सुस्वागतम् MY SCHOOL या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे.

6 वे राष्ट्रीय शिक्षण संमेलन



  ६ वे राष्ट्रीय शिक्षण संमेलन दि. २० मे २०२३ व २१ मे २०२३ रोजी  संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे ता . हातकणंगले जि . कोल्हापूर या ठिकाणी संपन्न झाले .सदर संमेलनासाठी मा.श्री. संजयसिंह चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर , मा. श्री. गोविंद नांदेडे पूर्व शिक्षण संचालक , महाराष्ट्र राज्य, मा.श्री . दिनकर टेमकर पूर्व शिक्षण संचालक , महाराष्ट्र राज्य, मा.इक्बाल शेख प्राचार्य DIET कोल्हापूर,मा.डॉ. नेहा बेलसरे उपसंचालक SCERT पुणे , मा.डॉ. प्राची साठे शिक्षण अभ्यासक तथा पूर्व OSD शिक्षण मंत्रालय महाराष्ट्र राज्य,मा.योगेश सोनवणे उपविभाग प्रमुख IT विभाग SCERT पुणे, मा. विराट गिरी प्राचार्य संजय घोडावत पॉलि.यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

सदर संमेलनासाठी मा. डॉ. कुलदीप चंद अग्निहोत्री शिक्षण अभ्यासक तथा माजी कुलगुरू हिमाचल प्रदेश केंद्रीय विश्व विद्यालय , मा.राकेशकुमार पटेल प्रयोगशील शिक्षक गुजरात ,मा. शशांक हजारिका प्रयोगशील शिक्षक आसाम,मा. स्नेहिल पांडे प्रयोगशील शिक्षक उत्तर प्रदेश खास मार्गदर्शक म्हणून लाभले .





संमेलनाचा पहिल्या दिवशी मा . गोविंद नांदेडे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने सर्वांची मने जिंकून घेतली. मा. श्री. दिनकर टेमकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

मा.डॉ. कुलदीप चंद अग्निहोत्री यांनी ब्रिटीश काळापासूनची शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला. शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

मा. राकेश कुमार पटेल यांनी आपल्या मस्ती की पाठशाला या उपक्रमाची माहिती आपल्या कुशल वाणीने सर्वांसमोर मांडली .

राष्ट्रीय  शैक्षणिक धोरण २०२० शिफारशी आणि अमलबजावणी या विषयी मा . डॉ.. नेहा बेलसरे यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय  शैक्षणिक धोरण २०२० आणि बदलते शिक्षण या विषयावर मा. डॉ. प्राची साठे यांनी सर्वांना संबोधित केले.

मा. सुरज मांढरे साहेब आयुक्त (शिक्षण ) महाराष्ट्र राज्य  यांच्या प्रत्यक्ष मुलाखत व मनोगतातून सद्य शैक्षणिक स्थितीचा आढावा घेनेत आला.

पहिल्या दिवसाचा शेवट कवीकट्टा व कोल्हापूर टीम ने सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

समेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात वर्तमान भारतीय शिक्षा मे  शिक्षक की भूमिका मा. शशांक हजारिका प्रयोगशील शिक्षक आसाम  यांच्या मार्गदर्शनाने झाला.

मा. स्नेहल पांडे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने राबविलेले विविध उपक्रमाची माहिती सांगितली. स्वतः डॉ. चा पेशा नाकारून आपल्या आईच्या मार्गदर्शनाने त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. मी. स्वतः डॉ. झाले असते पण शिक्षकी पेशाच्या माध्यमातून मी हजारो डॉ. माझ्याकडून तयार होतील अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शैक्षणिक तंत्रज्ञान या विषयांतर्गत मा. योगेश सोनावणे  उपविभाग प्रमुख IT विभाग SCERT पुणे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले.

संजय घोडावत युनिव्हर्सिटी चे प्राचार्य  यांनी  प्रात्यक्षिकातून शैक्षणिक तंत्रज्ञान व त्यातील अद्ययावतता याविषयी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्राच्या  विविध भागातून आलेल्या शिक्षकांनी माझी समृद्ध शाळा याउपक्रमांतर्गत आपल्या शाळेच्या याशोगाथा सादर केल्या.

मा. महाबोले साहेब यांनी नवीन शैक्षणिक धोरण याविषयी चा आढावा घेतला. सर्व उपस्थित शिक्षकांना प्रमाणपत्राचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करणेत आली.

संजय घोडावत विद्यापीठाचा भव्य दिव्य परिसर, उत्कृष्ट नाश्ता व जेवणाचे नियोजन , राहण्याची उत्तम व्यवस्था व समेलानातील उपक्रमांची विविधता यामुळे दोन दिवसांचे संमेलन कधी संपले हे कळालेच नाही.


                             मा. राकेशकुमार पटेल प्रयोगशील शिक्षक यांचे स्वागत करताना 


मा.शशांक हजारिका प्रयोगशील शिक्षक आसाम , मा..स्नेहिल पांडे प्रयोगशील शिक्षिका उत्तर प्रदेश 

मा. योगेश सोनवणेसाहेब उपविभाग प्रमुख IT यांच्या समवेत एक क्षण 



                 मा. योगेश सोनवणेसाहेब उपविभाग प्रमुख IT यांच्या समवेत एक क्षण 


                                                          प्रमाणपत्र स्वीकारताना 


                                                          मा. आयुक्त सुरज मांढरे साहेब 


उपस्थित शिक्षक वृंद