कूटप्रश्न-3
* शाळेच्या मैदानावर त्रिकोणाकृती मुले उभा केली आहेत.त्या त्रिकोणाकृती
जागेवर प्रत्येक बाजूवर 15 मुले दिसतात.तर प्रत्यक्षात तेथे किती मुले उभी असवीत ?
उत्तर- 42 मुले
प्रत्येक बाजूवर 15 मुले म्हणजे कोपऱ्यावरची मुले 2 बाजूवर येणार
म्हणजेच
प्रत्येक बाजूवर 13 मुले याप्रमाणे 3 बाजूवर 39
मुले आणि कोपऱ्यावरील 3 मुले अशी एकूण 42 मुले प्रत्यक्षात तेथे उभी असतील.
*48 सेमी परिमिती असणारे व पूर्णांकात लांबी व रुंदी असणारे जास्तीत जास्त
किती आयत काढता येतील ?
उत्तर -12 आयत
(1+23) (2+22) (3+21) (4+20) (5+19) (6+18) (7+17) (8+16)
(9+15) (10+14) (11+13) (12+12)
एका संख्येच्या पाढ्यातील सर्व संख्यांच्या बेरजेला 5 ने भागले असता
भागाकार 99 येतो व बाकी 0 उरते तर तो पाढा कितीचा असेल ?
99÷11 = 9 ( पाढ्याच्या बेरजेचे 11×5 हे
अवयव निश्चित असतात )
तो पाढा 9 चा आहे .
*एका संख्येच्या क्रमाने पुढील व मागील संख्येचा गुणाकार 624 येतो , तर ती संख्या कोणती ? उत्तर-25
कोणत्याही संख्येच्या मागील व पुढील संख्येचा गुणाकार हा मधल्या
संख्येच्या वर्गापेक्षा 1 ने कमी असतो.
624+1 = 25 चा वर्ग आहे.
25 च्या मागील संख्या=24 25 च्या पुढील संख्या=26
24×26 =624
एकाच प्रकारची 6 ताटे व 5 वाट्या यांची एकूण किमत 180 रु आहे.5 ताटे व
6 वाट्या यांची एकूण किमत 161 रु. आहे ; तर एक ताट व एक वाटीची किमत किती ? उत्तर-
31 रु.
ताटे |
वाट्या |
किंमत |
6 |
5 |
180 |
5 |
6 |
161 |
11 |
11 |
341 |
1 |
1 |
31 |