सर्वनामांचे प्रकार
1)
पुरुषवाचक
सर्वनामे-
पुरुषवाचक |
एकवचन |
अनेकवचन |
प्रथम |
मी |
आम्ही |
द्वितीय |
तू |
तुम्ही |
तृतीय |
तो ,ती,ते |
ते, त्या,ती |
2)
दर्शक
सर्वनामे – जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला
दर्शक सर्वनाम म्हणतात.
उदा. हा , ही, हे- तो , ती, ते
3)संबंधी सर्वनामे- वाक्यात दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना
संबंधी सर्वनामे म्हणतात.
उदा. जो-जी-जे -ज्या.
4)प्रश्नार्थक सर्वनामे- प्रश्न
विचारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात.
उदा. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी.
5) सामान्य किंवा अनिश्चित
सर्वनामे-प्रश्नार्थक सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामाबद्दल आली
आहेत हे निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे
म्हणतात.
उदा. माझ्या मुठीत काय आहे ते सांग पाहू
?
कोणी केले ते मला माहित नाही .
6) आत्मवाचक सर्वनामे- स्वतः
या अर्थी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामांना आत्मवाचक सर्वनाम म्हणतात.
उदा. तू स्वतः कष्ट
कर.