सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

स्पर्धा परीक्षा गणित सराव -1

 

 

1)दोन क्रमवार संख्यांचा लसावि २१० आहे, तर त्या संख्या कोणत्या ?

2) विक्रमने एक कार २,२५,०००/- रुपयांना खरेदी केली. या व्यवहारामध्ये त्याने दलालाला २% दलाली दिली. तर त्याला ती कार किती रुपयांस मिळाली ?

3) अजयचा मासिक पगार 2450 रुपये आहे त्याचा मासिक खर्च 2100 रुपये आहे तर तो एका वर्षात एकूण किती रकमेची बचत करतो?

4) एक वस्तु 700 रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तु 1100 रुपयांना विकल्यामुळे होतो. तर त्या वस्तूची मूळ किंमत काढा.

5) रु 6800 नफा A, B, C यांना 5 : 4 : 8 प्रमाणात वाटल्यास B ला A पेक्षा किती रुपये कमी मिळाले ?

6) एका माणसाने सिमेंटची 300 पोती 40 रु. दराने घेतली व 7 टक्के फायदा घेऊन विकली, तर त्याला किती फायदा झाला ?

7) एका वर्गातील विद्यार्थी काही रांगांमध्ये बसलेले आहेत एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 400 विद्यार्थी आहेत तर एकूण रांगा किती होतील?

8) एका पुस्तकाची छापील किंमत ₹180  आहे दुकानदाराने ते अस्मिताला ₹153 ला विकले तर तिला शेकडा कितीच सूट मिळाली?

9) एका शहराची लोकसंख्या 50000 आहे दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20 टक्क्यांनी कमी होत आहे तर दोन वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या किती होईल?

10) एका गावाची लोकसंख्या 4000 आहे. ती दरवर्षी 10 टक्के वाढते तर दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल?

11) एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर त्यापैकी  मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?

12) जर एक टेबल सातशे वीस रुपयाला विकल्यामुळे 20 टक्के नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती?.

13) एका आयताकृती भिंतीची लांबी ही तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे तर, 2 रुपये प्रति मीटर या दराने ती भिंती पूर्ण रंगविण्यासाठी 256 रुपये खर्च आला असेल तर त्या भिंतीची लांबी किती ?

14) एका गावाची लोकसंख्या 1992 मध्ये 7500 होती. त्या गावाची लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर 25% आहे, तर 1990 मध्ये त्या गावाची लोकसंख्या किती असेल ?

15) दोन संख्यांचे गुणोत्तर 1:3 आहे. जर पहिल्या संख्येत 5 मिळविले व दुसऱ्या संख्येतून 4 वजा केले, तर नवीन गुणोत्तर 2:5 होते, तर दुसरी संख्या कोणती ?

16) तीन अंकी मोठ्यांत मोठी मूळ संख्या व दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल?

17) 5/8 मधे 5/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल?

18) वर्षा शैलजा पेक्षा 187 दिवसांनी लहान असून तिचा जन्म रविवारी झाला असल्यास शैलजाचा जन्म वार कोणता असेल?

19) एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया या 8 दिवसांत पूर्ण करतात. तेच काम 6 दिवसांत पूर्ण करावयाचे असल्यास किती स्त्रीया कामावर असाव्या?

20) अ’ एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?

21) अ’ एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?

22) तीन संख्यांचे गुणोत्तर 5:4:6 आहे तर प्रत्येक संख्येत 9 मिळवल्यास त्याची बेरीज 132 येते तर लहान संख्या सांगा.

23) सीमा व राणी यांना मिळालेल्या गुणाचे गुणोत्तर 2:1 आहे पुढील वर्षी सीमाचे गुण 50% कमी झाले तर राणीचे गुण 50% वाढले तर नवीन गुणोत्तर किती.

24) एका क्रिकेटपटूने 17 व्या कसोटीत 87 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 3 ने वाढली तर त्याची 17 कसोटीनंतरची सरासरी किती ?

25) एक स्त्री व तिच्या 5 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. जर स्त्रीचे वय विचारात घेतले नाही तर मुलांचे सरासरी वय 9 येते म्हणजे स्त्रीचे वय किती ?

