रेषाखंडाच्या
मर्यादा दाखविणाऱ्या बिंदुना काय म्हणतात ? |
उत्तर
– अंत्यबिंदू |
किरणाच्या
सुरुवातीच्या बिंदुला काय म्हणातात? |
उत्तर-
आरंभबिंदू |
दिलेल्या
एका बिंदूतून किती रेषा काढता येतात? |
उत्तर-
असंख्य |
दोन
बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येतील ? |
उत्तर-
एक आणि एकच रेषा |
सपाट
पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात? |
उत्तर-
प्रतल. |
एकाच
प्रतलात असलेल्या व एकमेकीना न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणतात? |
उत्तर-
समांतर रेषा . |
दोन
बिंदूतील अंतर मोजण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग करतात? |
उत्तर-
कर्कटक |
4
वाजता घड्याळाच्या तास व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल ? |
उत्तर-
1200 |
दोन
विरुद्ध संख्यांची बेरीज किती असते ? |
उत्तर-
शून्य |
32
च्या सर्व विभाजकांची संख्या किती ? |
उत्तर-
6 1,2,4,8,16,32, |
सम
असलेली मूळ संख्या कोणती ? |
उत्तर-
2 |
1
ते 100मध्ये किती मूळ संख्या आहेत ? |
उत्तर-
25 |
एक
अंकी मूळ संख्या किती आहेत ? |
उत्तर-
4 |
दोन
अंकी मूळसंख्या किती आहेत ? |
उत्तर-21 |
सर्वात
लहान मूळसंख्या कोणती ? |
उत्तर-2 |
सर्वात
मोठी दोन अंकी मूळसंख्या कोणती ? |
उत्तर-97 |
1
ते 100 मध्ये किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत ? |
उत्तर-
8 |
मूळ
संख्यांचा मसावि किती असतो ? |
उत्तर-
1 |
सहमूळ
संख्यांचा मसावि किती असतो ? |
उत्तर-
1 |
दोन
क्रमवार संख्यांचा मसावि किती असतो ? |
उत्तर-
1 |
दोन
क्रमवार सम संख्यांचा मसावि किती असतो ? |
उत्तर-
2 |
जोडमूळ
संख्यांचा मसावि किती असतो ? |
उत्तर-
1 |
18
व 144 या संख्यांचा मसावि किती ? |
उत्तर-
18 |
18
व 144 या संख्यांचा लसावि किती ? |
उत्तर-
144 |
मसावि या शब्दाचे विस्तारित रूप काय आहे ? |
उत्तर-
महत्तम सामाईक विभाजक |
लसावि या शब्दाचे विस्तारित रूप काय आहे ? |
उत्तर-
लघुत्तम सामाईक विभाज्य . |
‘कोणतीही
संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या
रुपात लिहिता येते ‘ हा नियम कोणत्या गणिततज्ज्ञाने सांगितला आहे ? |
उत्तर
– युक्लिड |
|
|