद्रा घेऊन कौत्स रघु राजाकडे आला परंतु रघुराजा त्या घेत नव्हता
शेवटी त्याने या सुवर्णमुद्रा आपट्याच्या व समीच्या झाडाखाली ठेवून लोकांना
लुटण्यास सांगितल्या लोकांनी झाडांची पूजा करून त्या खालच्या सुवर्ण मुद्रा लूटून
घरी आणल्या. तेत पासून आपट्याच्या व शमीच्या च् झाडाची पूजा करून एकमेकांना त्या
झाडाची पाने शुभेच्छा म्हणून देण्याची प्रथा पडली.
एकदा महिषासुर राक्षसाने पृथ्वीवरील सर्व
लोकांना त्रास देऊन भंडावून सोडले त्यावेळी परमेश्वराने अष्टभुजा देवीच्या रूपाने
त्या राक्षसाशी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अश्विन शुक्ल दशमी पर्यंत तुंबळ युद्ध
करून त्यास ठार मारून विजय मिळविला त्यावेळी देवीने विजया हे नाव धारण केले होते
म्हणून अश्विन शुक्ल दशमेश विजयादशमी असे म्हणतात.
पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता म्हणून विराटच्या घरी गेले होते
त्यावेळी त्यांनी आपले शस्त्रे जंगलाच्या शमीच्या झाडावर ठेवली होती शेवटी
अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी सर्व शस्त्रे शमीच्या झाडावरून काढून घेतली आणि
शमीच्या झाडाची व शस्त्रांची पूजा केली तो दिवस अश्विन शुक्ल दशमीचा होता
प्रभू रामचंद्रांचा पंजा
रघुराजा सर्व दिशांच्या राजांना जिंकण्यासाठी याच दिवशी निघाला होता प्रभू
रामचंद्राने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला तो हाच दिवस होता.
दसरा हा सर विजयाचा आहे पराक्रमाचा आहे पूर्वी
हा सण शेतकरी मोठ्या प्रमाणात साजरा करीत असत हा कृषी विषयक लोकोत्सव होता घरात
नवीन धान्य आलेले असते म्हणून तो एक आनंदोत्सव होता भाताच्या लोंब्या तोडून त्या
फुलांसह प्रवेशद्वारावर तोरण म्हणून बांधण्याची प्रथा पडली पूर्वीच्या कृषीविषयक
सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले त्यानंतर त्याला राजकीय स्वरूपी प्राप्त झाले.
स्वारी करण्यासाठी सीमोल्लंघन करताना दसऱ्याचा विजयादशमीचा मुहूर्त उत्तम म्हणून
मानला जात असे.
दक्षिण हिंदुस्थानात विशेषतः म्हैसूर मध्ये हा
सण मोठ्या प्रकारे साजरा होतो काही गावात दसऱ्याच्या दिवशी लोकनृत्य साजरी केली
जातात .गुजरात मध्ये नऊ दिवस गरबा नृत्य व गाणी म्हटले जातात .बंगालमध्ये हा उत्सव
मोठ्या प्रमाणावर साजरा होतो भारत हा शेतीप्रधान देश आहे त्यामुळे शेतीचा हा
लोकोत्सव संपूर्ण भारतात फार प्राचीन काळापासून साजरा होत आला आहे.
नऊ संख्या आणि नवरात्र
अध्यात्मिक संबंध आणि महत्त्व....🙏🌹
🌺
नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं
साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी.
🔶
दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार
शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री.
🔶
दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं
अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका.
🌺
महाराष्ट्रातली देवीमातेची प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं
वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई),
श्री एकवीरादेवी (कार्ला).
🌺
नवरात्रींचे ‘नऊ’ रंग
लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा.
🌺
नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा
रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश.
🌺
नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं
माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य,पीतवर्ण-मणी.
🌺 ‘नऊ’
प्रकारची दानं
अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, देहदान.
🔶 नवविध
भक्तीचे ‘नऊ’ प्रकार
श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन.
🌺
प्रसिद्ध ‘नऊ’ नाग
शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत, पद्मनाभ.
🔶 समस्त
मानवजातीला सामावून घेणा-या पृथ्वीचे नवखंड
भरतखंड (पूर्व), केतुमालखंड (पश्चिम), रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर), वृत्तखंड (आग्नेय), द्रव्यमालखंड (नैऋत्य), हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य), सुवर्णखंड (मध्य).
🌺 मानवी
देहांतर्गत असलेले ‘नऊ’ कोश अन्नमय, शब्दमय, प्राणमय , आनंदमय, मनोमय, प्रकाशमय, ज्ञानमय , आकाशमय, विज्ञानमय.
🌺 मानवी
मनाचे ‘नऊ’ गुणधर्म धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार, क्षमा, स्मरण, चांचल्य.
🌺 मानवी
शरीराच्या ‘नऊ’ अवस्था
मातेच्या उदरातली निषेक
रूपावस्था, गर्भावस्था, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व, मृत्यू.
🌺
नाथांच्या नीतीशास्त्रातली ‘नऊ’ रहस्यं
आयुष्य, वित्त, गृहछिद्र, मैथून, मंत्र, औषध, दान, मान, अपमान.
🌺🌺🌺 आई_जगदंबेची 🌺🌺🌺
अखंड_कृपा आपल्या सग्गळ्यांवर
आणि कुटुंबियांवर राहो .... आणि सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी
"श्री आई जगदंबेच्या
चरणी " प्रार्थना!!