26) एक घडयाळ काही किंमतीस विकल्याने खरेदीच्या 1/6 पट नफा होतो तर शेकडा नफा किती?

27) 2 मेट्रिक टनचे किती टक्के म्हणजे 40 क्विंटल होय.?

28) 0.009 म्हणजे किती टक्के ?

29) एका रकमेचे दोन वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे ८०० रुपये व ८६० रुपये आहे, तर व्याज दर किती?

30) एका रकमेचे द.सा.द.शे. १६ दराने सरळ व्याजाने ४ वर्षांची रास १३१२ रुपये व ६ वर्षांची रास १५६८ रुपये होते, तर ती रक्कम कोणती?

31) सायकल व मोटारसायकल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 8 : 75 आहे. सायकलची किंमत 4800 रु आहे तर मोटार सायकलची किंमत किती ?

32) A या नळाने एक टाकी भरण्यास 12 तास लागतात तसेच B या नळाने ती टाकी रिकामी होण्यास 24 तास लागतात. सुरवातीला दोन्ही नळ एकत्र सुरू केले आणि 4 तासानंतर नळ B बंद केला तर उर्वरित टाकी भरण्यास एकट्या नळ A ला किती वेळ लागेल.

33) A हा एक काम 10 दिवसात संपवितो व B हा तेच 20 दिवसात संपवितो. जर A ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला तर शिल्लक काम B किती दिवसात पूर्ण करेल. ?

34) एका पाण्याच्या टाकीस 3 नळ असून 1 ल्या दोन नळांनी ती टाकी अनुक्रमे 6 8 तासात पूर्णपणे भरते व तिसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी 3 तासात रिकामी होते. जर तिन्ही नळ एकदाच सुरू केले तर टाकी किती वेळात रिकामी होईल.

35) एका प्राणिसंग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात. पाय मोजल्यास एकूण 116 होतात. त्यापैकी हत्तीची संख्या किती ?

36) एक कुरणामध्ये गाई व गुराखी यांची संख्या 24 आहे. त्यांच्या पायांची संख्या 84 आहे तर कुरणामध्ये किती गाई आहेत ?

37) एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो तर ती संख्या कोणती ?

38)  175 टेबलच्या किंमतीत 20 खुर्च्या येतात जर एका टेबलाची किंमत रू. 1100/- असेल तर एका खुर्चीची किंमत किती ?

39) एका फळ विक्रेत्याने 5 रु. मध्ये 6 केळी विकत घेतली आणि 3 रु. ची 4 केळी विकली तर त्यास किती टक्के नफा/तोटा झाला ?

40) एक व्यापारी एक डझन सफरचंद रु. 200 ला विकत घेतो आणि 6 सफरचंद रु. 90 ला विकत असल्यास त्याला किती टक्के नफा अथवा तोटा होईल ?

41) एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर असून हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहे तर त्यासाठी किती फरशा लागतील ?

42) एका रकमेचे द.सा.द.शे. 5% दराने किती वर्षात दामदुप्पट होतील.

43) दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावि 3 आहे, तर त्यांचा लसावि काढा.

44) चार माणसे एक काम आठ दिवसात करतात तर दोन माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील.

45) राम हा श्यामपेक्षा 5 वर्षातील लहान आहे त्या दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे, तर रामचे वय किती ?

46) पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील लहान संख्या कोणती?

47) पाच क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती ?

48) चार संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या कोणती ?

49) नऊ क्रमवार विषम संख्याची सरासरी 103 आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या दोन संख्यांची सरासरी काय  असेल ?

50) पाच क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे. तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती ?

51) एक फलंदाज 19 व्या डावात 98 धावा करतो आणि  त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. तर 19 व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे ?

52) पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सिताला 20%व गुण जास्त आहेत व गिताला 10% गुण कमी आहेत. दोघींच्या गुणांमधील फरक 120 चा असेल तर परीक्षा किती गुणांची होती ?

53) एका कारचा सरासरी वेग 60 किमी/तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात, जर तेच अंतर साडे सात तासांत कापावयाचे असेल कारचा सरासरी वेग किती वाढवावा.

54) राम हा श्यामपेक्षा 5 वर्षातील लहान आहे त्या दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे, तर रामचे वय किती ?

