* पंचकोनांच्या सर्व अंतर्गत कोनांची बेरीज किती ?
* एका चोराचा पाठलाग करणाऱ्या पोलीस जीपचा वेग ताशी 100 किलोमीटर असेल आणि चोरांची गाडी ताशे 80 किलोमीटर वेगाने धावत असेल त्या दोघांमध्ये 10 किलोमीटर अंतर असेल तर किती वेळेत पोलीस चोरास पकडतील ?
* पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला 20 टक्के गुण जास्त आहेत व गीताला 10 टक्के गुण कमी आहेत दोघींच्या गुणामधील फरक 120 असेल तर परीक्षा किती गुणांची होती ?
* एक धावपटू 200 मीटर अंतर 24 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती किलोमीटर ?
* कोल्हापूरहून 240 किलोमीटर अंतरावरील पुणे येथे एका कामासाठी रवी मोटार सायकल वरून 6 तासात गेला. काम आवरून परतताना गाडीचा वेग वाढवून अवघ्या 4 तासात कोल्हापूरला पोहोचला. तर परतताना रवीने वेग ताशी किती किलोमीटरने वाढवला ?
* मुंबई ते अहमदाबाद अंतर 2000 किलोमीटर आहे या दोन्ही ठिकाणाहून परस्परांच्या दिशेने दोन गाड्या अनुक्रमे ताशी 120 किलोमीटर व ताशी 80 किलोमीटर वेगाने निघाल्या तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळाने भेटतील ?
* ताशी 45 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी गाडी जर 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारीत मुक्कामावर 90 मिनिटे लवकर पोहोचते .तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला ?
* 5 महिला किंवा 4 मुली एक काम 30 दिवसात पूर्ण करतात .तर 15 महिला व 8 मुली तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?
* अंकिताला इंग्रजी सोडून इतर पाच विषयात सरासरी 60 गुण मिळाले . इंग्रजीमधील गुण मिळवल्यास सहा विषयांचे सरासरी 61 होते तर त्याला इंग्रजीमध्ये किती गुण मिळाले ?
* एका विद्यार्थी वस्तीगृहातील 20 विद्यार्थ्यांना 10 दिवसाचा खर्च 5000 रुपये होतो .तर त्या च वस्तीगृहात 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती होईल १
* 20% सवलत पिल्याने मासिकाची किंमत 596 रुपये असेल तर मासिकाच्या मूळ किंमत किती ?