पद्मभूषण डॉ. जे पी नाईक यांचा जीवनपट
१९०७ - ५ सप्टेंबर १९०७ रोजी बहिरेवाडी
तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथे जन्म.
१९१७ - वयाच्या दहाव्या वर्षी प्राथमिक
शिक्षणाची सुरुवात.
१९३० - सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग- दोन वर्षांची तुरुंगवासाची सजा.
१९३२- राजाराम कॉलेज कोल्हापूर येथील
प्राध्यापक पदाचा राजीनामा.
१९३३- धारवाड येथील उप्पीनबेटीगेरी या मागास खेड्यात वास्तव्य. त्या गावचा
ग्राम विकास करून मुंबई
राज्यातील आदर्श खेडे केले. मा.
राज्यपाल यांच्या हस्ते सर फ्रेडरिक साइक्स ग्राम सुधारणा ढाल
देऊन सन्मान.
१९४२ ते १९४८- कोल्हापूर येथे वास्तव्य व कार्य.
१९४२- खासगी प्राथमिक शाळांना ‘ग्रँट इन कोड लागू करण्यात पुढाकार.
१९४३- संस्थानभर प्राथमिक शिक्षण कायदा लागू
केला.
१९४६- संस्थानमधील प्राथमिक शाळांचा
महत्त्वाकांक्षी कार्यक्रम पार पाडला.
१९४४- कोल्हापूरच्या जनतेसाठी भास्करराव जाधव
वाचनालयाची स्थापना. महिलांसाठी पद्माराजे
वाचनालयाची स्थापना. कोल्हापूर
नगरपालिकेचा नव्वद वर्षाचा इतिहास लिहिला.
१९४५- कोल्हापूर शहर सुधार समितीचे सचिव
म्हणून नियुक्ती ती महालक्ष्मी मंदिर ते ते रंकाळा तलावा
पर्यंत भव्य ताराबाई रोडची आखणी.
१९४६- शिवाजी उद्यमनगर या औद्योगिक वसाहतीची
निर्मिती . शाहू मार्केट या स्वतंत्र गुळ पेठेची
निर्मिती. ५६२ एकरात शेंडा पार्क येथे डॉक्टर सिमेंस यांच्या सहकार्याने महारोग्यांसाठी
स्वतंत्र वसाहतीची
स्थापना.
१९४८- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या पदव्युत्तर संशोधन विकास संस्थेची मुंबई येथे स्थापना.
१९५२- गारगोटी श्री मौनी विद्यापीठ या
महत्त्वाकांक्षी शिक्षण प्रयोगशाळेची स्थापना.
१९५५- मुंबई राज्याच्या १८६५ ते १९५५ या शंभर वर्षाच्या कालावधीचा शैक्षणिक शताब्दीचा इतिहास
ग्रंथ लिहिला.
१९५९- केंद्रीय शिक्षण मंत्रालयात प्राथमिक
शिक्षणासाठी प्रमुख सल्लागार म्हणून भारत सरकारने नियुक्ती
केली . युनेस्को या जागतिक
संस्थेने आशिया खंडातील प्राथमिक शिक्षणाच्या विकासासंबंधी योजना तयार
करण्याची की महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली.
१९६०- प्राथमिक विकासासंबंधी प्राथमिक
शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाची कराची योजना यूनेस्को ला सादर.
इंडियन जर्णल ऑफ एज्युकेशनल
ऍडमिनिस्ट्रेशन अंड रिसर्च हे शिक्षण विचारांना वाहिलेले पहिले त्रैमासिक
सुरू. आणि शिक्षण क्षेत्रातील वर्षभराच्या काळात
महत्त्वाच्या घटनांची नोंद ठेवणारे एज्युकेशनल इयर
बुक प्रसिद्ध केले.
१९६१- मध्यवर्ती शिक्षण मंत्रालयाच्या शिक्षण
सल्लागार मंडळाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने
शिक्षणातील महत्त्वाच्या नोंदी देणारा
रौप्यमहोत्सवी ग्रंथ प्रसिद्ध केला.
भारत सरकारच्या वतीने
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) या देश
स्तरीय शिक्षणव्यवस्थेचे कल्पना अमलात
आणली.
१९६२- युनोस्को च्या सहाय्याने एशियन
इन्स्टिट्यूट एज्युकेशनल प्लॅनर्स
अंड ऍडमिनिस्ट्रेशन ही
शिक्षणास नियोजन आणि कार्यवाही करणारी
संस्था स्थापन केली.
१९६४- भारतीय शिक्षण आयोगाच्या सचिव पदी भारत
सरकारने नियुक्ती केली.
१९६६- देशाच्या शिक्षणाचा कायापालट करणारा
शिक्षण आयोगाचा अहवाल भारत सरकारला सादर. हा
अहवाल डॉक्टर जे पी नाईक यांचे
महत्त्वपूर्ण काम भारतीय शिक्षण आयोगाने अध्यक्ष डॉक्टर कोठारी
यांनी या शिक्षण आयोगाच्या कामाबद्दल
मुक्तकंठाने धन्यवाद दिले.
१९७०- मध्यवर्ती शिक्षण विभागात अनुदान पात्र
इंडियन कौन्सिल ऑफ स्पेशल सायन्स रिसर्च या
संशोधन संस्थेची स्थापना.
१९७८- राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम शासनाने
कार्यान्वित केला आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला शासनाने
उचलून धरले याचा आनंद आकाशवाणीवरून
व्यक्त केला.
१९८०- युनोस्को बँकॉक येथील विभागीय
कार्यालयाच्या शैक्षणिक नियोजन विषयक जागतिक परिषद
भारताचा प्रतिनिधी म्हणून शोध निबंध
वाचला आणि त्यातल्या शैक्षणिक विचाराने जागतिक शिक्षण
व्याख्यांना प्रभावित केले .
१९८१- ३० ऑगस्ट १९८१ वयाच्या ७४ व्या वर्षी इहलोकाचा निरोप.