55) 420 मुलांपैकी 1/3 मुले पास झालेत तर अनुत्तीर्ण झालेले मुले किती.

56) एका गटात पंधरा किंवा अठरा मुले या प्रमाणे मुलाचे गट केले तरी समान गट होतात, मुले उरत नाहीत तर मुलांची एकूण संख्या कमीत कमी किती असावयास हवी.

57) एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?

58) एका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडुंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील ?

59) 170 मीटर आणि 130 मीटर लांबीच्या दोन आगगाड्या एकमेकींच्या 4 विरुद्ध दिशांनी अनुक्रमे 60 आणि 48 किमी प्रतितास या वेगांनी समांतर रूळांवरून धावत आहेत तर त्यांना परस्परांना ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल ?

60) एका निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 4% मतदान बांद केले. त्या निवडणुकीमध्ये दोनच उमेदवार होते. जिंकलेल्या उमेदवाला 50% मते मिळाली आणि त्याने 3400 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर त्या निवडणुकीत एकूण मते किती होती ?

61) 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे सर्व काम समान अंतरावर आहेत तर 5 व्या व 9 व्या खांबातील अंतर किती.

62) एका शहराची लोकसंख्या ५०,००० आहे. दर वर्षी या शहराची लोकसंख्या २० टक्क्यांनी कमी होत आहे, तर २ वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती?

63) एका नावेत सरासरी २२ कि.ग्रॅ. वजनाची २५ मुले बसली.नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन २४ कि.ग्रॅ. झाले तर नावाड्याचे वजन किती?

64) गोपाळणे 15000 रु रक्कम दसादशे 12 दराने 5 वर्षे मुदतीसाठी व्याजाने घेतली तर त्याला एकूण किती सरळव्याज द्यावे लागेल.

65) एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे आहेत तेवढेच बादके आहेत त्या सर्वांचे पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती.

66) मयुरी आणि चैताली यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते तर मयुरी चे आजचे वय काय.

67) भाऊ व बहिण यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती असेल ?

68) एका स्पर्धा परिक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात परंतु प्रत्येक चूकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी होतो. तेजस्वीने 100 पैकी 80 प्रश्न सोडवले तेंव्हा तीला 142 गुण सोडवले ? मिळाले तर तीने एकूण किती प्रश्न बरोबर सोडवले.

69) एका प्राणीसंग्रहालयात काही हरिण व मोर आहेत. त्यांच्या पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येच्या दुपटीपेक्षा 62 ने जास्त आहे. तर त्या प्राणीसंगहालयात एकूण हरिण किती आहेत?

70)  गोपाळला गणित, मराठी, इंग्रजी व इतिहास या 4 विषयात सरासरी 70 गुण मिळाले. पण विज्ञानात मिळालेल्या गुणामुळे 5 विषयातील गुणांची सरासरी 5 ने कमी झाली तर गोपाळला विज्ञानात किती गुण मिळाले ?

71) दोन संख्यांचा मसावि १० आणि लसावि ६० आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या.

72) एक काम पूर्ण करण्यासाठी लीनाला 6 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी मीनाला 12 दिवस लागतात तर टीनाला 4 दिवस लागतात. तिघीनी मिळून काम केल्यास ते काम किती दिवसात संपेल ?

73) 4 पुरुष अथवा 6 स्त्रिया, एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर 2 पुरुष व 9 स्त्रिया मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?

74) A आणि B एक काम अनुक्रमे 15 आणि 10 दिवसांमध्ये पूर्ण करतात. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली, परंतु दोन दिवसांनंतर B ला काम सोडावे लागले आणि उरलेले काम A ने पूर्ण केले. हे काम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले ?

75) A आणि B एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात B एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो तर A एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ?

76) एका स्पर्धा परिक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो, जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून त्यास 30 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

77) एका स्पर्धा परिक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात परंतु प्रत्येक चूकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी होतो. तेजस्वीने 100 पैकी 80 प्रश्न सोडवले तेंव्हा तीला 142 गुण सोडवले ? मिळाले तर तीने एकूण किती प्रश्न बरोबर सोडवले.

