रांगेतील स्थान -
1) पूनमच्या मागे
आठ व पुढे दोन मुली आहेत तर त्या रांगेत एकूण मुली किती ?
2) तिकिटाच्या
रांगेत उभ्या असलेल्या निखिलच्यामागे पाच व्यक्ती व पुढे नऊ व्यक्ती आहेत तर तर
शेवटून सातव्या व्यक्तीचा पुढून क्रमांक किती असेल ?
3) राघवच्या डाव्या बाजूला 8
मुले आहेत आणि उजव्या बाजूला 3 मुले आहेत तर रांगेत डावीकडून 10
व्या क्रमांकावर असणाऱ्या मुलाचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल १
4) एका धावण्याच्या शर्यतीत अमोलच्या पुढे 2
स्पर्धक होते श्रीकांत अमोलच्या मागे दुसरा होता श्रीकांतचा शेवटून तिसरा क्रमांक
होता तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती?
5) 26 मुलांच्या रांगेत सुहास समोरून 13 व्या
क्रमांकावर उभा आहे तर त्याच्या मागे आणखी
किती मुले उभी असतील ?
6) एका मुलांच्या रांगेत सिद्धांतचा क्रमांक
दोन्ही टोकाकडून 13 वा आहे . तर रोगेत एकूण मुले किती ?
7) एका सरळ रेषेत एकेक मीटर अंतरावर काही खांब
उभे आहेत. तर कोणत्याही सलग पाच खांबातील अंतर किती ?
8) मुलांच्या रांगेत आशिषचा क्रमांक डावीकडून पाचवा आणि उजवीकडून
सहावा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?
9) मुलींच्या रांगेत प्राची मधोमध उभी आहे तिच्या डावीकडे तिसऱ्या
स्थानावर आर्या उभी आहे आर्याच्या डावीकडे आणखी कोणीही बसलेले नाही तर रांगेत एकूण
किती मुली आहेत ?
10) एका रांगेत शामल मधोमध उभी आहे तिच्या डावीकडे 6
मुली आहेत तर तिच्या उजवीकडे एखूण किती मुली असतील ?
11) मुलींच्या रांगेत रीमाच्या उजवीकडे 8
मुली आणि डावीकडे 10 मुली आहेत. तर डावीकडून 6
व्या मुलीचा उजवीकडून काय क्रमांक येईल?
12) 30 मुलींच्या रांगेमध्ये गीता ही सीताच्या पुढे 5
व्या क्रमांक वर आहे. जर सीताचा मागून 15 वां क्रमांक
येतोय तर समोरून गीता कितव्या क्रमांक वर असेल?
13) एका मुलांच्या रांगेमध्ये राजेश डावीकडून 5
व्या आणि उजवीकडून 6 व्या क्रमांक वर आहे. जर रांगेत एकूण 13
मुळे बसवायची असतील तर अजून किती मुले बसवता येतील?
14) जर 225 मुलांना रांगेत
असे उभे करायचे आहेकी रांगांची संख्या आणि एका रांगेतील मुले यांची संख्या सारखी
असायला हवी. तर अशा किती रांगा होतील.
15) विद्यार्थ्यांच्या एका रांगेत गणेश समोरून 10 वा
आहे आणि महेश मागून 12 वा आहे. तसेच गणेश हा महेशच्या समोर
उभा असून त्या दोघांमध्ये 4 मुले उभी आहेत. तर त्या रांगेत एकूण
किती मुले उभी आहेत?
16) रांगेतील अजयचा क्रमांक दोन्ही बाजूंनी
पंधरावा असल्यास रांगेत एकूण किती मुले आहेत ?
17) हेमंतचा क्रमांक डावीकडून अठरावा व
उजवीकडून 20 वा असल्यास रांगेत एकूण किती
मुले आहेत?
18) मुलींच्या रांगेत सीमा चा क्रमांक उजवीकडून
10 वा व डावीकडून 14 वा आहे. त्या रांगेत आयशा मधोमध
असल्यास तिचा दोन्ही बाजूंनी क्रमांक कितवा असेल?
19) एका सरळ रेषेत एक एक मीटर अंतरावर रोपे
लावली आहेत. तर कोणत्याही सलग 15 खांबातील अंतर किती आहे?
20) एका रांगेत युवराजची जागा एका टोकाकडून 6 वी
व दुसऱ्या टोकाकडून 22 वी आहे. शौकत त्या रांगेत मधोमध आहे, तर
त्याचा रांगेतील क्रमांक कितवा?
21) एका मैदानावर समान अंतरावर उभ्या केलेल्या
लगतच्या तीन खांबातील अंतर 12 मीटर असल्यास लगतच्या 10
खांबातील अंतर किती ?
22) एका फळबागेत एका रांगेत 101
झाडे आहेत. तर मधोमध असणारे झाड कितव्या क्रमांकाचे असेल ?
23) गायत्री चा एका रांगेत डावीकडून पाचवा
क्रमांक आहे. व उजवीकडून 24 वा क्रमांक आहे. तर रांगेत एकूण किती
मुले आहेत
24) साक्षीच्या डावीकडे 10
मुली व उजवीकडे 15
मुली आहेत. तर त्या रांगेत एकूण किती मुली आहेत?
25) सागरच्या डावीकडे 5
मुले व उजवीकडे 7
मुले आहेत. तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
26) अशोकचा डावीकडून 12 वा
व उजवीकडून 15वा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती ?
27) एका रांगेत 20 व्यक्ती आहेत .
