आकलन
सूचना पालन , वर्णन व मजकूर
1) ‘जोडाक्षरयुक्त शब्द ‘यामध्ये किती जोडाक्षरे आहेत ?
1) 2
2) 3 3)
4 4) 5
2)’ल,मो,गु.र,ह ‘ या सर्व अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनविल्यास
त्यातील मधले अक्षर कोणते येईल ?
1) गु
2) मो 3)
ह 4) ल
3) जन्मामुळे नव्हे तर केवळ सद्गुणांमुळे आपण थोर बनतो. या वाक्यात ए
–कारांत शब्द किती आले आहेत ?
1) चार 2) पाच 3) सहा 4) तीन
4)’ ल,घे,डा, बो,व ‘ या सर्व अक्षरापासून एक अलंकारिक शब्द
बनतो.त्याचा नेमका अर्थ कोणता?
1)मोजकेच बोलणारा 2)कमी बोलणारा 3)उगाच बडबड करणारा 4)मुद्देसूद
बोलणारा
5)’माझ्यासोबत माझे काका , मामा , मावशी , बाबा असे सार्वजण देवळात
आले होते ’ या वाक्यात आकारांत अक्षरे
किती आहेत ?
1) 8
2) 10 3)
12 4) 11
6) ‘ भारतात ज्ञानी लोक जास्त प्रमाणात होते.’ या वाक्यात दोन अक्षरी
शब्द किती आले आहेत ?
1) तीन 2) पाच 3) सहा 4) चार
7) ‘ कृष्णराजसागर ‘ या शब्दातील अनुक्रमे चौथे व सहावे अक्षर कोणते ?
1) ज आणि ग 2) 3 ज आणि र 3) रा आणि ग 4) ग आणि र
8) ‘सकाळी उठल्यावर दात, तोंड, हात आणि पाय स्वच्छ धुवावेत ‘ या
वाक्यात किती अक्षरी शब्द सर्वाधिक आले आहेत ?
1) सहा 2) दोन 3) चार 4) तीन
9) ‘ज्ञानी लोक क्षत्रिय असतात.’ या वाक्यात जोडाक्षरे किती आहेत ?
1) एक 2) तीन 3) दोन 4) चार
10)’खळखळ वाहणाऱ्या पाण्यातून वाट काढत काढत विनोद कसाबसा पाण्याबाहेर
आला.’ या वाक्यात तीन अक्षरी शब्दापेक्षा चार अक्षरी शब्दांची संख्या कितीने जास्त
अथवा कमी आहे ?
1) 1 ने कमी 2) 2 ने
जास्त 3)2ने कमी 4) 1 ने जास्त
11)’ज्ञानरचनावाद’ या शब्दातील अनुक्रमे पाचव्या अक्षराच्या डावीकडील
तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर
कोणते ?
1) न 2) द 3) च 4) र
12) ‘चिमणी सकाळी उठून फिरण्यास निघाली’. या वाक्यात ई-कारांत शब्द
किती आहेत ?
1) चार 2) तीन 3) दोन 4) सहा
13) ‘विद्यार्थ्यानी ज्ञानी बनावे, परीक्षार्थी न बनता कीर्तीवंत
बनावे ‘. या वाक्यात जोडाक्षरयुक्त शब्द किती आले आहेत ?
1) चार 2) तीन 3) पाच 4) सहा