78) एका स्पर्धा परिक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो, जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून त्यास 30 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

79) पाच वर्षांआधी A B चे सरासरी वय 15 वर्ष होते. आता A, B C चे सरासरी वय 20 वर्ष आहे. यावरून दहावर्षानंतर C चे वय किती असेल ?

80) एक मनुष्य आपल्या  उत्पन्नाच्या 75%  खर्च करतो, जर त्याची शिल्लक  500  रुपये असल्यास त्याचे उत्पन्न किती असेल ?

81) दोन संख्यांपैकी पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा 4 ने लहान आहे. जर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3:5 आहे. तर त्या संख्या कोणत्या ?

82) पाच वर्षापुर्वी आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट होते. आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे, तर मुलीचे आजचे वय किती ?

83) राम व श्याम दोघे विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत आहेत. राम हा 30 मीटर प्रति मिनिट या वेगाने तर शाम हा 40 मीटर प्रति मिनिट या वेगाने येत आहेत. दोघे 10 मिनिटानंतर एकमेकांना भेटतात तर दोघांमधील सुरुवातीचे अंतर किती ?

84) मधूचे वय त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट असून त्याच्या आईच्या वयाच्या १/३ पट आहे. मधूच्या आईचे ८ वर्षानंतरचे वय ५० वर्षे असेल तर मधूच्या बहिणीचे आजचे वय किती?

85) ५ विद्यार्थ्यांची गणितात मिळालेल्या गुणांची सरासरी ५० आहे. नंतर अस समजले कि एका विद्यार्थ्याचे गुण हे ४८ ऐवजी ८४ पकडण्यात आले, तर खरी सरासरी किती?

86) एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती ?

87) एक वस्तू 960 रू. ला विकल्यामुळे 20% तोटा होतो जर ती वस्तू 10% तोटयाने विकायची असेल तर कितीला विकावी.

88) एका संस्थेत मुलामुलींचे प्रमाण ८ : ५ असे आहे. जर मुलींची संख्या एकूण १६० आहे, तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?

89) एका टोपलीत चिकुचे 8, 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील?

90) एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायाची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे. तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?

91) 40,000 रु. ए.बी.सी.डी. या 4 मित्रांमध्ये अनुक्रमे 7: 1:5:3 या प्रमाणात वाटप करावयाचे आहे. तर 'सी'च्या वाट्याला किती रक्कम येईल?

92) 29 विदर्यार्थांचे सरासरी वय 25 वर्ष आहे त्यात एक नवीन व्यक्ती आल्यामुळे सरासरी 3 महिन्यांनी वाढली तर नवीन माणसाचे वय किती.

93) हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले व रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले. दोघांनी मिळून 880 रु. मिळाले तर त्यातील रामने किती रु. कमविले.

94) एक दागिन्यांचा व्यापारी किंमतीवर 20% सूट देतो तरीही त्या 16% नफा होतो, जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर त्याची खरी (खरेदी) किंमत किती ?

95) पाच वर्षापुर्वी आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट होते. आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे, तर मुलीचे आजचे वय किती ?

96) संजय आणि मंगेश यांची वये अनुक्रमे १४ वर्षे आणि १० वर्षे आहे. तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:४ होईल?

97) मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय ३० वर्ष होते, आता मुलाचे व आईचे वयाची बेरीज ४० आहे. दहा वर्षांनी मुलाचे वय किती असेल?

98) सोळा मुलाच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्याच्या शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकाचे वय किती वर्षे असावे ?

99) एका परिक्षेत 60% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. 70% विद्यार्थी बुद्धीमापन चाचणीत उत्तीर्ण झाले व 28% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले तर एकूण किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले ?

100) 1 ते 52 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती ?

101) सिता बाजारातून काही फळे विकत आणते आईने विचारल्यावर ती म्हणते, 15 सोडुन सर्व सफरचंद आहेत. 20 सोडून सर्व आंबे आहेत, 25 सोडून सर्व केळी आहेत. तर सिताने एकुण किती फळे आणले?

102) एका वर्गातील 30 कि.ग्रॅ. वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला तेव्हा 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 0.5 कि.ग्रॅ. ने वाढले तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती?