अमरचा डावीकडून 9 वा क्रमांक आहे . तर त्याचा उजवीकडून कितवा
क्रमांक असेल ?
28) एका रांगेत 150 व्यक्ती आहेत .
रामराव यांचा उजवीकडून 100 वा क्रमांक आहे तर त्यांचा डावीकडून
कितवा क्रमांक असेल?
29) एका रांगेत A चा डावीकडून 12 वा
व B चा उजवीकडून 17 वा क्रमांक आहे आणि A व B मध्ये
5 व्यक्ती असल्यास त्या रांगेतील जास्तीत जास्त मुले किती ?
30) एका रांगेत A चा डावीकडून 12 वा
व B चा उजवीकडून 17 वा क्रमांक आहे आणि A व B मध्ये
5 व्यक्ती असल्यास त्या रांगेतील कमीत कमी मुले किती ?
31) एका रांगेत अथर्व डावीकडून 20वा
व केशव उजवीकडून 15वा आहे दोघांनीही आपापली जागा बदलली तर अथर्व
हा डावीकडून 25 वा येतो तर त्या रांगेत एकूण मुले किती ?
32) सभामंडपासाठी समान अंतरावर उभ्या केलेल्या
लगतच्या 3 खांबातील अंतर 6मीटर असल्यास
त्या लगतच्या 6 खांबातील अंतर किती ?
33) रमेश सर्कस चे तिकीट काढण्यासाठी रांगेत
उभा आहे त्याच्यामागे 32 व्यक्ती व पुढे 18
व्यक्ती उभे आहेत तर शेवटून 23 वे व्यक्तीच्या पुढे किती व्यक्ती उभे
आहेत?
34) मुलींच्या रांगेत मोनिका एका टोकाकडून 21
सहावी व दुसऱ्या टोकाकडून 35 वी आहे शितल त्या रांगेत मधोमध आहे तर
शीतलचा त्या रांगेतील क्रमांक कितवा असेल?
35) गणेशला एका दोन खंडाचे समान लांबीचे 15
तुकडे करायचे आहेत त्यासाठी प्रथम त्याने दोन खंडाची दोन्ही टोके एकमेकांशी जुळवून
घेतली तर त्याला हवे असलेले 15 तुकडे मिळवण्यासाठी गणेशला तो दोरखंड
किती वेळा कापावा लागेल?
36) एका वर्गात दीपिका वरून आठवी व महेश खालून 22 वा
आहे तर नीलम महेशच्या वर तिसरी व दीपिकाच्या खाली बारावी असेल तर वर्गात एकूण किती
विद्यार्थी असतील?
37) मुलांच्या एका रांगेत मनोहर डावीकडून 19
व्या स्थानावर आहे तर निलेश उजवीकडून 13 व्या स्थानावर
आहे जर निलेशला डावीकडे 7 स्थानाने सरकवले तर तो उजवीकडून
मनोहरच्या लगतच्या नंतरच्या स्थानावर येतो तर रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत?
38) एका रांगेत मुलींच्या पेक्षा मुलांची
संख्या एक ने जास्त आहे रांगेत ए काढ एक मुलगा मुलगी उभी असल्यास व मध्यभागी मुलगा
उभ्या असल्यास त्या मुलाचा कितवा क्रमांक असेल?
39) क्रीडांगणावर विद्यार्थ्यांच्या 12
ओळी आहेत प्रत्येक ओळीतील मधल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक तेरावा आहे तर त्या
क्रिडांगणावर एकूण किती विद्यार्थी ओळीत उभे आहेत?
40) एका झाडांच्या रांगेत चिंचेचे झाड डाव्या
बाजूने अकरावे आहे आणि लिंबाचे झाड उजव्या बाजूने अकरावी आहे एकूण झाडांची संख्या 32
आहे दोन झाडांमध्ये पाच मीटर अंतर आहे तर चिंचेच्या व लिंबाच्या झाडांमध्ये अंतर
किती आहे?
41) एक तार प्रथम सात ठिकाणी कापली नंतर
प्रत्येक तुकड्याचे 11 तुकडे केले तर एकूण तुकडे किती झाले?
42) एका चौकोनाकृती क्रीडांगणाच्या चार
शिरोबिंदूवर चार मुले उभी केली आहेत तसेच त्या क्रिडांगणाच्या प्रत्येक बाजूवर
काही मुले अशा प्रकारे उभी केली आहेत की क्रीडांगणाच्या प्रत्येक बाजूवर 20
मुले उभे राहतील तर त्या क्रिडांगणाच्या चौकोनाकृती बाजूंवर किती मुले उभी आहेत?
43) एका चित्र प्रदर्शनात सिंह वाघ हरिण आणि
हत्ती या चार प्राण्यांची 150 चित्रे ओळीने त्याच क्रमाने भिंतीवर
लावलेली आहेत तर 83 व्या क्रमांकावर कोणाची चित्रे येईल?
44) दोरीच्या 20 तुकड्यांना गाठी
बांधून वर्तुळाकृती तयार करायची आहे तर कमीत कमी किती गाठी माराव्या लागतील ?
45) एका रांगेत A चा डावीकडून 12 वा
व B चा उजवीकडून 17 वा क्रमांक आहे .जर रांगेत जास्तीत
जास्त 34 मुले असतील तर A व B मध्ये किती मुले असतील ?
46) एका रांगेत A चा डावीकडून 12 वा
व B चा उजवीकडून 17 वा क्रमांक आहे .जर रांगेत कमीत कमी 22
मुले असतील तर A व B मध्ये किती मुले
असतील ?