103) A हा B च्या दुप्पट वेगाने काम करतो. दोघांना एक काम करण्यासाठी 18 दिवस लागतात. तर एकटा A ते काम किती दिवसांत पूर्ण करेल.

104) वर्गांमधील मुलींची एकूण संख्या ही वर्गामधील मुलांच्या एकूण संख्येपेक्षा 45 टक्क्यांनी जास्त आहे. वर्गामधील विद्यार्थ्यांची संख्या 294 आहे तर मुली आणि मुलांच्या एकूण एकूण संख्या संख्येमधील फरक काय आहे?

105) रवि 1 रुपयाला दोन टॉफी या दराने टॉफी खरेदी करतो आणि 1 रुपयाला पाच अशाप्रकारे विक्री करतो. त्याच्या तोट्याची टक्केवारी काय असेल?

106) एका भांड्यात 112 लीटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हण  दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13 : 3 होईल ?

107) तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे. दुसरी व तिसरीचे 3:4 आहे. जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती ?

108) अनिल हा सुनितापेक्षा दुप्पट वयाचा आहे. तीन वर्षापूर्वी, त्याचे वय सुनिताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते. तर अनिलचे सध्याचे वय किती?

109) एक दुकानदार एक टेबल 15% सवलतीने विकत घेऊन 3910 रु. ना विकतो. या व्यवहारात त्याला 15% नफा झाला, तर दुकानदाराला सवलत किती रुपये मिळाली?

110) मनोहररावांनी आपल्या एकूण शेताच्या 1/5 भागात सेंद्रीय खत वापरले, 1/4 भागात रासायनिक खत वापरले. उरलेल्या 55 एकर क्षेत्रात त्यांनी गांडूळखत वापरले, तर त्यांची एकूण शेती किती असेल ?

111) एकाच कुटुंबात 4 सदस्य आहेत. त्यांच्या वयाची बेरीज 122 वर्षे आहे. वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुलीपेक्षा 8 वर्षांनी मोठे आहेत. मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट आहे, तर मुलीचे वय काय असेल?

112) चार विद्यार्थ्यांचे आजचे सरासरी वय 14.5 वर्षे आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांची वये अनुक्रमे 4:5:6:8 या प्रमाणात होती. सर्वात मोठ्या विद्यार्थ्यांचे आजचे वय किती?

113) वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. दहा वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या अडीच पट होईल, तर वडिलांचे आजचे वय किती?

114) राजु व दिपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे, दिपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे, तर राजु, दिपक, संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा ?

115) एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल तर त्या संख्येची 55% किंमत किती ?

116) मागील वर्षी पेट्रोलचा भाव 22 रुपये प्रति लिटर होता यावर्षी भाव 28 रुपये प्रति लिटर झाला तर पेट्रोलच्या भावातील शेकडा वाढ काढा

117) मागील वर्षी 25 रुपयांना मिळणारा पेन यावर्षी 21 रुपयांना मिळतो ,तर पेनाच्या किमती शेकडा घट काढा.

118) एका करंडीतील पेरूंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात, तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील ?

119) एक पुस्तक 207 रुपयांना विकल्याने 15% नफा होतो. जर 25% नफा हवा असेल तर, पुस्तक कितीला विकावे ?

120) क ने 600 रुपयांची वस्तू श ला 30 टक्के नफ्याने विकली तर एकूण किती नफा झाला?

121) 36, 27 आणि 60 यांचे चौथे प्रमाणपद काय आहे?

122) 5 संख्याची सरासरी 140 आहे. जर त्यातून एक संख्या काढली तर इतर 4 संख्याची सरासरी 130 येते तर ती काढून टाकलेली संख्या कोणती ?

123) पुणे ते कोल्हापुर आणि कोल्हापुर ते पुणे विनाथांबा बसच्या दिवसभरात 5 फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येक वेळी 45 प्रवासी होते. बसचे तिकिट प्रत्येकी 80 रू. असल्यास दिवसभरात त्या बसचे एकूण उत्पन्नकिती ?

124) विलास एका शाळेत वर्षात 198 दिवस उपस्थित होता त्याची  वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्यावर्षी किती दिवस भरले?

125) विलास एका शाळेत वर्षात 198 दिवस उपस्थित होता त्याची  वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्यावर्षी किती दिवस भरले?

s